"बायझेंटाईन साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
ओळ ३०: ओळ ३०:
[[इस्लाम धर्म|इस्लामाचा]] उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान [[इ.स.चे १० वे शतक|इ.स.च्या १० व्या शतकात]] बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वत:ला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्याने]] कॉन्स्टँटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.

==हेही पहा==
==हे सुद्धा पहा==
*[[प्राचीन रोम]]
*[[प्राचीन रोम]]

०४:०८, ११ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

बायझेंटाईन साम्राज्य
Ῥωμανία
Rhōmanía
Romania
Imperium Romanum

इ.स. ३३०इ.स. १४५३
इ.स. १४ व्या शतकातील बायझेंटाइन साम्राज्याचा ध्वज चिन्ह
राजधानी कॉन्स्टँटिनोपल
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा ग्रीक, लॅटिन
लोकसंख्या ५०,००,००० (इ.स. १२८१ अंदाज)

बायझेंटाईन साम्राज्य (देवनागरी लेखनभेद : बायझेंटाइन साम्राज्य, बायझेन्टाईन साम्राज्य; ग्रीक: Ῥωμανία ; लॅटिन: Imperium Romanum, इंपेरिउम रोमानिउम ;) हे भूमध्य समुद्र व नजीकच्या भूप्रदेशावर पसरलेले मध्ययुगातील ग्रीक भाषक-बहुल साम्राज्य होते. सम्राट कॉन्स्टंटाइनाने रोमन साम्राज्याची राजधानी रोम येथून कॉन्स्टँटिनोपल येथे हलवल्यानंतर ग्रीस हे रोमन साम्राज्याचे केंद्र झाले. पुढे रोमन साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर पूर्व रोमन साम्राज्य हे बायझेंटाईन साम्राज्य म्हणून ओळखू जाऊ लागले. याची राजभाषा ग्रीक होती. याच काळात बायबलाची रचना झाली व ख्रिश्चन धर्म हा बायझेंटाईन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. बायझेंटाईन राज्य हे आफ्रिका, मध्य युरोप, पर्शियापर्यंत पसरले होते. अनेक प्रांत या साम्राज्यात असले तरी या साम्राज्याची ख्रिश्चन धर्मीय म्हणून ओळख होती. बेलारियसतिसरा लिओ यांसारख्या महान सेनांनीनी हे साम्राज्य विस्तारले.

इस्लामाचा उदय झाल्यानंतर इस्लामी फौजांचे पहिले आक्रमण बायझेंटाईन साम्राज्यावर झाले. त्यात त्यांना आफ्रिका व मध्यपूर्वेकडचा भाग गमवावा लागला. तुर्कांचे आक्रमण होईपर्यंत पुढील अनेक वर्षे युरोपातील भूप्रदेश बायझेंटाईन साम्राज्याने टिकवून ठेवले. दरम्यान इ.स.च्या १० व्या शतकात बायझेंटाईन ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे व रोमच्या ख्रिस्ती धर्माधिकार्‍यांचे मतभेद टोकाला गेले, रोम व ग्रीसमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण् झाली. ग्रीसचे ख्रिस्ती लोक स्वत:ला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले. बायझेंटाईन साम्राज्याचा प्रभाव ग्रीस व सभोवतालच्या देशांवर ११०० वर्षांपर्यंत राहिला. बायझेंटाईन साम्राज्याने इस्लामी आक्रमणे अनेक शतकांपर्यंत थोपवून धरली होती. परंतु सरतेशेवटी ओस्मानी साम्राज्याने कॉन्स्टँटिनोपलाचा पाडाव केला व ११०० वर्षांची एकछत्री सत्ता संपुष्टात आणली.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: