"फ्रेंच ओपन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट ग्रँडस्लॅम स्पर्धा
{{माहितीचौकट ग्रँडस्लॅम स्पर्धा
| नाव = फ्रेंच ओपन
| नाव = फ्रेंच ओपन
| मागील = २०१३ फ्रेंच ओपन
| मागील = २०१४ फ्रेंच ओपन
| सद्य =
| सद्य =
| चित्र = Frenchopen.svg
| चित्र = Frenchopen.svg
ओळ १२: ओळ १२:
| मैदान प्रकार = क्ले / आउटडोअर
| मैदान प्रकार = क्ले / आउटडोअर
| पुरुष ड्रॉ =१२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
| पुरुष ड्रॉ =१२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
| पुरुष विजेते = {{flagicon|ESP}} [[रफायेल नदाल]] (एकेरी)
{{flagicon|FRA}} जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली}} (दुहेरी)
| पुरुष विजेते = {{flagicon|ESP}} [[रफायेल नदाल]] (एकेरी)
{{flagicon|FRA}} जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली (दुहेरी)
| पुरुष एकेरी = [[रफायेल नदाल]] (९)
| पुरुष एकेरी = [[रफायेल नदाल]] (९)
| पुरुष दुहेरी = मॅक्स देकुगी (१४)
| पुरुष दुहेरी = मॅक्स देकुगी (१४)
ओळ २४: ओळ २४:
| मिश्र महिला =
| मिश्र महिला =
| विजयराशी = [[युरो|€]] २,१०,१७,०००
| विजयराशी = [[युरो|€]] २,१०,१७,०००
| संकेतस्थळ = http://www.rolandgarros.com/
| संकेतस्थळ = http://www.rolandgarros.com/
| माहिती =
| माहिती =

ओळ ५७: ओळ ५७:
| महिला दुहेरी || {{flagicon|TPE}} '''[[सु-वै ह्सियेह]]'''
{{flagicon|CHN}} '''[[श्वाई पेंग]]''' || {{flagicon|ITA}} [[सारा एरानी]]
{{flagicon|ITA}} [[रॉबेर्ता व्हिंची]] || 6–4, 6–1
| महिला दुहेरी || {{flagicon|TPE}} '''[[सु-वै ह्सियेह]]'''
{{flagicon|CHN}} '''[[श्वाई पेंग]]''' || {{flagicon|ITA}} [[सारा एरानी]]
{{flagicon|ITA}} [[रॉबेर्ता व्हिंची]] || 6–4, 6–1

| मिश्र दुहेरी || {{flagicon|GER}} '''[[अॅना-लेना ग्रोनेफेल्ड]]''' / {{flagicon|NED}} '''ज्यां-ज्युलियेन रोयेर''' || {{flagicon|GER}} [[जुलिया ग्योर्जेस]] / {{flagicon|SRB}} [[नेनाद झिमोंजिक]] [[डॅनियेल नेस्टर]] || 4–6, 6–2, [10–7]
| मिश्र दुहेरी || {{flagicon|GER}} '''[[अॅना-लेना ग्रोनेफेल्ड]]'''
{{flagicon|NED}} '''ज्यां-ज्युलियेन रोयेर''' || {{flagicon|GER}} [[जुलिया ग्योर्जेस]]
{{flagicon|SRB}} [[नेनाद झिमोंजिक]] [[डॅनियेल नेस्टर]] || 4–6, 6–2, [10–7]

०९:४१, ९ जून २०१४ ची आवृत्ती

फ्रेंच ओपन
अधिकृत संकेतस्थळ
सुरुवात इ.स. १८९१
स्थान पॅरिस
फ्रान्स ध्वज फ्रान्स
स्थळ स्ताद रोलां गारो
कोर्ट पृष्ठभाग क्ले / आउटडोअर
बक्षीस रक्कम २,१०,१७,०००
पुरुष
ड्रॉ १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेते स्पेन रफायेल नदाल (एकेरी)
फ्रान्स जुलिएं बेनेतेऊ / एदुआर्दे रोजर-व्हासेली (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे रफायेल नदाल (९)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे मॅक्स देकुगी (१४)
महिला
ड्रॉ १२८ एकेरी / १२८ पात्र / ६४ दुहेरी
सद्य विजेत्या रशिया मारिया शारापोव्हा (एकेरी)
चिनी ताइपेइ सु-वै ह्सियेह / चीन श्वाई पेंग (दुहेरी)
सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे ख्रिस एव्हर्ट (७)
सर्वाधिक दुहेरी अजिंक्यपदे मार्टिना नवरातिलोव्हा (७)
मिश्र दुहेरी
ड्रॉ ६४
सद्य विजेते जर्मनी अॅना-लेना ग्रोनेफेल्ड / नेदरलँड्स ज्यां-ज्युलियेन रोयेर
ग्रँड स्लॅम
मागील स्पर्धा
२०१४ फ्रेंच ओपन

फ्रेंच ओपन (फ्रेंच: Les internationaux de France de Roland-Garros) ही फ्रान्सच्या पॅरिस शहरात भरवली जाणारी एक वार्षिक टेनिस स्पर्धा आहे. फ्रेंच ओपन ही टेनिस जगतातील चार महत्त्वाच्या व मानाच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी एक आहे. दोन आठवडे चालणारी ही स्पर्धा पॅरिसच्या १६व्या जिल्ह्यातील स्ताद रोलां गारो ह्या क्रीडासंकुलात दरवर्षी मे व जून महिन्यांदरम्यान भरवली जाते. १९२८ सालापासून फ्रेंच ओपन ह्याच ठिकाणी खेळवली गेली आहे व लाल मातीच्या कोर्टावर खेळली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम आहे.

