"फ्रेंच ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५५ बाइट्स वगळले ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.
 
येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर [[जॉन मॅकएन्रो]], [[पीट सॅम्प्रास]], [[बोरिस बेकर]], [[स्टीफन एडबर्ग]], [[मारिया शारापोव्हा]], [[व्हीनस विल्यम्स]] इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या [[रॉजर फेडरर]]ला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे [[ब्यॉन बोर्ग]], [[रफायेल नदाल]], [[इव्हान लेंडल]], [[जस्टिन हेनिन]] इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.
 
{{wide image|Court_Philippe_Chatrier_-_1er_tour_de_Roland_Garros_2010_-_tennis_french_open.jpg|1000px| रोलां गारोमधील फिलिप शार्तिये कोर्ट}}
२८,६५२

संपादने

दिक्चालन यादी