"स्तनपान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ca:Lactància materna; cosmetic changes
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: pt:Aleitamento materno
ओळ ६०: ओळ ६०:
[[no:Amming]]
[[no:Amming]]
[[pl:Karmienie piersią]]
[[pl:Karmienie piersią]]
[[pt:Aleitamento]]
[[pt:Aleitamento materno]]
[[ro:Alăptare]]
[[ro:Alăptare]]
[[ru:Грудное вскармливание]]
[[ru:Грудное вскармливание]]

१९:५९, १४ जुलै २०१२ ची आवृत्ती

आंतरराष्ट्रीय स्तनपान चिह्न

बाळ जन्मल्यावर आई च्या स्तनांतून दूध पाजण्याला स्तनपान असे म्हणतात.

मानवांमधील स्तनपान

एक नवजात शिशु स्तनपान करताना

बाळ जन्मल्यावर एका तासाच्या आत त्याला आईजवळ देऊन स्तनपानाची यशस्वी सुरुवात करावी असे मानले जाते. पान्हा फुटलेल्या स्तनाला बाळ लुचते आणि दूध यायला सुरुवात होते. स्तनपान हाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळाला सहा महिन्यांपर्यंत दुसरे कोणतेही अन्न न देता केवळ आईचे दूध दिले पाहिजे. सहा महिन्यांनंतरही स्तनपान चालू ठेवून ताजा, मऊ व बाळाच्या वाढीला योग्य असा आहार बाळाला स्वच्छतापूर्वक भरवला पाहिजे. बाळाला दर तीन तासांनी दुधाची गरज असते. सर्व मातांना आपल्या बाळांना पुरेल इतके दूध निसर्गत: निर्माण करता येते.

स्तनपानाचे लाभ

आईच्या दुधात नवजात शिशुसाठी आवश्यक ती सर्व पोषणमुल्ये असतात. जन्मल्यानंतर पहिल्या काही आठवड्यात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. अशा वेळी आईच्या दूधातील घटक बाळाचे संरक्षण करते. अंगावर दुध पाजल्याने बाळाला विकार उद्‌भवत नाहीत व त्याचे आरोग्य उत्तम राहते. प्रसूतीनंतरचे सुरवातीचे थोडे दिवस घट्ट स्वरूपातील चीकाचे दूध (कोलोस्ट्रम) येत असते. चीक-दूध कमी येत असले, तरी बाळाला ते पुरेसे असते व त्यातूनच बाळाच्या सर्व गरजा भागविल्या जातात. चीकाच्या दूधात जीवनसत्व ए व के जास्त प्रमाणात आढळते. त्यात असलेली रोग प्रतिबंधात्मक द्रव्ये व इतर आवश्यक घटकांमुळे जंतूसंसर्गापासून बाळाचे रक्षण होते.तसेच या दूधात इम्युनोग्लोबीन असतात. बाळाच्या आतड्यांच्या अंत:त्वचेला लिंपण होते व त्यामूळे बाळाच्या रक्ताभिसरणात प्रथिनांचे मोठे कण जात नाही. अशा प्रकारे बाळाल रोगांपासून संरक्षण मिळते.

कार्य

स्तनातील दूध-उत्पादक ग्रंथींमध्ये दूध तयार होते. बाळ आईचे दूध पिण्यासाठी स्तनाग्र चोखायला लागते. यामुले आईच्या शरीरात दूध उत्पादक अंत:स्त्राव स्त्रवू लागतात. बाळाने स्तनाग्र चोखणे चालू ठेवल्यावर आईच्या शरीरात दूसरा अंत:स्त्राव स्त्रवू लागतो. त्यामूळे तयार झालेले दूध स्तनांच्या काळ्या भागातील दूग्धनलिकेमार्फत स्तनाग्राकडे येते.

स्तनपान स्थिती

बाळाला पाजताना बाळाला आणि आईला आरामशीर वाटणे महत्वाचे असते.

बाह्य दुवे