"जन गण मन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: as:জন গণ মন; cosmetic changes
छो Bot: Migrating 59 langlinks, now provided by Wikidata on d:Q83099
ओळ १३०: ओळ १३०:
[[वर्ग:राष्ट्रगीते]]
[[वर्ग:राष्ट्रगीते]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|जन गण मन]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रचिन्हे|जन गण मन]]

[[ar:جانا غانا مانا]]
[[as:জন গণ মন]]
[[az:Hindistan dövlət himni]]
[[bh:जन गण मन]]
[[bn:জনগণমন-অধিনায়ক জয় হে]]
[[ca:Jana Gana Mana]]
[[cs:Indická hymna]]
[[de:Jana Gana Mana]]
[[dv:ޖަނަ ގަނަ މަނަ]]
[[el:Τζάνα Γκάνα Μάνα]]
[[en:Jana Gana Mana]]
[[es:Jana-Gana-Mana]]
[[et:Jana-Gana-Mana]]
[[eu:Jana Gana Mana]]
[[fa:سرود ملی هند]]
[[fi:Jana-Gana-Mana]]
[[fr:Jana-Gana-Mana]]
[[gu:જન ગણ મન]]
[[he:המנון הודו]]
[[hi:जन गण मन]]
[[hif:India ke national anthem]]
[[hr:Jana Gana Mana]]
[[hu:India himnusza]]
[[id:Jana-Gana-Mana]]
[[it:Jana Gana Mana]]
[[ja:ジャナ・ガナ・マナ]]
[[jv:Jana-Gana-Mana]]
[[ka:ინდოეთის ჰიმნი]]
[[kn:ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ]]
[[ko:인도의 국가]]
[[lt:Indijos himnas]]
[[lv:Indijas himna]]
[[mk:Ти си господар на свеста на сите луѓе]]
[[ml:ജനഗണമന]]
[[ms:Jana-Gana-Mana]]
[[nl:Jana-Gana-Mana]]
[[nn:Jana gana mana]]
[[no:Indias nasjonalsang]]
[[or:ଜନ ଗଣ ମନ]]
[[pa:ਜਨ ਗਣ ਮਨ]]
[[pl:Hymn Indii]]
[[pnb:جن گن من]]
[[pt:Jana Gana Mana]]
[[ro:Jana-Gana-Mana]]
[[ru:Гимн Индии]]
[[sa:जन गण मन]]
[[simple:Jana Gana Mana]]
[[sl:Džana gana mana]]
[[sr:Химна Индије]]
[[sv:Jana-Gana-Mana]]
[[ta:ஜன கண மன]]
[[te:భారత జాతీయగీతం]]
[[th:ชนะ คณะ มนะ]]
[[tr:Jana Gana Mana]]
[[uk:Гімн Індії]]
[[ur:جن گن من]]
[[vi:Jana Gana Mana]]
[[zh:人民的意志]]
[[zh-classical:民之旨]]

१७:१५, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचे हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणुन स्वीकार केलेला आहे.

बोल


जन गन मन अधिनायक जय हे


भारत भाग्य विधाता


पंजाब सिंध गुजरात मराठा


द्राविड उत्कल बंग


विंध्य हिमाचल यमुना गंगा


उच्छल जलधि तरंग


तव शुभ नामे जागे


तव शुभ आशिश मागे


गाये तव जय गाथा


जन गन मंगलदायक जय हे


भारत भाग्य विधाता


जय हे जय हे जय हे


जय जय जय जय हे॥

वाद

या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही कविता देवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हणले जाते. टागोरांच्या महान देशप्रेमाचा आणि त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रयत्नांचा विचार करता 'भाग्यविधाता' हा शब्द ब्रिटिश राजाला उद्देशून केला असणे शक्य नाही. खरेतर, टागोरांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना म्हणजे ब्रिटिशांच्या अनैतिक व्यवहारांमुळे 'नाईट' पदवीचा अस्वीकार ही आहे.

प्रवाद

बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी २६ डिसेंबर रोजी गीत लिहिले ते ‘जन गण मन.’ २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वत: चाल लावणारे ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गुंजले. या गीतात भारत देश किती सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणार्‍या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे. घटना समितीने २४ जानेवारी १९५0 मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून ती म्हणण्यास वेळ लागतो, यामुळे केवळ पहिलेच कडवे संबंध भारतात म्हटले जाते. पाचही कडव्यांच्या राष्ट्रगीताचे संकलन भारतीय संस्कृतिकोश खंड-८ यामध्ये प्रामुख्याने आढळते. रवींद्रनाथ टागोर यांचे निधन ७ ऑगस्ट १९४१ ला झाले. त्यापूर्वी त्यांनी ‘मी भारतात पुन:पुन्हा जन्म घेईन. भारतात कितीही दु:ख, दारिद्रय, दैन्य असले तरीही माझे भारतावर अत्यंत प्रेम आहे. यावरूनच त्यांच्या राष्ट्रभक्तीचे उत्कट दर्शन होते. हा संदर्भ मुलांचा सांस्कृतिक कोश खंड-२ मध्ये आढळतो.

'पूलीन बिहारी सेन' यांना टागोरांनी लिहीलेल्या पत्राचे स्वैर भाषांतर

'पूलीन बिहारी सेन' यांना लिहीलेल्या एका पत्रात, नंतर टागोर लिहीतात "ब्रिटनच्या राजाच्या सेवेत असलेल्या एका उच्च अधिकार्‍याने, जो माझा मित्रही होता,त्या राजाच्या सन्मानार्थ मी एक गाणे लिहावे अशी त्याने मला विनंती केली.त्या विनंतीने मला आश्चर्यचकित केले.त्याने माझ्या मनात बरीच ढवळाढवळ झाली.त्याचे प्रत्युत्तर म्हणुन, माझ्या मनात उठलेल्या वादळात,मी त्या भारताच्या भाग्य विधात्याचा तो विजय, जन गण मनच्या रुपात उच्चारला,ज्याने, पुष्कळ कालापासुन भारताच्या रथाचा लगाम उंचसखल व सरळ आणि वळणदार रस्त्यात ताणुन धरला होता.तो भाग्यविधाता,जो भारताचे एकत्रित विचार जाणुन घेऊ शकला,तो संपूर्ण वर्षाचा मार्गदर्शक,जॉर्ज पंचम, सहावा जॉर्ज वा कोणीही जॉर्ज असुच शकत नाही.माझ्या अधिकृत मित्रानेही त्या गाण्याबद्दल हे ओळखले.सरतेशेवटी, जरी त्यास त्याच्या राजाबद्दल अफाट प्रेम होते,तरी, त्याच्या सारासार विचारबुद्धीत काही न्युनता नव्हती.

जन गण मन पूर्ण गीत

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग

विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री

तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री

दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे

संकंट दुखयात्रा

जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दु:स्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दु:ख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले

गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले

तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

जन गण मन गीताचा अर्थ

हेही पाहा

बाह्य दुवे