"आल्बेर्तो फुहिमोरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो Wikipedia python library v.2
ओळ ७: ओळ ७:
| कार्यकाळ_आरंभ = २८ जुलै १९९०
| कार्यकाळ_आरंभ = २८ जुलै १९९०
| कार्यकाळ_समाप्ती = २२ नोव्हेंबर २०००
| कार्यकाळ_समाप्ती = २२ नोव्हेंबर २०००
| मागील = [[अॅलन गार्शिया]]
| मागील = [[ॲलन गार्शिया]]
| पुढील = [[अलेहांद्रो तोलेदो]]
| पुढील = [[अलेहांद्रो तोलेदो]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|28}}
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1938|7|28}}

०९:०५, १३ ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती

आल्बेर्तो फुहिमोरी

पेरूचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२८ जुलै १९९० – २२ नोव्हेंबर २०००
मागील ॲलन गार्शिया
पुढील अलेहांद्रो तोलेदो

जन्म २८ जुलै, १९३८ (1938-07-28) (वय: ८५)
लिमा, पेरू
राष्ट्रीयत्व पेरूवियन, जपानी
धर्म रोमन कॅथलिक

आल्बेर्तो फुहिमोरी फुहिमोरी (स्पॅनिश: Alberto Fujimori Fujimori; जन्म: २८ जुलै १९३८) हा दक्षिण अमेरिकेमधील पेरू देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. जपानी वंशाचा असलेला फुहिमोरी १९९० ते २००० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्याला पेरूची अर्थव्यवस्था सुधारण्याचे व पेरूमधील माओवादी अतिरेकी संघटनेला पराभूत करण्याचे श्रेय दिले जाते. त्याचबरोबर फुहिमोरीवर हुकुमशाही गाजवण्याचे व मानवी हक्कांची मोठ्या प्रमाणावर पायमल्ली करण्याचे आरोप देखील झाले.

ह्या आरोपांवरून खटला भरला जाण्याच्या भितीने फुहिमोरीने पेरूमधून पळ काढला व तो जपानमध्ये दाखल झाला. तेथूनच त्याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला परंतु पेरूच्या संसदेने तो नामंजूर करून फुहिमोरीला निलंबित करून त्याच्याविरुद्ध अटकपत्र जाहीर केले. २००५ साली फुहिमोरीला चिली देशाच्या सान्तियागो शहरामध्ये अटक करण्यात आले. २००९ साली पेरूच्या सर्वोच्च न्यायालयाने फुहिमोरीला भ्रष्टाचार, कत्तल, मारहाण, अपहरण इत्यादी अनेक आरोपांसाठी दोषी ठरवून २५ वर्षांची शिक्षा सुनावली.

बाह्य दुवे