"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
ओळ १९: ओळ १९:


== दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन ==
== दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन ==
[[पाश्चरायझेशन]] या प्रक्रियेत दुध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक [[जीवाणू]] नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. [[होमोजिनायझेशन]] प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.
[[पाश्चरायझेशन]] या प्रक्रियेत दुध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते (minimum 78 deg. for 16 sec ). या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक [[जीवाणू]] नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. [[होमोजिनायझेशन]] प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.


==दुधाचे विविध उपयोग==
==दुधाचे विविध उपयोग==

२२:५३, १३ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

दूध म्हणजे सस्तन प्राण्याच्या मादीच्या स्तनांतून स्त्रवणारा एक पांढरा द्रव पदार्थ आहे.

दूध

दूध निर्मिती हा सस्तन प्राण्यांचा विशेष गुणधर्म आहे.

नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक अन्न आहे, सुरुवातीच्या दुधात रोग प्रतिकारक पदार्थही असतात.

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


सस्तन प्राण्यांच्या नवजातांच्या पोषणासाठी मातेच्या स्तनातून नवजातांच्या जन्मानंतर स्त्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध. फक्त सस्तन प्राणी आपल्या पिलाना स्तनांमधून दूघ पाजून मोठे करतात. सस्तन प्राण्यामध्ये घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्धग्रंथीमध्ये होते. दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन) , आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम चे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात. सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते. सस्तन प्राण्यामधील दूध निर्मितीसाठी आवश्यक ‘कप्पा जीन’चा केसीन निर्मितीमध्ये महत्वाचा सहभाग आहे. हे जनुक नसल्यास सस्तन प्राण्यामध्ये दूधनिर्मिती होत नाही. या जनुकाचा शोध हैद्राबाद मधील सेंटर फॉर सेल अँधड मोलेक्युलर बायॉलॉजी या संस्थेमध्ये लागला आहे. स्तनी वर्गातील दूधनिर्मितीची जनुके एकसारखी असली तरी सर्व स्तनी वर्गामधील दुधामधील घटक आणि प्रतिकारद्रव्ये जातिनुसार भिन्न असतात. दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलाची वाढ किती वेगाने होणार हे अवलंबून असते. उदाहरणार्थ घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला साठ दिवस लागतात तर हार्प सीलचे पिलू पाच दिवसात दुप्पट वजनाचे होते. प्रतिलिटर मानवी दुधात 15 ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण 109 ग्रॅम असते. मादीने पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणा-या दुधास कोलोस्ट्रम म्ह्णतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात. पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधाचा अन्नात समावेश केला आहे. गाय,बकरी,उंट,म्हैस, याक, गाढवीण यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते. अधिक उपलब्ध झालेले दूध टिकवून ठेवण्यासाठी दूध विरजून त्याचे दही आणि चीझ बनवण्याची पद्धत सु. दोन हजार वर्षापूर्वीची आहे. स्तनामध्ये तयार झालेले दूध स्तनपान केल्याशिवाय पिलाना मिळत नाही. त्यासाठी स्तनाग्रे चोखण्याची क्रिया करावी लागते. पिलानी स्तनाग्रे चोखण्यास प्रारंभ केल्यास पश्च पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्त्रवते. ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते. (पहा दुग्धस्रवण). आता दुग्धव्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो. भारतामधील पशूंची संख्या जगात पहिल्या क्रमांकाची आहे. त्यामुळे भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. यास धवल क्रांती या नावाने ओळखले जाते. दुभत्या जनावरांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रत्येक दुभत्या जनावरामागे सर्वाधिक दूध उत्पादन हॉलंडमध्ये होते. दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्पेटचेसुद्धा शोषण होते. त्यामुळे सस्तन प्राण्यांची हाडे अधिक बळकट बनतात. त्यामुळे दूध हा आपल्या आहारातील महत्वाचा कॅल्शियमचा स्त्रोत बनला आहे. याबरोबर दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे ही समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. [ संदर्भ हवा ]

माणसांच्या आहारातील दूधाचे स्थान

जगभरामधे दूध व दूग्धजन्य पदार्थांचा वापर एक अन्नपदार्थे म्हणून केला जातो. मनुष्यप्राणी फार पूर्वीपासून दूधाचे सेवन करत आला आहे. त्यासाठी खास दूध देणारे प्राणी पाळण्यात येतात. दुग्धोत्पादनासाठी प्रामुख्याने गायी पाळण्यात येतात. त्या खालोखाल शेळी, मेंढी, म्हैस या प्राण्यापासून दूध मिळवले जाते. दुग्धोत्पादनासाठी भौगोलिकतेप्रमाणे उपलब्ध प्राणी जसे उंट, याक, मूस आदींचाही वापर केला जातो. कमी अधिक प्रमाणात घोडा, गाढव, रेनडियर, झेब्रा या प्राण्यांपासून दुग्धोत्पादन होते. दूधापासून दही, लोणी, चीज, क्रिम, योगर्ट, आईसक्रीम आदी अनेक पदार्थे तयार केले जातात ज्यांचा आहारात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

दूधावरील प्रक्रिया : पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन

पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दुध ठरावीक काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते (minimum 78 deg. for 16 sec ). या प्रक्रियेमुळे दूधातील हानीकारक जीवाणू नष्ट होऊन माणसांच्या पिण्यालायक होते तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते. होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.

दुधाचे विविध उपयोग

दुधाचा उपयोग विविध खाद्य पदार्थात केला जातो. तसेच दुधाचा वापर मंदिरात अभिषेक करण्यासाठी केला जातो. दुधाचा उपयोग हा सौंदर्यप्रसाधन म्हणून ही केला जातो.

दुधाचे पदार्थ

गायीचे अथवा म्हशीचे दूध साधारणतः मंदाग्नीवर एक तृतियांश उरेल इतके आटविल्यास त्याची बासुंदी होते.एक षष्टांश उरेल इतके आटविल्यास त्याचीरबडी(घट्ट बासुंदी) होते व त्यापेक्षा जास्त आटविल्यास त्याचा खवा होतो. खव्यापासून मग पेढा, बर्फी व अनेक प्रकारच्या मिठाया करण्यात येतात.[ संदर्भ हवा ]

दुधामध्ये केसिन नावाचे प्रथिन असते. दुधामध्ये एखादा आम्लधर्मी पदार्थ (विरजण) घातल्या जाते तेंव्हा त्याचा परिपाक त्यातील केसिनचे रेणू एकत्र येऊन त्याचे जाळे तयार करण्यात होतो. त्यास पनीर असे म्हणतात. दूध तापवून थंड करण्यास ठेविले असता त्यावर साय जमा होते.दूध न तापविता तसेच फ्रिज मध्ये ठेवले तर,त्यातील स्निग्ध पदार्थ वर येतात व त्याचा एक थर निर्माण होतो. ही क्रिम आहे.[ संदर्भ हवा ]