"सरोजिनी बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ८३: ओळ ८३:
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००८ मधील मृत्यू]]

२१:०१, ३ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती

सरोजिनी बाबर
जन्म जानेवारी ७, १९२०
बागणी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू एप्रिल १९, २००८
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कादंबरी, कविता
विषय लोकसंस्कृती, लोकगीत

डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर (जानेवारी ७, १९२० - एप्रिल १९, २००८) या लोककला व लोकसंस्कृती या विषयांवर लिहिणाऱ्या नावाजलेल्या मराठी लेखिका होत्या.

जीवन

सरोजिनीबाईंचा जन्म जानेवारी ७, १९२० रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील बागणी गावी झाला. त्यांचे शालेय आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपुरात झाले. १९४० साली शालान्त परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरिता त्या पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात गेल्या. १९४४ साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्‌.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या विषयात त्यांनी पीएच्‌.डी. ही पदवी संपादन केली.

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. लोकसाहित्याचे संशोधन, संपादन आणि संकलन या विषयांवर त्यांनी अधिक काम केले आहे.

सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि "लोकसाहित्य शब्दकोश" आणि "भाषा व संस्कृती" या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांची भाषा शैली सोपी आणि प्रत्यक्ष संवाद करणारी अशी होती.

कादंबऱ्या

  • अजिता (१९५३)
  • आठवतंय तेवढं सांगते (१९५५)
  • कमळाचं जाळं (१९४६)
  • स्वयंवर (१९७९)

काव्यसंग्रह

  • झोळणा (१९६४)

महिलाविषयक

  • वनिता सारस्वत (१९६१)
  • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (१९७७)
  • स्त्रीशिक्षणाची वाटचाल (१९६८)

संपादने

  • कारागिरी (१९९२)
  • मी पाहिलेले यशवंतराव (१९८८)
  • समाज शिक्षण माला (नियतकालिक) (१९५० पासून)

भूषविलेली पदे

  • १९५२ ते १९५७ - मुंबई प्रांत विधानसभा सदस्य
  • १९६४ ते १९६६ - महाराष्ट्र विधानसभा सदस्य
  • १९६८ ते १९७४ - राज्यसभा सदस्य

सन्मान व पुरस्कार

  • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा - ‘गौरववृत्ती’ पुरस्कार.
  • राहुरी कृषी विद्यापीठाची - ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’.
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने व पुणे विद्यापीठाने दिलेली - ‘डी. लिट.’
  • पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठाकडून मिळालेला - ‘जीवन गौरव’ पुरस्कार.
  • कोल्हापूरचा - ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कार’.
  • पुणे महानगरपालिकेचा - ‘पठ्ठे बापुराव पुरस्कार’.
  • मराठा सेवा संघाचा - ‘विश्वभूषण’ पुरस्कार.