"विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 50 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q4654725
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q4654725
ओळ १७: ओळ १७:
* [http://www.manogat.com/node/23153 कठोर परंतू सभ्य टिका कशी करावी मनोगत संकेतस्थळावर लावलेली चर्चा]
* [http://www.manogat.com/node/23153 कठोर परंतू सभ्य टिका कशी करावी मनोगत संकेतस्थळावर लावलेली चर्चा]
[[वर्ग:विकिपीडिया धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे|वैयक्तिक हल्ले करू नका]]
[[वर्ग:विकिपीडिया धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे|वैयक्तिक हल्ले करू नका]]

[[ja:Wikipedia:個人攻撃はしない]]

२१:२२, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

विकिपीडियावर कुठेही वैयक्तिक हल्ले करू नका. लिहिणाऱ्यावर टीका करण्याऐवजी लिखाणावर टिप्पणी करा. वैयक्तिक हल्ले केल्यामुळे तुमचा मुद्द्याची सरशी तर होणारच नाही, मात्र विकिपीडिया समुदाय दुखावला जाऊन समुदायातील सदस्य येथील कोशकार्यातून परावृत्त होऊ शकतात. कुणाही संपादक सदस्यास अन्य सदस्यांवर केलेले वैयक्तिक हल्ले वगळता येतात. सातत्याने किंवा गंभीर स्वरूपाचे वैयक्तिक हल्ले केल्यास संपादनांस अटकाव केला जाऊ शकतो.

कोणत्या स्वरूपाची शेरेबाजी वैयक्तिक हल्ला म्हणून गणल्या जाऊ शकतात ?

कोणत्या स्वरूपाची शेरेबाजी वैयक्तिक हल्ला म्हणून गणली जाऊ शकते, याची सरधोपट अशी व्याख्या करणे अवघड आहे; तरीही काही विशिष्ट स्वरूपाच्या टिप्पण्या निश्चितच अनुचित ठरतात :

  • जातीय/धार्मिक/वांशिक/लैंगिक/राजकीय/शारीरिक इत्यादी वैशिष्ट्यांवरून, लैंगिकतेवरून, नागरिकत्व/राष्ट्रीयत्व/रहिवास इत्यादी भौगोलिक वैशिष्ट्यांवरून, वय/शारीरिक क्षमता-अक्षमता इत्यादींवरून एखाद्या सदस्यास हिणवण्याच्या हेतूने किंवा यांपैकी कोणत्याही वैशिष्ट्यावरून बदनामी करण्याच्या हेतूने केलेल्या टिप्पण्या.
  • पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरणे
  • एखाद्या सदस्याची नाझी, हुकूमशहा, गुंड किंवा अन्य एखादी कुख्यात व्यक्ती/व्यक्तिरेखा म्हणून संभावना करणे किंवा तत्सम तुलना करणे.
  • पुराव्याविना गंभीर आरोप करणे. गंभीर आरोप केल्यास, तितके सज्जड पुरावेही देणे अपेक्षित असते. संपादनांमधील फरक व दुव्यांच्या स्वरूपात पुरावे देता येतात. तसेच काही प्रसंगी संवेदनशील पुरावे अंशतः गोपनीय राखून काही विश्वासार्ह व विवेकी सदस्यांच्या मर्यादित वर्तुळापुरते उघड करता येऊ शकतात.[१]
  1. ^ 'कॉमेंट' करताय? जरा जपून...esakal.com: Friday, November 23, 2012 AT 05:00 AM (IST) संकेतस्थळ १९.२९ भाप्रवे दि. २४.११.२०१२ जसे दिसले
  • धमक्या :
    • कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या
    • हिंसात्मक प्रत्युत्तराच्या धमकावण्या किंवा विकिबाहेर "बघून घेण्याविषयीच्या" धमकावण्या.

हे सुद्धा पहा