"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: योग्य वर्ग नाव using AWB
छो Bot: Migrating 25 langlinks, now provided by Wikidata on d:Q605897
ओळ ३०: ओळ ३०:
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थाने]]
[[वर्ग:जागतिक वारसा स्थाने]]

[[ca:Parc Nacional de la Vall de les Flors]]
[[en:Valley of Flowers National Park]]
[[es:Parque nacional del Valle de las Flores]]
[[fa:پارک ملی دره گلها]]
[[fi:Valley of Flowersin kansallispuisto]]
[[fr:Parc national de la Vallée des fleurs]]
[[gu:વેલી ઓફ ફ્લાવર્સ રાષ્ટ્રીય ઉદ્યાન]]
[[hi:फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान]]
[[hr:Dolina cvijeća]]
[[it:Parco nazionale della Valle dei fiori]]
[[ka:ყვავილების ხეობა]]
[[kn:ಪುಷ್ಪಕಣಿವೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉದ್ಯಾನ]]
[[ml:വാലി ഓഫ് ഫ്ലവേഴ്സ് ദേശീയോദ്യാനം]]
[[nl:Nationaal park Valley of Flowers]]
[[pl:Park Narodowy Doliny Kwiatów]]
[[pnb:ویلی آف فلاورز نیشنل پارک]]
[[pt:Parque Nacional do Vale das Flores]]
[[ru:Долина Цветов]]
[[sa:कुसुमकन्दरस्य राष्ट्रियोद्यानम्]]
[[sv:Valley of Flowers nationalpark]]
[[ta:மலர்ப் பள்ளத்தாக்கு தேசியப் பூங்கா]]
[[uk:Національний парк Долина Квітів]]
[[vi:Vườn quốc gia thung lũng các loài hoa]]
[[xmf:პეულეფიშ ლეხერი]]
[[zh:楠达戴维山国家公园和花谷国家公园]]

०७:०६, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान

व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळालेला आहे.

भौगोलिक माहिती

हे उद्यान मुख्यत्वे हिमालयाच्या मध्यम ते अती उंच रांगामध्ये आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वतरांग हिमालयातील झांनस्कार रांगआहे. तसेच सर्वोच्च ठिकाण गौरी पर्वत आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. हे उद्यान वर्षातील जवळपास ९ महिने बर्फाच्छादीत असल्याने बंद असते.

इतिहास

१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक फ्रँक स्मिथ व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील कॉमेट हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करून त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.[१]. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली.

प्राणी जीवन

हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतीशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे हिमालयीन थार, हिमबिबट्या, कस्तुरी मृग, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकिरी अस्वल, भारल, पक्ष्यांमध्ये सोनेरी गरुड, हिमालयीन ग्रिफन गिधाड इत्यादी अतीदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत[२].

फुले विश्व

अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाती येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तीनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पूर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे.

संदर्भ

  1. ^ लिजेंड ऑफ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स
  2. ^ Valley of flowers

बाह्य दुवे