"शिवराम महादेव परांजपे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3632564
ओळ १०७: ओळ १०७:
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]

[[en:Shivram Mahadev Paranjape]]
[[hi:शिवराम महादेव परांजपे]]

०७:२६, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

शिवराम महादेव परांजपे
चित्र:Paranjpe 001.jpg
जन्म जून २७, इ.स. १८६४
महाड, महाराष्ट्र
मृत्यू इ.स. १९२९
राष्ट्रीयत्व मराठी
पेशा पत्रकारिता, साहित्य
प्रसिद्ध कामे काळ

शिवराम महादेव परांजपे (जून २७, इ.स. १८६४ - इ.स. १९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते. तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध काळ या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.

जीवन

शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रात महाड येथे झाला. त्यांचे शिक्षण महाड, रत्नागिरीपुणे या ठिकाणी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना संस्कृत भाषेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात संस्कृत शिकवले.

कार्य

इ.स. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. काळाने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हटले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. विष्णुशास्त्री चिपळूकर शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो.

‘काळ’ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवरामपंतांनी काही काळ लोकमान्य टिळक यांच्या समवेत सार्वजनिक कार्य केले. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातूनही त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. इ.स. १९०८ साली त्यांना ‘काळ’मधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने अटक केली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. इ.स. १९०९ पर्यंत ‘काळ’ चालू होता. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या जात-मुचलक्याची (जामिनाची) पूर्तता करणे शक्य न झाल्याने ‘काळ’ बंद पडला. पुढे इ.स. १९२० साली शि.म.परांजपे यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले.

पुढे इ.स. १९२२ मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले. ‘विंध्याचल’, ‘संगीत कादंबरी’, ‘मराठ्यांच्या लढ्याच्या इतिहास’, ‘रामायणाविषयी काही विचार’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. इ.स. १९२९ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. परांजपे यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’च्या बरोबरीने प्रेरक भूमिका बजावली, तसेच त्यांच्या लेखनाने पत्रकारिता व मराठी साहित्यातही मौल्यवान भर घातली.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
काळातील निबंध निबंधसंग्रह
गोविंदाची गोष्ट कादंबरी
पहिला पांडव नाटक
भीमराव नाटक
मराठ्यांच्या लढ्याचा इतिहास इतिहास
मानाजीराव नाटक
रामदेवराव नाटक
रामायणाविषयी काही विचार संशोधनात्मक
विंध्याचल कादंबरी
संगीत कादंबरी नाटक

संकीर्ण

परांजपे इ.स. १९२९ साली बेळगावात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.