"गौरी देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ८२: ओळ ८२:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील जन्म]]

१९:३८, ३ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती

गौरी देशपांडे
जन्म फेब्रुवारी ११, १९४२
मृत्यू मार्च १, २००३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
विषय व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवादी साहित्य
वडील दिनकर उर्फ डी. डी. कर्वे
आई इरावती कर्वे

ओळख

  • गौरी देशपांडे (फेब्रुवारी ११, १९४२ - मार्च १, २००३) या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.[१] मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
  • प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडील. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्र्याचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडील व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते. ’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे चुलते.
  • गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बऱ्याचशा परदेशवाऱ्या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते.

प्रकाशित साहित्य

गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सूची विद्या बाळ, गीताली वि. म., वंदना भागवत संपादित, मौज प्रकाशन गृह प्रकाशित कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. 'Beetween Births' या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरू झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहीत होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सूचीत आढळतात.[१] त्यातील काही गाजलेले व उल्लेखनीय साहित्य खालीलप्रमाणे...

मराठी पुस्तके

१. एकेक पान गळावया, १९८०
२. तेरुओ आणि कांही दूरपर्यंत, १९८५
३. निरगाठी' आणि 'चंद्रिके ग, सारिके ग!', १९८७
४. 'दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’, १९८९
५. आहे हे असं आहे, १९८६
६. मुक्काम, १९९२
७. विंचुर्णीचे धडे, १९९६
८. गोफ, १९९९
९. उत्खनन, २००२

विविध दिवाळी अंकांत/मासिकांत प्रसिद्ध झालेल्या कथा

१. ’रोवळी’; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९३
२. ’भिजत भिजत कोळी'; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९३
३. 'दार’; मिळून साऱ्याजणी, दिवाळी १९९४
४. ’धरलं तर चावतं'; साप्ताहिक सकाळ, दिवाळी १९९६
५. ’हिशेब’; (लेख), साप्ताहिक सकाळ, दिवाळी २००१

मराठीत अनुवाद केलेली पुस्तके

* सात युगोस्लावच्या लघुकथा
* अरेबियन नाइट्स(एक हजार रात्री आणि एक रात्र), The Arabian Nights चा १६ खंडी मराठी अनुवाद.

इंग्लिश पुस्तके

* Dread Departure, The (seagull), ?
* Between Births (इंग्रजी काव्य संग्रह), 1968
* The Lackadaisical Sweeper: Short Stories, 1970
* Lost love, 1970
* Beyond The Slaughter House, ?

इंग्रजीमध्ये अनुवाद केलेली पुस्तके

१. ...and Pine for What Is Not, 1995

गौरी देशपांडे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

१. गौरी मनातली, २००५
२. कथा गौरीची, २००८
३. महर्षी ते गौरी (स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल), १९९९
या पुस्तकात महर्षी धोंडो केशव कर्वे, र. धों कर्वे आणि गौरी देशपांडे या तीन पिढ्यांतील तीन दिग्गजांच्या स्त्री-विषयक कार्याचा मंगला आठल्येकर यांनी आलेख मांडला आहे.

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ a b गौरी देशपांडे यांची साहित्यसूची, ’कथा गौरीची, मौज प्रकाशन, पृष्ठे ३२६ ते ३३६