"गर्वनिर्वाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: राम गणेश गडकरी यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वन...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:




[[वर्ग:मराठी नाटक]]
[[वर्ग:मराठी नाटक सूची]]

१८:४६, ८ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

राम गणेश गडकरी यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या "संगीत गर्वनिर्वाण' नाटकाचा रंगमंचावर प्रयोग होऊ शकला नाही; तो २४ फेब्रुवारी २०१४ला पुणे येथे विनोद जोशी महोत्सवात होणार आहे. नंतरचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये २५-२-२०१४ला होईल.

राम गणेश गडकरी यांनी इ.स. १९०८मध्ये ’गर्वनिर्वाण’ लिहायला आरंभ केला. त्यानंतर दोन वर्षांनी ते लिहून पूर्ण झाले. त्या वेळी किर्लोस्कर नाटक कंपनीने हे नाटक करण्यासही घेतले; मात्र काही कारणांमुळे ते होऊ शकले नाही आणि पुन्हा १९१४मध्ये हे नाटक करायचे ठरले. बालगंधर्व, गणपतराव बोडस यांचा सहभाग असलेल्या या नाटकाची रंगीत तालीमही झाली. परंतु ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.

नाटकांच्या संशोधनाच्या निमित्ताने हृषीकेशना १०० वर्षांपूर्वीचे गडकरींचे हे नाटक सापडले आणि ते रंगभूमीवर आणण्याचा त्यांनी निश्‍चय केला. भक्त प्रल्हादाच्या चरित्रावर आधारित असलेले हे मूळ पाच अंकी नाटक असून त्याची जोशी यांनी दोन अंकी रंगावृत्ती केली आहे.

मूळ नाटकातील एकूण ९१ पदांपैकी फक्त १२-१३ पदांचा नाटकात समावेश करण्यात आला आहे. संगीत नाटक असल्याने अजय पूरकर, सावनी कुलकर्णी, सृजन दातार हे गायक नट नाटकात काम करतील. त्यांच्या साथीला अविनाश नारकर, मानसी जोशी, अंशुमन जोशी, शार्दुल सराफ यांचा अभिनय असेल.

हृषीकेश जोशी नाटकाचे दिग्दर्शक आहेत तर, नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे.