"विश्वनाथन आनंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: or:ବିଶ୍ଵନାଥନ ଆନନ୍ଦ
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: th:วิศวนาธาน อนันด์
ओळ १२३: ओळ १२३:
[[ta:விசுவநாதன் ஆனந்த்]]
[[ta:விசுவநாதன் ஆனந்த்]]
[[te:విశ్వనాథన్ ఆనంద్]]
[[te:విశ్వనాథన్ ఆనంద్]]
[[th:วิศวนาธาน อนันด์]]
[[tr:Viswanathan Anand]]
[[tr:Viswanathan Anand]]
[[uk:Вішванатан Ананд]]
[[uk:Вішванатан Ананд]]

१७:५९, १३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

विश्वनाथन आनंद
पूर्ण नाव विश्वनाथन आनंद
देश भारत
जन्म ११ डिसेंबर, १९६९ (1969-12-11) (वय: ५४)
चेन्नई, तमिळनाडू, भारत
पद ग्रँडमास्टर -१९८८
विश्व अजिंक्यपद २०००-२००२ (फिडे), २००७, २००८, २०१०-सद्य (अविवादित)
फिडे गुणांकन २८०४
(क्र. १, नोव्हेंबर इ.स. २०१० फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २८०४ (नोव्हेंबर इ.स. २०१०)

विश्वनाथन आनंद (तामिळ: விசுவநாதன் ஆனந்த்) हा भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे व तो सध्याचा(इ.स.२०१२) बुद्धिबळातील जगज्जेता आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेसच्या ऑक्टोबर २००७ च्या क्रमवारीनुसार तो जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू होता. त्याने पाच वेळा बुद्धिबळातील जगज्जेतेपद मिळवले आहे. (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) तो २००७ पासून तो निर्विवाद बुद्धिबळ जगज्जेता आहे.

जेव्हा जगज्जेतेपदाचे स्थान विभागले गेले तेव्हा आनंद २००० मध्ये फिडे विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकला. तो २००७मध्ये निर्विवाद बुद्धिबळातील जगज्जेता झाला. २००८ मध्ये व्लादिमिर क्रॅमनिकला हरवून त्याने आपली पदवी अबाधित राखली. २०१० मध्ये व्हेसिलिन टोपोलावला हरवून आणि २०१२ मध्ये बोरिस गेल्फॅंडला हरवून त्याने पुन्हा दोनदा आपले विश्वविजेतेपद अबाधित राखले.

जगज्जेतेपद

२०००

आनंदने २००० मध्ये फिडेचे जगज्जेतेपद नॉक-आऊट स्पर्धेमध्ये जिंकले. अंतिम सामन्यात त्याने स्पेनच्या अलेक्सी शिरोवला ३.५ - ०.५ अशी मात दिली.

२००७

मेक्सिको शहरात झालेली जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकून तो २९ सप्टेंबर २००७ रोजी जगज्जेता झाला. आनंदने ह्या स्पर्धेत १४ पैकी ९ गुण मिळविले. तो ह्या स्पर्धेत एकही सामना हरला नाही. त्याने इतर स्पर्धकांपेक्षा एक पूर्ण गुण अधिक मिळवला.

२००८

२००८ मधे आनंदने रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकला ६.५ - ४.५ असे हरवून जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले. क्रॅमनिक व आनंद हे आजपर्यंत ६४ सामने खेळले आहेत.

२०१०

२०१० मध्ये आनंदने बुल्गेरियाच्या टोपोलोवला बुल्गेरियामध्ये ६.५ - ५.५ असे हरवून पुन्हा एकदा जगज्जेतेपद आपल्यापाशीच ठेवले.

२०१२

२०१२ मध्ये आनंदने बोरिस गेल्फॅंड याला हरवून आपले जगज्जेतेपद कायम राखले.

पुरस्कार

बाह्य दुवे