"अशोक सराफ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अशोक सराफ: info added
ओळ ७३: ओळ ७३:
*[[नवरा माझा ब्रम्हचारी, चित्रपट|नवरा माझा ब्रम्हचारी]]
*[[नवरा माझा ब्रम्हचारी, चित्रपट|नवरा माझा ब्रम्हचारी]]
*[[गोडीगुलाबी,चित्रपट|गोडीगुलाबी]]
*[[गोडीगुलाबी,चित्रपट|गोडीगुलाबी]]
*[[गडबड घोटाळा, चित्रपट|गडबड घोटाळा]]
*[[मुंबई ते मॉरिशस,चित्रपट|मुंबई ते मॉरिशस]]
*[[मुंबई ते मॉरिशस,चित्रपट|मुंबई ते मॉरिशस]]
*[[आमच्या सारखे आम्हीच,चित्रपट|आमच्या सारखे आम्हीच]]
*[[आमच्या सारखे आम्हीच,चित्रपट|आमच्या सारखे आम्हीच]]

१०:१९, १२ जुलै २००७ ची आवृत्ती


अशोक सराफ
जन्म जानेवारी १, इ.स. ??
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
हिंदी चित्रपट
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
कारकीर्दीचा काळ १९७१ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवर्‍याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा
वजीर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम हम पाँच
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार
पत्नी निवेदिता जोशी


ओळख

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही नानाविविध भूमिका केल्या असून टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील 'हम पॉंच'सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला आहे.

जीवन

मूळचे बेळगावचे असणार्‍या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' मधील इरसाल पोलिस, 'राम राम गंगाराम' मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या अशोक सराफ यांचा नाटक , सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी सारखाच संचार अजूनही सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

उल्लेखनीय

अशोक सराफ यांचा अभिनय 'अष्टपैलू' या विशेषणाशिवाय शब्दात मांडणे कठीण आहे. केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कार्याद्वारे घडविले आहे. विनोद रक्तातच मुरलेल्या अशोक सराफ यांनी दादा कोंडकें सारख्या जगमान्य विनोदवीराशी तोडीस तोड अशी अभिनयाची जुगलबंदी पांडू हवालदार मध्ये दाखविली तर कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी हुबेहूब साकारली तर चौकट राजा मधील सहृदय गणाच्या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षकांच्या हृदयात अजिंक्य स्थान मिळविले. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दण यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवर्‍याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा पासून अलिकडच्या शुभमंगल सावधान पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकाला खिळवून ठेवले. मराठी हृदयात मानाचं स्थान मिळविलेल्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास अजूनही अविरत चालूच असून अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्वेंशन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित हे राम कार्डिओग्राम या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही दमदार पाऊल ठेवले आहे.

कार्य

चित्रपट

अशोक सराफ अभिनित मराठी चित्रपट

अशोक सराफ अभिनित हिंदी चित्रपट

रंगमंच

अशोक सराफ अभिनित नाटके

दूरचित्रवाणी

अशोक सराफ अभिनित दूरचित्रवाणी मालिका

संदर्भ

बाह्यदुवे