"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Bot: Migrating 5 langlinks, now provided by Wikidata on d:Q3317352
ओळ १७: ओळ १७:
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]
[[वर्ग:पारशी व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]

[[en:Bhikaiji Cama]]
[[hi:भीखाजी कामा]]
[[ml:മാഡം കാമ]]
[[pt:Bhikaiji Cama]]
[[te:భికాజీ రుస్తుం కామా]]

०१:१८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

भिकाईजी कामा

मादाम भिकाईजी रुस्तम कामा (रोमन लिपी: Bhikaiji Rustom Cama ;) (२४ सप्टेंबर, इ.स. १८६१; मुंबई, ब्रिटिश भारत - १९ ऑगस्ट, इ.स. १९३६; मुंबई, ब्रिटिश भारत) या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.

सुरुवात

भिकाईजी कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर, इ.स. १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तक कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

कार्य

दादाभाई नौरोजी यांची सचिव म्हणून भिकाईजी कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तीवर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारांच्यावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत भिकाईजी कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.

भिकाईजी कामांनी फडकविलेला पहिला झेंडा

जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे मादाम भिकाईजी कामा यांनी फडकवलेला भारताचा पहिला झेंडा

मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला. त्यात हिरवा, केशरी व लाल रांगाचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो केशरी विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे. तसेच ८ कमळाचे फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांचे प्रतीक होते. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर सूर्य आणि चंद्र हे हिंद्-मुस्लिम विश्वासाचे प्रतीक होते.