ह्या स्पर्धेची सर्वात पहिली आवृत्ती पुरुषांसाठी १८८१ साली तर महिलांसाठी १८८७ साली खेळवली गेली व केवळ फ्रेंच टेनिसपटूच ह्यात भाग घेऊ शकत असत. १९२५ साली ही स्पर्धा सर्व आंतरराष्ट्रीय टेनिसपटूंसाठी उपलब्ध झाली तर १९६८ सालापासून फ्रेंच ओपन स्पर्धा खुली करण्यात आली ज्यात व्यावसायिक व हौशी ह्या दोन्ही प्रकारचे खेळाडू भाग घेऊ लागले. आजच्या घडीला फ्रेंच ओपनमध्ये पुरुष एकेरी व दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी, मिश्र दुहेरी, मुले, मुली तसेच व्हीलचेअर स्पर्धांचे आयोयन केले जाते.

येथील वैशिष्ट्यपूर्ण मातीच्या कोर्टमुळे फ्रेंच ओपन स्पर्धेला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. येथील सामने शारिरिक दृष्ट्या सर्वात खडतर व दमवणारे मानले जातात. मातीवर आदळल्यानंतर टेनिस बॉलचा वेग कमी होतो ज्यामुळे वेगवान सर्व्हिस करणारे खेळाडू येथे निष्प्रभ ठरतात. इतर कोर्टांच्या मानाने संथ गतीने परंतु अधिक उंच उसळणारा बॉल परतवणे अनेक खेळाडूंना जमत नाही. ह्यामुळे आजवर जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, बोरिस बेकर, स्टीफन एडबर्ग, मारिया शारापोव्हा, व्हीनस विल्यम्स इत्यादी अनेक मातब्बर व यशस्वी टेनिसपटूंना फ्रेंच ओपन जिंकणे जमलेले नाही. विक्रमी १७ एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या रॉजर फेडररला फ्रेंच ओपन विजेतेपद केवळ एकदाच मिळाले आहे. संथ कोर्टासाठी साजेशी शैली असणारे ब्यॉन बोर्ग, रफायेल नदाल, इव्हान लेंडल, जस्टिन हेनिन इत्यादी टेनिसपटूंना मात्र येथे प्रचंड यश मिळाले आहे.

रोलां गारोमधील फिलिप शार्तिये कोर्ट

विजेते

खुल्या युगात (१९६८ नंतर) ही स्पर्धा पुरुष एकेरीमध्ये रफायेल नदालने सर्वाधिक वेळा (९ वेळा) तर महिला एकेरीमध्ये ख्रिस एव्हर्टने सात वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या लिअँडर पेसने पुरुष दुहेरीमध्ये फ्रेंच ओपनचा चषक विक्रमी ३ वेळा उचलला आहे.

सद्य विजेते

स्पर्धा विजेता उप-विजेता स्कोर
पुरुष एकेरी स्पेन रफायेल नदाल सर्बिया नोव्हाक जोकोविच 3-6, 7-5, 6–2, 6-4
महिला एकेरी रशिया मारिया शारापोव्हा रोमेनिया सिमोना हालेप 6-4, 6-7(5–7), 6-4
पुरुष दुहेरी फ्रान्स जुलिएं बेनेतेऊ
फ्रान्स एदुआर्दे रोजर-व्हासेली
स्पेन मार्सेल ग्रानोयेर्स
स्पेन मार्क लोपेझ
6–3, 7–6(7–1)
महिला दुहेरी चिनी ताइपेइ सु-वै ह्सियेह
चीन श्वाई पेंग
इटली सारा एरानी
इटली रॉबेर्ता व्हिंची
6–4, 6–1
मिश्र दुहेरी जर्मनी अॅना-लेना ग्रोनेफेल्ड
नेदरलँड्स ज्यां-ज्युलियेन रोयेर
जर्मनी जुलिया ग्योर्जेस
सर्बिया नेनाद झिमोंजिक डॅनियेल नेस्टर
4–6, 6–2, [10–7]

बाह्य दुवे

गुणक: 48°50′49.79″N 2°14′57.18″E / 48.8471639°N 2.2492167°E / 48.8471639; 2.2492167

मागील
ऑस्ट्रेलियन ओपन
ग्रँड स्लॅम स्पर्धा
मे-जून
पुढील
विंबल्डन

{वर्ग:पॅरिस]]