"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२,१२८ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो (Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q83099)
 
== जन गण मन गीताचा अर्थ ==
राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....
 
जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
 
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।
पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
 
विंध्य हिमाचल यमुना गंगा ,
उच्छल जलधितरंग।
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.
 
तव शुभ नामे जागे ,
तव शुभ आशिष मांगे ;
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है ,
भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
 
जय हे , जय हे , जय हे ,
जय जय जय जय है।।
तुझा जय जयकार. त्रिवार जयजयकार.
 
== हेही पाहा ==
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी