"चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. ते विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयूक्त आहे तो पर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबूक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वत:च्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ{{संदर्भ हवा}} देणे अपेक्षीत आहे.
या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. जोपर्यंत हे लिखाण विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयुक्त आहे, तोपर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबुक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वत:च्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ{{संदर्भ हवा}} देणे अपेक्षित आहे.
{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
{{पुनर्लेखन}}
{{पुनर्लेखन}}
एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) <ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) <ref>http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.</ref>
त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण.चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदय आणि महत्वकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी,समर्थक आणि विरोधकात या समुदाय विशेषाबद्दल कुतुहल आढळते
त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदयाबद्दल आणि महत्त्वाकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी, समर्थक आणि विरोधकांत या समुदाय विशेषाबद्दल कुतूहल आढळते


==चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्यूत्पत्ती आणि दंतकथा==
==चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती आणि दंतकथा==
[[चित्र:Parshuram.jpg|140px|right]]
[[चित्र:Parshuram.jpg|140px|right]]
[[चित्र:परशुरामावतार.JPG|140px|left]]
[[चित्र:परशुरामावतार.JPG|140px|left]]
बर्‍याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतुन पावन झाले आहेत ते असा घेतला जातो कारण चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दिक्षा दिली तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मुळपुरुष हे अग्नि चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन् केले आहे(म. श्री दिक्षित संपादित आम्ही चित्पावन).
बर्‍याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नि चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे(म.श्री. दीक्षित संपादित ’आम्ही चित्पाव”).


:दंतकथा:[[परशुराम|परशुरामाने]] १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करुन घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.<ref>ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल</ref>
’दंतकथा:[[परशुराम|परशुरामाने]] १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.<ref>ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल</ref>


काही अजूनपर्यंत शास्त्रीय/संशोधनाने सिद्ध आधार नसलेल्या मतानुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रिती पूर्वी उत्तर प्रदेश् आणि बिहारी भुमीहार ब्राम्हण,पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण,केरळातील नंबुद्री ब्राम्हण,आंध्रप्रदेशातील हव्यक ,गुजरातेतील अन्वीक ,उत्तराखंडाचे कुमाऊ ब्राम्हणांशी मिळत्याजुळत्या आहेत आणि हे सार्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख ''कोब्रा'' असाही केला जातो.
काही अजूनपर्यंत शास्त्रीय/संशोधनाने सिद्ध आधार नसलेल्या मतानुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राम्हण, पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण, केरळातील नंबुद्री ब्राम्हण, आंध्रप्रदेशातील हव्यक ,गुजरातेतील अन्विक ,उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राम्हणांशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख ''कोब्रा'' असाही केला जातो.


==[[अनुवंशशास्त्र]] आणि शरीर यष्टी ==
==[[अनुवंशशास्त्र]] आणि शरीरयष्टी ==
सर्व साधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, नीळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात.
सर्व साधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात.


यूरोपिय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विवीध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षे प्रमाणे कोकणस्थ ब्राम्हणांचे, वाय [[गूणसूत्र]] परिक्षणांवरून इतर ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे आणि दक्षीण यूरोपियायी लोकांच्या,प्रामूख्याने फ्रेंच,इटालीयन,ग्रीक,लयबेरियन, आणि आयरिश गूणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.<ref>http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtrian-Konkanastha-Brahmins २७ मे २००९ ११.१५ सकाळी संदर्भाकरिता वापरले त्या प्रमाणे</ref>
युरोपीय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राम्हण, वाय [[गुणसूत्र]] परीक्षणांवरून इतर भारतीय ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षिणी युरोपातल्या, प्रामुख्याने फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.<ref>http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtrian-Konkanastha-Brahmins २७ मे २००९ ११.१५ सकाळी संदर्भाकरिता वापरले त्याप्रमाणे</ref>


कोकणस्थ ब्राम्हणातल्या प्रमाणे अजूनही अंशतः दक्षिण इंग्लंडात बरेच जण मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रूप गूणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनार्‍यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे,उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य ब्राऊन ते लाल केसांचे आणि घार्‍या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत, कि जसे कोकणस्थ ब्राम्हणांच्या वंशजात आजही आढळतात.
कोकणस्थ ब्राम्हणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडात बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रुप गुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनार्‍यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य ब्राऊन ते लाल केसांचे आणि घार्‍या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत. असेच कोकणस्थ ब्राम्हण आजही असेच असतात.


अलिकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गयकवाड एट अल २००५), पोर्तूगी़ज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळा पासून, चित्पावनांच्या यूरोपिय मूळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे तरिपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गूणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.
अलीकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गायकवाड एट अल २००५), पोर्तुगी़ज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळापासून, चित्पावनांच्या युरोपीय मूळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.


(Sahoo et al. 2006)नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बर्‍याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तर भारतीयात सुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.
(Sahoo et al. 2006)नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बर्‍याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.


मिडल इस्टर्न ओरिजीनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बर्‍याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).त्या अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रूपांचे प्राबल्यांने अस्तीत्व जाणवते जे की मूळचे भारतीय समजले जातात आणि पश्चिम आणि दक्षिण भारतात आढळतात.
मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बर्‍याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).त्या अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणार्‍या आणि पश्चिम दक्षिण भारतात राहणार्‍या लोकांत आढळते.


त्यामूळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखीत वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.<ref>इंग्रजी विकिपीडियातील chitpavan लेख दिनांक २७ मे २००९ ला भाषांतरीत</ref>
त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.<ref>इंग्रजी विकिपीडियातील chitpavan लेख दिनांक २७ मे २००९ ला भाषांतरित</ref>


==गोत्रे==
==गोत्रे==
ओळ ६६: ओळ ६६:


==कुलदेवता आणि पुजाअर्चा==
==कुलदेवता आणि पुजाअर्चा==
चित्पावनांची मुळ कुळे ६० समजली जातात{{संदर्भ हवा}}. वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत. [[अंबेजोगाई]] येथील योगेश्वरी ही मुळ कुलदेवता आहे{{संदर्भ हवा}} व महालक्ष्मी, वज्राई या मागाहुन{{संदर्भ हवा}} कुलदेवता म्हणुन स्वीकारल्या गेल्या आहेत.
चित्पावनांची मुळ कुळे ६० समजली जातात{{संदर्भ हवा}}. वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत. [[अंबेजोगाई]] येथील योगेश्वरी ही मुळ कुलदेवता आहे{{संदर्भ हवा}} व महालक्ष्मी, वज्राई या मागाहून{{संदर्भ हवा}} कुलदेवता म्हणुन स्वीकारल्या गेल्या आहेत.


==संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक==
==संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक==
ओळ ७२: ओळ ७२:


[[चित्र:Ashwin Chitale.jpg|पेशवाईतील पगडी|right|140px]]
[[चित्र:Ashwin Chitale.jpg|पेशवाईतील पगडी|right|140px]]
सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य,उच्च शिक्षीत,साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात.
सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य, उच्चशिक्षित, साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात.
सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरूषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे आणि धोतर स्त्रियांचा नउवारी लुगडे असा असे.१९७० नंतरच्या दशकात त्याची जागा पायजामा आणि स्त्रीयांनी सहावारी साडी क्रमपरत्वे पंजाबी आणि त्यानंतर आधूनिक काळात पाश्चिमात्य पोशाखाचा स्विकार केलेला आढळतो. नाटक आणि भाव संगीताची विशेष आवड असते.
सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरूषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे धोतर आणि स्त्रियांचा नउवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकात त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. आधुनिक काळात कोंकणस्थ स्त्रियांनी पंजाबी सलवार कमीज किंवा क्वचित पाश्चिमात्य पोशाखाचा स्वीकार केलेला आढळतो. कोंकणस्थांना नाटकाची आणि भावसंगीताची विशेष आवड असते.


चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विवीध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला.सर्व साधारणत: सुरवातीस सौम्य विरोध करून नव्या आधूनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम कोकणस्थ स्त्रीया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून जिवनातील सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसतात
चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला. सुरवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम सा झाला की आज कोकणस्थ स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनातील सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसतात.
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
<blockquote style="border: 1px solid blue; padding: 2em;">
कुलाबा गॅझेटियर CHITPAVANS are returned as numbering 8337 souls and as found in most parts of the district. Most of them are said to have been settled where they now are for several generations, and probably came to Kolaba during the time of the Peshwa's supremacy. They are about the middle size, fair, and their women graceful. They speak Marathi, and are clean, neat, thrifty, and orderly. A few are traders, but most are landlords, Government servants, and religious beggars. They own mud and stone built houses surrounded by gardens. Their every day food is rice, rice and wheat bread, pulse, vegetables, butter, and curds. They take two meals a day. The men wear a round peaked turban, coat, waistcloth and shouldercloth, and square toed shoos, and the women a robe and bodice. In religion they are Smarts, and observe the regular Hindu fasts and feasts. As a class they are well-to-do.<ref>http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1</ref>
कुलाबा गॅझेटियर CHITPAVANS are returned as numbering 8337 souls and as found in most parts of the district. Most of them are said to have been settled where they now are for several generations, and probably came to Kolaba during the time of the Peshwa's supremacy. They are about the middle size, fair, and their women graceful. They speak Marathi, and are clean, neat, thrifty, and orderly. A few are traders, but most are landlords, Government servants, and religious beggars. They own mud and stone built houses surrounded by gardens. Their every day food is rice, rice and wheat bread, pulse, vegetables, butter, and curds. They take two meals a day. The men wear a round peaked turban, coat, waistcloth and shouldercloth, and square toed shoos, and the women a robe and bodice. In religion they are Smarts, and observe the regular Hindu fasts and feasts. As a class they are well-to-do.<ref>http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1</ref>
ओळ ८५: ओळ ८५:
</blockquote>
</blockquote>


===पुजा अर्चना पद्धती===
===पूजा अर्चना पद्धती===
===सण===
===सण===
या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय / ब्राम्हण / हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधीत लेखात हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरती मर्यादीत चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.
या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय / ब्राम्हण / हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधीत लेखात हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरती मर्यादीत चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.

१२:५७, १५ मे २०१० ची आवृत्ती

या लेखातील सध्याचे काही लेखन मूळ लेखन या स्वरूपात मोडते. जोपर्यंत हे लिखाण विकिस्रोत या भावी सहप्रकल्पास उपयुक्त आहे, तोपर्यंत हे लेखन ही सूचना लावून मराठी विकिबुक्समध्ये साठवता येईल. मराठी विकिपीडियात या लेखनातील भाग ठेवण्याकरिता संपादकास सुयोग्य असे स्वत:च्या लेखनाचे सोडून इतर संदर्भ[ संदर्भ हवा ] देणे अपेक्षित आहे.

एन्थोवेन या ब्रिटिश समाजशास्त्रज्ञाने "मुंबई इलाख्यातील जाती' या ग्रंथात १३६ ब्राह्मण पोटजातींची नोंद केली आहे. "ज्ञानकोशा'त डॉ. केतकरांनी भारतात ब्राह्मणांच्या ८०० पोटजाती असल्याची नोंद केली आहे.) [१] त्यापैकी एक पोटजात म्हणजे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणांच्या पूर्वाश्रमीच्या ऐतिहासिक परंपरेमुळे त्यांच्या ऐतिहासिक उदयाबद्दल आणि महत्त्वाकांक्षांबद्दल त्यांचे अनुयायी, समर्थक आणि विरोधकांत या समुदाय विशेषाबद्दल कुतूहल आढळते

चित्तपावन शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती आणि दंतकथा

बर्‍याचदा चित्पावन/चित्तपावन या शब्दाचा अर्थ चितेतून पावन झाले आहेत ते असा घेतला जातो. कारण, चित्पावनांना भगवान परशुरामांनी कोकणात आश्रय दिला असे मानले जाते. समुद्रात १४ प्रेते तरंगत होती, परशुरामांनी त्यांना जिवंत केले आणि दीक्षा दिली. तेच चित्पावन ब्राह्मण असे समजले जाते. मात्र इतिहासाचार्य राजवाडे यांनी चित्पावनांचे मूळपुरुष हे अग्नि चयन करत व अग्नि(चित्य) चयनाने जे पावन झाले ते चित्पावन असे वर्णन केले आहे(म.श्री. दीक्षित संपादित ’आम्ही चित्पाव”).

’दंतकथा:परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करून घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे.[२]

काही अजूनपर्यंत शास्त्रीय/संशोधनाने सिद्ध आधार नसलेल्या मतानुसार चित्पावन ब्राम्हणांच्या प्रथा चाली-रीती पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारी भूमिहार ब्राम्हण, पंजाबचे मोह्यळ ब्राम्हण, केरळातील नंबुद्री ब्राम्हण, आंध्रप्रदेशातील हव्यक ,गुजरातेतील अन्विक ,उत्तराखंडाचे कुमाऊं ब्राम्हणांशी मिळत्याजुळत्या आहेत आणि या सर्व समुदायात परशुरामास विशेष सन्मान आहे. कोकणस्थ ब्राम्हणांचा त्रोटक उल्लेख कोब्रा असाही केला जातो.

अनुवंशशास्त्र आणि शरीरयष्टी

सर्व साधारणत: गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळे/हिरवे/घारे डोळे, तरतरीत नासिका यामुळे चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण वेगळे ओळखता येतात.

युरोपीय वैज्ञानिकांनी ब्राम्हणांच्या विविध गटांबद्दल जे अभ्यास केले त्यात, अनुमानांच्या अपेक्षेप्रमाणे कोकणस्थ ब्राम्हण, वाय गुणसूत्र परीक्षणांवरून इतर भारतीय ब्राम्हणी गटांपेक्षा वेगळे, आणि दक्षिणी युरोपातल्या, प्रामुख्याने फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लायबेरियन, आणि आयरिश लोकांच्या गुणसूत्रांशी जवळीक दर्शवणारे आढळले.[३]

कोकणस्थ ब्राम्हणांप्रमाणे दक्षिण इंग्लंडात बरेच जण अजूनही अंशतः मूळ आयरिश आणि फ्रेंच वाय हेप्लोग्रुप गुणसूत्रांचे आढळतात. कोकणच्या सागरी किनार्‍यावर प्रथमतः पोहोचणारे गोरे, उत्तम तब्येतीचे, मध्यम बांध्याचे, सौम्य ब्राऊन ते लाल केसांचे आणि घार्‍या अथवा हिरव्या डोळ्यांचे असावेत. असेच कोकणस्थ ब्राम्हण आजही असेच असतात.

अलीकडील अभ्यास (किविसिल्ड एट अल २००३,गायकवाड एट अल २००५), पोर्तुगी़ज आणि फ्रेंचांनी भारतातील काही भागावर राज्य केल्याच्या काळापासून, चित्पावनांच्या युरोपीय मूळाबद्दल शंका व्यक्त केली जात असे. तरीपण चित्पावनात इतरही वैविध्यपूर्ण गुणसूत्रांचाही प्रभाव आढळतो.

(Sahoo et al. 2006)नुसार चित्पावनांच्या वडिलांच्या बाजूस बर्‍याचदा आढळणारा (Y-DNA), R1a (Y-DNA) हा् हेप्लोग्रूप उत्तरी भारतीयांतसुद्धा सामन्यत: आढळतो. याचा अर्थ त्यांच्या प्राचीन पूर्वजांचे एक-समान असणे हे अजूनतरी न उलगडलेले कोडे आहे.

मिडल ईस्टर्न ओरिजिनचा समजला जाणारा J2 (Y-DNA) बर्‍याच उच्चजातीय भारतीयात आढळतो. (Sahoo et al. 2006).त्या अनुसार R2 (Y-DNA), L (Y-DNA), आणि H1 (Y-DNA) हेप्लोग्रुपांचे अस्तित्व प्राबल्याने मूळचे भारतीय समजल्या जाणार्‍या आणि पश्चिम व दक्षिण भारतात राहणार्‍या लोकांत आढळते.

त्यामुळे उपलब्ध पुराव्यावरून उपरोल्लेखित वर्णीय वैशिष्ट्ये आईच्या बाजूने आल्याची जास्त शक्यता आहे.[४]

गोत्रे

चित्पावनांची १४ गोत्रे आहेत. गोत्रांची नावे ही त्या गोत्रांचा मूळपुरुष असलेल्या विद्वान ऋषींची नावे आहेत. प्रत्येक गोत्रात अनेक उपनामांचा समावेश आहे. काही उपनामे ही एकापेक्षा जास्त गोत्रात आढळतात.[५]

गोत्रे प्रवर
कपि आंगिरसामहीवोरुक्षयसेति
काश्यप काश्यपावत्सारनैध्रुव
कौंडिण्य वासिष्ठमैत्रावरुणकौंडिण्येति
कौशिक वैश्वामित्रघमर्षणकौशिकेति
गार्ग्य आंगिरसशैन्यगार्ग्येति
जामदग्न्य भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
नित्युंदन आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
बाभ्रव्य वैश्वमित्रदेवरातौदसेति
भारव्दाज आङि्गरसबार्हस्पत्यभारद्वाजेति
वत्स भार्गवच्यावनाप्नवानौर्वजामदग्न्येति
वासिष्ठ वासिष्ठेन्द्रप्रमदाभरद्वस्विति
विष्णुवृद्ध आंगिरसपौरुकुत्स्यत्रासदस्यवेति
शाण्डिल्य शाण्डिलासितदैवलेति
अत्रि आत्रेयार्चनानसश्यावाश्चेति

कुलदेवता आणि पुजाअर्चा

चित्पावनांची मुळ कुळे ६० समजली जातात[ संदर्भ हवा ]. वर सांगितल्याप्रमाणे चित्पावनांत १४ गोत्रे आहेत. अंबेजोगाई येथील योगेश्वरी ही मुळ कुलदेवता आहे[ संदर्भ हवा ] व महालक्ष्मी, वज्राई या मागाहून[ संदर्भ हवा ] कुलदेवता म्हणुन स्वीकारल्या गेल्या आहेत.

संस्कृती, सामाजिक आणि आर्थिक

पेशवाईतील पगडी
पेशवाईतील पगडी

सर्व साधारणतः कोकणस्थ कुटुंबे सभ्य, उच्चशिक्षित, साध्या परंतु नीटनेटक्या राहणीमानाची, काटकसर करणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी म्हणून ओळखली जातात. सन १९५० च्या पूर्वी असलेल्या पिढ्यांत पुरूषांचा पोषाख मुख्यत्वे उपरणे व धोतर आणि स्त्रियांचा नउवारी लुगडे असा असे. १९७० नंतरच्या दशकात त्यांची जागा पुरुषांचा पायजमा किंवा पॅन्ट आणि स्त्रियांची सहावारी साडी यांनी घेतली. आधुनिक काळात कोंकणस्थ स्त्रियांनी पंजाबी सलवार कमीज किंवा क्वचित पाश्चिमात्य पोशाखाचा स्वीकार केलेला आढळतो. कोंकणस्थांना नाटकाची आणि भावसंगीताची विशेष आवड असते.

चित्पावन समाज महाराष्ट्रातील सामाजिक पुनरुत्थानाच्या विविध चळवळीचे पहिले लक्ष्य ठरत आला. सुरवातीस सौम्य विरोध झाला तरी हा समाज नव्या आधुनिक विचारसरणीला धरून सामाजिक सुधारणा सकारात्मकतेने अमलात आणत गेला. याचा मुख्य परिणाम सा झाला की आज कोकणस्थ स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून जीवनातील सर्व क्षेत्रात अग्रेसर दिसतात.

कुलाबा गॅझेटियर CHITPAVANS are returned as numbering 8337 souls and as found in most parts of the district. Most of them are said to have been settled where they now are for several generations, and probably came to Kolaba during the time of the Peshwa's supremacy. They are about the middle size, fair, and their women graceful. They speak Marathi, and are clean, neat, thrifty, and orderly. A few are traders, but most are landlords, Government servants, and religious beggars. They own mud and stone built houses surrounded by gardens. Their every day food is rice, rice and wheat bread, pulse, vegetables, butter, and curds. They take two meals a day. The men wear a round peaked turban, coat, waistcloth and shouldercloth, and square toed shoos, and the women a robe and bodice. In religion they are Smarts, and observe the regular Hindu fasts and feasts. As a class they are well-to-do.[६]

As a class Chitpavans are notable for their cleannes & for their neatness & taste in dress;their stingness,hardness & craftiness are also proverbial.Chitpavans are beyond doubt one of the ablest class in Western India.They were the mainstay of the Maratha power when the maratha power was as its highest. in 1727 the nizam foundevery place filled with konkan brahmans;in 1817 Mr.Elphinstone found all leading brahmans in the poona Government connected with konkan.Under English they have lost much of the power which for the century they enjoyed.still their superior intellect, their eagerness for education & the high position they hold in government service enable them to maintain their superemacy in all marathi-speaking districts.beyond the limits of western india. their talents are admired & respected.[७]

पूजा अर्चना पद्धती

सण

या विभागातील ज्या चालीरिती इतर भारतीय / ब्राम्हण / हिंदू चालीरितींशी मिळत्या जुळत्या असतील त्या येथून इतर संबंधीत लेखात हलवण्यात सहकार्य करावे व येथे केवळ चित्पावन कोकणस्थांच्या पुरती मर्यादीत चालीरितींचा समावेश करावा इतर भाग वगळावा.

नवरात्रात

नवरात्रात (अष्टमीला) कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुंकल्या जातात. सकाळी सोवळ्यात सुवसिनि बायका श्री महलक्ष्मीची पूजा करतात. तिन्हि सांजेला श्रीमहालक्ष्मीचा मुखवटा तयार करुन त्याची पूजा करण्यात येते. आणि त्यानंतर घागरी फुंकण्याला सुरुवात होते. मध्यरात्रि १२ वाजेपर्यंत हा अष्टमीचा खेळ चालतो.

संक्रांत

संक्रांतीचे वाण पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात. त्याला सुगडे असेही म्हणतात. काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणेही असतात. ही वाणं सवाष्णीला दिली जातात. एक देवाजवळ, एक तुळशीजवळ ठेउन व मग तीन सवाष्णींना आपल्या घरी बोलवून वाण दिले जाते. काही बायका छोटी बोळकी देतात. काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देतात. त्याला 'सुगडे' म्हणतात. बहुतेक कोकणस्थ ब्राह्मणांकडे सुगडे देण्याची प्रथा आहे.

लग्नानंतरची पहिली पाच वर्षे महिला 'पाटावरची वाणं' देतात. म्हणजे, वरचे सर्व पदार्थ, तिळगूळ, हळदकुंकू या वस्तू तीन सवाष्णींच्या घरी जाऊन देवासमोर पाट मांडून त्यावर ठेवल्या जातात. या काळात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात. त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात. या वस्तू 'लुटल्या' जातात. पूर्वी काही ठिकाणी 'सोरट' करत असत. 'सोरट'मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मांडून ठेवतात व समोरच्या वाडग्यातील चिठ्ठयांमधून एक चिठ्ठी निवडून त्यात असलेली वस्तू त्या सवाष्णीला कुंकू लावून देतात.[८]

गौरी-गणपती

गौरी[९] मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने( न बोलता) चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी, ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर कोमट पाणी घालून, हळद कुंकू लावून, मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवार्ष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली ग सोन्या-मोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठ्यावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवाष्णींनी उंबरठ्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवतात. खोबर्‍याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा,गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुसर्‍या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.

तिसर्‍या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.

तिसर्‍या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी 'उतरवतात' म्हणजे त्यांचे विसर्जन करतात.

अनंत चतुर्दशी (भाद्रपद शुद्ध चतुर्दशी)

अनंत चतुर्दशी हे व्रत अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली तरच, मागून घेतात. ओळीने चौदा वर्षे हे व्रत करण्याचा प्रघात आहे. सर्व व्रतांमध्ये अनंत।अनंताचे व्रत कडक आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात. शुद्ध पाण्याने ताम्रकलश चौरंगावर मांडून त्यास दोन छोटे रूमाल गुंडाळतात. त्यावर दर्भ।दर्भाचा शेज तयार करून ठेवतात. कलशावरील पत्रांत अनंताची प्रतिमा किंवा शाळिग्राम मांडून षोड्शोपचारे पूजा करतात. समंत्रक चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेशमाचा दोरा बनवून त्याची पण पूजा करतात. पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधतात. त्यानंतर अनंताची कथा भक्तिभावाने ऐकतात. रात्री मंत्रजागर, गाणी इ. कार्यक्रम करतात. अशा प्रकारे चौदा वर्षे अनंताचे व्रत करतात. त्याने इच्छित फळ प्राप्त होते असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते.

दसरा - सीमोल्लंघन (आश्विन शुद्ध दशमी)

नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा पवित्र अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.

या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युद्ध करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी विशेष महत्त्व आहे.उत्तर भारत।उत्तरभारतात या दिवशी रावण।रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटा।आपट्याच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात.

या दिवशी घरातील कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. आपट्याची सोनेरुपी पाने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी, साम्राज्य-वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.

या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.

खानपान

खालील दुवा अधीक माहिती करिता वापरता येईल उकडीचे मोदक,उकडीच्या करंज्या

भाषा

चित्पावनांची स्वतःची चित्पावनी नावाची कोकणी भाषेची उपबोली भाषा होती [१०]. १९५०च्या दशकानंतर ह्या भाषेत बोलणार्‍या महाराष्ट्रातील् लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली असली तरी, आजही गोवा आणि कर्नाटकाच्या दक्षिण कानडा जिल्ह्यातील चित्पावन आपल्या कुटुंबांमध्ये ही बोली टिकवून आहेत. ऑर्कूटसारख्या माध्यमातून चित्पावनी भाषेचे पुनरज्जीवन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशावरील चित्पावन ब्राम्हणांनी सर्वसाधारणतः चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला.चित्पावन ब्राम्हणांचे संस्कृत भाषेवर सुद्धा लक्षणीय प्रभूत्व असे. चित्पावनी भाषेतील मूळ सानुनासिक उच्चारांचा प्रभाव चित्पावनांच्या मराठी बोलण्यावर आढळतो. अर्थात हा मुद्दा वगळल्यास चित्पावन बोलत असलेली मराठी प्रमाण मराठी भाषेच्या जवळपास असते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र चित्पावनांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाकरिता प्राथमीक स्तरापासूनच्या इंग्रजी शिक्षणाचा वापर प्रामूख्याने चालू केल्यामूळे तसेच मोठ्या प्रमाणावर परदेशातील स्थलांतर किंवा स्थलांतराच्या स्वप्नामूळे मराठी भाषेचा वापर नवीन पिढीत बोलीभाषेपुरता मर्यादीत होत चाललेला आहे.

चित्पावनी बोलीतील काही शब्द

चेड (मुलगी), बोड्यो (मुलगा), कें (कुठे), कितां (काय), सां (आहे), में (मी), विन्चां (संध्याकाळ), नय (नदी), थेयलां (ठेवले), घेव्नी (घेऊन), येचां (येणारा), हाड (आण), ओखद (औषध), चखोट (चांगले), पेख (थांब), आत्वार (स्वयंपाकघर), नाकां (नको), यठां (ईथे), कई (कधी), बोलसें (बोलतो).

[११]

व्यवसाय आणि अर्थकारण

पेशवाईपूर्व काळात कोकणविभागात मुख्यत्वे स्थानिक समुदाय शेती व भिक्षूकी वर निर्भ्रर होता तुरळक प्रमाणात प्रशासकीय जबाबाबदार्‍यांचा समावेश असे.पेशवाई काळात थोडा बदल होऊन सरदारकी तसेच सैन्यातील कामे वाढली, प्रशासनातील कारकुनी कामातही वाढ झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भिक्षूकांची स्थिती सुधारली. सुधारलेल्या स्थितीचा उपयोग करून अपवादात्मक उद्योग व्यवसाय करण्याचे जे प्रयत्न झाले ते तात्कालीक स्वरूपाचे ठरले.

आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेला हा समाज पेशवाई नंतर लौकरच इंग्रजी प्रशासनात इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवून शासकीय क्षेत्रात रमला.इंग्रजांनी सुद्धा सुरवातीला थोडा संशय बाळगला तरी लौकरच त्यांना प्रशासनात सामील करून घेतले.

हा समाज स्वातंत्र्यानंतर पहिली २०-२५ वर्षे पर्यायी पुरेशा प्रशिक्षीत माणूस-बळा अभावी,राजकीय चळवळीतून बाहेर पडलेल्या लोकसंख्येसहीत शासकीय नौकर्‍यांवर अधिकच अवलंबित झाला. परिणामी, अभियांत्रीकी आणि वैद्यकीय अशा क्षेत्रातील आपला प्रभाव टिकवण्याकरिता या समाजाने मुलांना कमालीच्या शैक्षणीक स्पर्धेत लोटून शैक्षणीक उच्चांक प्रस्थापीत केले. पण, ऐंशीच्या दशकानंतर राजकीय दृष्ट्या जागरूक झालेल्या व पुरेसे शिक्षण उपलब्ध नसलेल्या बहूसंख्य समाजाने ब्राम्हणेतर राजकीय चळवळीच्या माध्यमातून शासकीय क्षेत्रात आरक्षणे पदरात पाडून घेतली. त्याच वेळी शुन्याधारीत अर्थसंकल्पांच्या आणि खासगीकरणच्या संकल्पना शासकीय क्षेत्रात राबवल्या गेल्यामुळे इतर ब्राम्हणांसमुदायासमवेत चित्पान समाजाने शासकीय नौकर्‍यांवरून लक्ष विकेंद्रीत केले. उच्चशिक्षण उपलब्ध होऊ शकलेल्या बहुसंख्यांनी परदेशाचे रस्ते पकडले.सन १९९० नंतर भरभराटीला आलेल्या खासगी क्षेत्राने, बहुसंख्य चित्पावनांना खासगी क्षेत्रातील नौकरी सामावून घेतले, तरी पाश्चात्य देशात स्थानांतर हे त्यांचे ध्येय होत गेले आहे. अत्यल्प प्रमाणात स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचाही मार्ग चित्पावनांनी चोखाळला. या प्रयत्नातही त्यांना यश आले तरी बहुतेक भारतातील आणि परदेशातील चित्पावनांचा ओढा नौकरी व्यवसायाकडेच रहात आला आहे.

या समुदायाचे बरेच लोक बँकिंग, विपणन, माहिती तंत्रज्ञान , अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात आढळतात.

इतिहासाचा मागोवा

पेशवाई पूर्व

कोकणस्थ पहिल्यापासून बुद्धिमान, आहेत व कोकणात १८०० वर्षांपासून राहात आहेत, तर त्यांचे नाव इतिहासात पेशवाईपूर्वी का दिसत नाहीत, याच्या कारणाबद्दल बरीच चर्चा होते. पूर्वी ब्राह्मण राजकारणात जात नव्हते. कोकणस्थांत वेदाध्ययन करुन स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते.[१२]या संदर्भात वि. का. राजवाडे लिहितात,

'चित्पावन ब्राह्मण भारतवर्षाच्या राजकीय क्षितिजावर एकोकी व अकस्मात उगवलेले स्थूलदृष्टीला दिसतात. सामान्यत: असाही समज आहे की, कोणत्याही प्रकारचे पूर्वचिन्ह न दाखविता किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हा समाज दैवयोगाने ऐश्वर्यारुढ झाला, पण असा चमत्कार इतिहासाला परिचित नाही. इतकेच काय सृष्टीलाही परिचित नाही. वास्तविक सूक्ष्म शोध घेतला असता असे आढळून आले आहे की, चित्पावनांची उद्योन्मुखता आस्ते आस्ते व क्रमाक्रमानेच होत आली आहे. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावनांना परशुरामाने कोकणात आणून बसवले तेव्हा ते फक्त १४ जण होते. शकपूर्व १२०० ते शकोत्तर १२०० पर्यंतच्या २५०० वर्षांत चित्पावनांची लोकसंख्या इतकी थोडी होती की, हिंदुस्थानच्या राजकारणांत हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. त्यांची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. प्रजावृद्धी होण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. शके १२०० नंतर मुसलमानी अमलात लौकिक व्यवहार चित्पावन उचलू लागले, तसतसे त्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढू लागले व जास्त प्रजा पोसण्याची शक्ती त्यांच्या ठायी आली. बुद्धी तर होती व या बुद्धीला काही प्रमाणात संपत्तीची व प्रजावृद्धीची जोड मिळाली, तेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची शक्ती उत्पन्न झाली. ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला.'[१३]

पेशवाई

चित्पावनांचे मुळपुरुष साधारण ३००० वर्षांपुर्वी कोकणात स्थायिक झाले असावेत[ संदर्भ हवा ]. उत्तरेतुन ६२ कुल यज्ञाच्या निमित्ताने पैठण, कर्नाटक व अखेर कोकणात आली.


शिलाहार कालीन ताम्रपटात अथवा शिलालेखात "घैसास" हे चित्पावनी आडनाव आले आहे. त्याचा "घळीसास" असा अपभ्रंश देखिल मिळतो[ संदर्भ हवा ]. या नंतर कशेळीतील कुलकर्ण्याचे दफ्तरात जामिनकीच्या कागदावर काही साक्षी आहेत, हा कागद शके १५२०/२२ च्या दरम्यानचा आहे[ संदर्भ हवा ]. त्यात भानजी गणपुला, सिवाभट रानडीया, गणो विठ्ठल पराणजप्या, गाव खडीकर व ढवळे ही नावे दिसतात. हे पाच जण फणशे आणि सेजवळकर या दोन कर्‍हाड्यांना २१५२/- रुपयांना जामिन राहिले होते. याचाच अर्थ या घटनेतील ३ चित्पावन हे सुस्थितित आणि समाजात मान असलेले होते[ संदर्भ हवा ].

या पेक्षा जुना उल्लेख चिपळूणच्या कुलकर्ण्याचा आहे, यावरुन गावातले ’कुलकर्णीपद’ हे चित्पावन सांभाळत होते[ संदर्भ हवा ]. हे चित्पावन काळे नामक असून नरसीपंत काळे यांच्यापासून १४७० च्या सुमारास सुरु झालेली वंशावळ विनजी नरसी(१५००), पर्शराम विनजी(१५३०), काळो पर्शराम ते अंतो काळो(१५८०) इथपर्यंत मिळते. याचाच अर्थ शके १४७० किंवा त्या अगोदर पासूनच नरसीपंत काळे यांनी चिपळूणचे कुलकरणपद सांभाळले होते[ संदर्भ हवा ].

याच बरोबर पावस येथे जोश्यांच्या कागदपत्रात शक १५४० मधील कौलनाम्यात म्हंटले आहे - "पावसच्या जोश्य़ांचे जोसपण कदीम मिरास आहे." म्हणजे ते किमान २५०-३०० वर्षांपूर्वीचे असावे. याच जोश्यांच्या कागदपत्रात १५५० मधील खरेदीपत्रावर काही चित्पावनी नावे आहेत - विश्वनाथ भट, दादभट देसाई, बामनभट देसाई, बाल सोवनी सराफ, हरीभट अभैकर(अभ्यंकर), गणेसभट महाजनी. म्हणजे १५५० मध्ये गावातील सराफ, महाजन, देसाई हे चित्पावन होते. १५५६ मधील ह्याच जोश्यांच्या एका कागदावर खालील सह्या आहेत - हरभट अभैकर(अभ्यंकर), कानभट फडका, माद जोशी. म्हणजे १५५६ मध्ये चित्पावन गावच्या खोताचे काम करत असत, कारण हा कागद ’हजरमजालसीचा’ आहे.

राजापूर जवळ मीठगव्हाणे येथील त्या मीठगव्हाणाचे देसाईपण चित्पावनांकडे आहे. हा कागद १५५२ मधील आहे[ संदर्भ हवा ]. दंडाराजपूरी व श्रीवर्धन येथील’भटांच्या’ घराण्यातील देशमुखी अशीच पुरातन आहे. ती त्यांना १४०० च्या आसपास मिळाली असावी, असे पेशव्यांच्या नंतरच्या पत्रव्यवहारातून दीसुन येतो[ संदर्भ हवा ]. तात्पर्य चित्पावन अगदीच ’धुमकेतु’ प्रमाणे प्रकट झाले अशातला भाग नक्कीच नाही. शिवछत्रपतींच्या हाताखाली देखिल ’केळकर’ नामक बांधकामातील तज्ञाचा उल्लेख मिळतो[ संदर्भ हवा ]. शिवाय ’मोकाशी’ नामक एका मनसबदाराची नोंद मिळते[ संदर्भ हवा ]. त्यांच्या वकील आणि दफ्तरी कामात देखिल काही चित्पावनी नावे आहेत[ संदर्भ हवा ]. सिंधुदुर्गाचे भूमीपूजन ’अभ्यंकर’ नामक गुरुजींनी केल्याचा उल्लेख आहे[ संदर्भ हवा ]. याच बरोबर दिवे-आगार येथिल ’बापट’ यांना जंजिर्‍याच्या सिद्दिने मनसब दिल्याचे समजते. आजही त्यांचे वंशज आजही स्वत:ची वाडी आणि वाडा सांभाळत उत्तम संसार करत आहेत{{हे वाक्य काल निरपेक्ष कसे करता येईल ते पाहावे)[ संदर्भ हवा ]. म्हणजेच नेहमीच्या पंचा-पळी-पात्राच्या बरोबर चित्पावनांनी साधारण शके १२०० नंतर शिलाहार राजाच्या शेवटच्या काळात कुलकरण, जोसपण, खोती, महाजनकी, देशमुखी, सराफी व देसपांडेपण सांभाळत होते.

शिवकालात ज्या चित्पावनांचा उल्लेख मिळतो ते सुभेदार, तंत्रज्ञ, खोत, कुलकर्णी, देसाई असे आढळतात[ संदर्भ हवा ]. मात्र दरबारी ऊठबस करणार्‍यात चित्पावन दिसत नाहीत[ संदर्भ हवा ]. या शिवाय नाशिक पैठण येथील ब्रह्मवृंदात देखील चित्पावनांचा उल्लेख क्वचितच आढळतो[ संदर्भ हवा ]. बाळाजी विश्वनाथापूर्वी वैद्यविलास, छंदोरत्नावली, कविकौस्तुभ इत्यादि ग्रंथ रचणार्‍या चंपावतीच्या(चौल)रघुनाथ मनोहर नामक चित्पावनाचा उल्लेख मिळतो,हा रघुनाथ मनोहर शिवरायांच्या काळातला आहे[ संदर्भ हवा ].


बाळाजी विश्वनाथाच्या इतिहासापासून चित्पावनांच्या इतिहासाची ठळक नोंद मिळते.

’चित्पावनांचा’ भाग्योदय

१७०७ पासुन पुढे १७२० पर्यंत म्हणजे मृत्युपर्यंत बाळाजीने छत्रपती शाहू महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. छत्रपती शाहू महाराजांनीच बाळाजीला "पेशवेपद" दिले, अर्थात तो त्या योग्यतेचा होताच, आणि ते पद त्याने सहजगत्या पेलले. इथूनच ’चित्पावनांचा’ भाग्योदय झाला.

ब्रिटीश काळ स्वातंत्र्य लढा आणि चित्पावन

१८५७च्या स्वातंत्र्यसमराची तयारी कीमान ३-४ वर्षे आधीच चालु होती आणि आम्हाला याची कुणकुण मंगल पांडे यांच्या फाशी नंतरच आली असे खुद्द ब्रिटीशांनीच कबुल केले. म्हणजे यात कीती सुसुत्रता होती हे समजेल. मात्र ३१ मे १८५७ ऎवजी १० मे १८५७ रोजीच ही आग भडकली. मंगल पांडे हा सैनिक या युध्दातिल पहीला हुतात्मा ठरला. सुरुवातीला भारतीयांना मोठे विजय मिळत गेले, झाशीची राणी, तात्या टोपे, कुंवरसिंह यांनी अतुल पराक्रम केला. सर्वांनी बहादुरशहा यांस आपला नेता बनवले व दिल्लीच्या तख्तावर बसवले. मात्र हा उठाव नंतर विस्कळीत झाला. दुर्दैवाने हे स्वातंत्र्यसमर इंग्रजांनी अतिशय निर्दयपणे चिरडुन टाकले. क्रांतिकारकांचे जथ्थेच्या जथ्थे फासावर जात होते, तोफेच्या तोंडी जात होते. झाशीच्या राणी सारखे धुरेचे वीर आणि वीरांगना धारातीर्थि पडल्या, या संपुर्ण उठावात पेशव्यांचे सेनापति असलेले आणि काल्पीचा कील्ला ज्यांनी सर केला ते तात्या टोपे पकडले गेले इंग्रजांनी त्यांना फासावर दिले, बहादुरशहा काळ्यापाण्याच्या शिक्षेवर पाठवण्यात आले. सगळीकडे परत अंधार पसरला. नानासाहेब कानपूर येथुन निसटुन नेपाळ येथे गेले. पुढे नानासाहेब शेवट्पर्यंत भुमीगत राहुन परत सगळ्याची जुळवाजुळव करत होते याचे अनेक पुरावे आज प्रकाशात आले आहे. मात्र त्यात फारसे यश आले नाही. नानासाहेबांचे स्वातंत्र्यसमरा नंतरचे वास्तव्य नेपाळात कुठे होते ते परत भारतात येऊन गेले का? या बाबत इतिहास मुक आहे. मात्र नानासाहेब पेशवे अखेरपर्यंत अपराजित ठरले. इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी जंग जंग पछाडले पण त्याचा काही एक फायदा झाला नाही. या युध्दात नानासाहेबांचे बंधु बाबासाहेब आणि पुतणे रावसाहेब त्यांच्या मदतीस होते, त्याच बरोबर ग्वाल्हेरचे सरदार आपटे, ग्वाल्हेरचे प्रधान रावराजे दिनकरराव राजवाडे यांनी मदत केली. अगदी नानासाहेबांना सटकता यावे म्हणुन तात्या टोप्यांचे सहकारी "श्री भागवत" यांनी स्वत:ला नानासाहेब भासवुन अटक करवुन घेतले आणि फासावर गेले. परत जुळवाजुळव करताना एखादा प्रांत आपल्या ताब्यात असावा म्हणुन नानांनी त्रयस्थाकडुन वर्‍हाडात जागा घेण्याचा प्रतत्न देखिल केला. पुढे १८८० मध्ये अण्णासाहेब पटवर्धनांनी असाच प्रयत्न केला होता. या सगळ्या उल्लेखांच्या मागचा उल्लेख १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामात व नंतर चित्पावनांचा सहभाग लक्षात यावा.

स्वतंत्र्य लढ्यातील चित्पावनांचा जहाल दृष्टिकोण आणि सशस्त्र प्रतिकार

चित्पावनांचा सनदशीर मार्गाने राजकीय उद्योग चालू होताच, परंतु चित्पावनात 'जहाल दृष्टीकोण असलेले लोक पण बरेच होते त्यांचा सशस्त्र प्रतिकारावर अधीक विश्वास होता. चाफेकरबंधूंनी रॅन्डचा काटा काढला व नथुराम गोडसे हा बहुधा शेवटचा जहाल असावा. [१४]

वासुदेव बळवंत फडके

फारच निष्ठूरपणे १८५७चे स्वतंत्र्यसमर चिरडल्यावर इंग्रजांना वाटले की चला "वणवा" विझला. पण "वासुदेव बळवंत फडके" नावाचा अंगार धगधगु लागला. १८७६ मध्ये काही रामोशींना हाताशी घेउन त्यांनी आपले क्रांतिकार्य सुरु केले. फडक्यांना पकडुन देणार्‍यासाठी सरकारने बक्षीसे जाहीर केली, याला प्रत्युत्तर म्हणुन या "आद्यक्रांतिकारकाने" इंग्रज अधिकार्‍यांच्याच डोक्यावर दुपटिने बक्षीस लावल्यावर मात्र ब्रिटिश हादरले. दुर्दैवाने २७ जुलै १८७९ रोजी मेजर डॅनिअल याने देवरनावडगी येथे एका देवळात झोपलेल्या या नरकेसरीस अटक केले. त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावुन ’एडन’ येथिल कारागृहात पाठवले. तिथेही ते तुरुंगातुन निसटले, पण तेथुनही ते निसटले मात्र अनोळखि मुलुख, भाषा अनोळखी ते लगेच पकडले गेले. १७ फेब्रुवारी १८८३ रोजी तुरुंगातच त्यांचे निधन झाले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

१८५७ च्या झळीने ब्रिटीश सावध झाले होते. दाबुन ठेवलेला राग अश्या भयानक स्वरुपात बाहेर येतो हे समजल्यावर मिस्टर ह्युम यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केली, आणि भारतियांचा लोकशाही पध्दतीत प्रवेश झाला. इथे देखिल राजकारणात चित्पावन तडफेने पुढे आले. अर्थात पहीले नाव "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक." बृहस्पतिनेही शिष्यत्व पत्करावं अशी अनेक नररत्ने चित्पावनांत जन्माला आली, त्या सगळ्यांचे हे मुकुटमणी ठरावेत इतकी प्रचंड आणि अलौकिक बुध्दिमत्ता टिळकांपाशी होती. यांनी केसरी वृत्तपत्राची स्थापना करुन त्याचे संपादकपद सांभाळले, पत्रकारीतेने काय घडवले जाऊ शकते हे त्यांनी दाखवुन दिले. ’उजाडले पण सुर्य कुठे?, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे विचारुन सरकारला वारंवार धारेवर धरुन ताळ्यावर आणले. यांचा जनमानसावर इतका प्रभाव होता कि टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा भारतातील पहीला संप मुंबईत घडुन आला. टिळकांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, ब्रह्मदेशात रंगुनच्या उत्तरेस मंडालेयात त्यांची रवानगि झाली. त्याकाळी कुठे पुण्यात काहीही घटना घडली कि त्यास टिळक आणि कंपनी जबाबदार आहेत याची पुर्ण कल्पना इंग्रजांना असायची पण ते पुराव्यानिशी शाबित नाही करु शकायचे. बर काहीबाही करुन आरोप लावावेत तर भर कोर्टात "स्वराज्याच्या जन्मसिध्द हक्काची" गर्जना व्हायची, म्हणजे परत सरकारचीच लक्तरे. त्यामुळे इंग्रज "लाल पगडीला" फारच वचकुन राहु लागले. ह्या माणसाचे डोके कधी-कुठे चालेल याचा नेम नव्हता - इंग्रजांनी भारतीयांना संपुर्णपणे निशस्त्र करण्यासाठी फतवा काढला की "कोणीही कोणतेही विनापरवाना शस्त्र किंवा अगदी लाठी देखिल जवळ बाळगु नये." लोकांना आपल्या सुरक्षीततेची काळजी वाटु लागली, सल्ल्यासाठी ते टिळकांकडे गेले त्यांनी विचार करुन सांगितले - "शस्त्र नाही? लाठी देखिल नाही? बर खाण्याच्या कोणत्या गोष्टीवर नाहीना आलिये बंदि? मग "उस" बाळागत जा! लाठीचे काम देखिल होइल, कायदा देखिल नाही अडवु शकणार!". यांच्या असामान्य बुध्दिमत्तेविषयी अजुन एक उदाहरण म्हणाजे सुरुवातीला "गीतारहस्य" हा इंग्रजांनी तपासकामासाठी आपल्या ताब्यत घेतला नंतर त्यात आक्षेप घ्यावा असे काहिहि न आढळल्याने ते हस्तलिखित परत करण्यात आले तेव्हा त्यांना जवळच्या सहकार्‍याने विचारले "तो त्यांनी जप्त केला असता तर?" त्यावर टिळक उत्तरले - "तर काय? सिंहगडावर २ महिने राहुन जसाच्या तसा उतरवुन काढला असता!"


चित्पावनांबद्दल तर इंग्रजात इतकी दहशत बसली होती की "चित्पावन" म्हणजे काहितरी भयंकरच, अतिशय घातकी माणसे असे इंग्रज चित्पावनांचे वर्णन करत. कारण त्यांना माहीत होते कि सहसा आपल्या खिशाला हात न लागु देणारी ही माणसे, देशासाठी मात्र गळ्याला फास लावुन घेउ शकतात. एकाच घरातील ३ बंधुंनी बलीदान करायची परंपरा "चापेकरांनी" चालु केली व चापेकरांच्या बलीदानाने प्रभावित होऊन तीच परंपरा "मारता मारता मरेतो झुंजेन" या निश्चयाने सावरकर बंधुंनी चालु ठेवली. विश्वनाथ वैशंपायन उर्फ बच्चन हे भगतसिंगाचे महत्वाचे सहकारी होते. जॅक्सन वधाच्या केसमध्ये सुध्दा "मित्रमेळा" अथवा "अभिनव भारत" या संघटनेशी संबधित क्रांतिकारक - वि.दा.सावरकर, अनंत कान्हेरे, त्र्यंबक मराठे, गोपाळ पाटणकर, सोमण, केळकरशास्त्री, वामन जोशी, वैद्य, कर्वे, दांडेकर, गोरे, भट, केतकर, बाळ, वर्तक असेच होते. जॅक्सन खटल्याची सुरुवातच ’एक सोडुन सर्व ब्राह्मण असलेले आरोपि’ अशीच आहे. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी शाहू छत्रपतींनी स्टॅन्ले एजरली यांना पत्र लिहुन ’नाशिक, कोल्हापुर बेळगाव व पुणे जिल्ह्यातिल ब्राह्मणांच्या दृष्टिकोनाची परीणिती भयानक हिंसक कृत्यात होईल,’ असा धोक्याचा इशारा दिला होता. ब्राह्मणेतर कटवाला आढळला तर त्याचे नाविन्य फार होते! असे शेरेहि काहिंनी मारले आहेत. या घटनांमुळे इंग्रजांच्या पायाखालची जमिन सरकली. १८५७ मध्ये नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधु, मग वासुदेव बळवंत फडके, मागोमाग चापेकर बंधु हि अशी मारुतीची शेपुट वाढतच होती आणि इंग्रजांच्या लंकेला ती जाळत सुटली होती. एक वेळ वहाबी मुस्लिम परवडले पण हे पुणेरी चित्पावन नकोत. आणि या सगळ्यांचे प्रेरणा स्त्रोत "टिळक".

आधीच ब्राह्मण, त्यात पुणेकर, त्यातहि कोकणस्थासी धरा। यांनी गोरा ठार मारीला कोणाला तरी कैद करा॥

असे एक पद इंग्रजांच्या तोंडि घालुन मित्रमेळ्यात एक पद गाजले होते.


इंग्रजांनी या पुणेरी चित्पावनांचा धसका घेतला होता. १८८२ मधील मुंबईचे गव्हर्नर रीचर्ड टेंपल "men & events of my times in India" या आपल्या ग्रंथात लिहितो - "ते आपल्याकडुन नवनविन विषय शिकतील, ते आत्मसात करतील आणि तरीहि स्वत:ची वैयक्तिकता टिकवतील. सार्वजनिक सभा नावाचा हा गट दांभिक असेलहि पण निश्चित्पणे अभिनव आहे."

बामफिल्ड फुल्लर हे पूर्व बंगालचे ल्व्फ्टनंटा गव्हर्नर होते "Studies in Indian life & sentiments" या पुस्तकात ते म्हणतात - "एका शतकापूर्वी आपण मराठा मंडळिंच्या चलनवलनाचे चैतन्य होतो हे विसरु शकत नसलेले पश्चिम किनारपट्टिवरील ब्राह्मणच या शत्रुत्वाचे खरे पुरोहित आहेत."

रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी "The aweaking of India" मध्ये लिहिले आहे "आपण याची आठवण ठेवली पाहिजे कि, मराठि ब्राह्मणांमध्ये त्यांच्या सत्तेचा विनाश होऊन शतकहि उलटले नसल्याची तीव्र भावना अद्यापहि वसत आहे. त्यांनी जिंकलेल्या लढाया आद्याप त्यांच्या स्मरणात ताज्या आहेत आणि प्रत्येक डोंगरावरुन वाकुल्या दाखवणारे त्यांचे किल्ले या आठवणी हिरव्यागार ठेवत आहेत. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवाद हा अन्य कोणत्याहि गटापेक्षा अधिक व्यक्तिगत आणि अधिक कडवट आहे."

मराठ्यांचे साम्राज्य तर ’चित्पावन साम्राज्य होते असे नमुद करुन व्हॅलेंटाइन चिरोलनी ’Indian unrest' मध्ये चित्पावनांबद्दल म्हणतात - "नवीन परीस्थितीशी जुळवुन घेण्यात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाश्चात्य शिक्षणाचा फायदा करुन घेण्यात ते तत्पर आहेत. नाना फडणवीसांच्या काळाप्रमाणे आजहि दक्षिणेतील प्रत्येक सरकारी कचेरीत चित्पावनांनीच गर्दि केली आहे. ते न्यायासनांवर बसतात, वकिल मंडळित त्यांचेच वर्चस्व, शाळांत शिक्षक तेच, एतद्देशीय पत्रसृष्टिवर नियंत्रण ठेवतात. पश्चिम भारतातील आधुनिक नाटक आणि साहित्य त्याचप्रमाणे राजकारणात तळपणारी नावे त्यांनीच पुरवली आहेत."

टिळकांच्या लोकमान्यतेचा प्रत्यय १९०८ च्या खटल्यात पुरेपुर आला. "राजद्रोहि" तो "लोकमान्य" आणि "राजमान्य" तो "लोकद्रोहि" असा समज तेव्हा रुढ झाला. आणि "राजद्रोह्यांमध्ये" बहुसंख्य अर्थातच चित्पावनच होते.


संपुर्ण चित्पावनांची परंपरा बघितल्यास "लोकमान्य, असंतोषाचे जनक, आद्यक्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर, हिंदुह्र्दयसम्राट" अशी बिरुदे वागवणार्‍यांची नावे मिळतील, त्याच बरोबर "महर्षी, न्यायमूर्ती, शिक्षणमहर्षी, आचार्य, भारताचार्य, इतिहासाचार्य" अशी समाजिक आब राखणारी नावे देखिल मिळतील. चित्पावनांनी खरोखर चहुबाजुंनी शरादपी-शापादपी करुन दाखवली आहे. अगदी राजकारण-समाजकारण-साहित्य यात एकहाती चळवळ चालवणारे वीर सावरकर हे तर याचे सर्वोत्तम उदाहरण ठरावेत. अगदि फाळणीला त्यांनी कडाडुन केलेला विरोध किंवा अस्पृश्यमुक्ती चळवळ आणि वेळोवेळी शस्त्र सामर्थ्याचा केलेला गौरव हा समस्त जनांना माहीत आहेच.


चित्पावनांचा राजकारण सहभाग


बहुसंख्य चित्पावन हे हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात. विशेष असा की, पुरोगामित्वातही ते मागे नाहीत. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी चित्पावन नेते कितीतरी होऊन गेले, अद्याप आहेत.' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत हे अगदी खरे आहे. पण हिंदुत्ववादी संघटनांमध्ये 'संघ परिवार' मोठा आहे व या संघटनेत अनेक चित्पावन आहेत. पण माझे निरीक्षण असे आहे की, या परिवारात चित्पावनांना नेतृत्व दिले जात नाही. या परिवारात देशस्थ अथवा कर्‍हाडे यांना नेतृत्व दिले जाते. उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रत प्रमोद महाजन, पुण्यात प्रकाश जावडेकर व माजी खासदार अण्णा जोशी व नागपूर विदर्भात नितीन गडकरी, पण दुर्दैवाने संघ- परिवारातील चित्पावनांना आपण डावलले जातो व आपल्याला जास्त पुढे येऊ दिले जात नाही, हे राजकारण लक्षातच येत नाही!

[१५]

चित्पावनांचा समाजकारण सहभाग

सामाजिक चळवळीत देखील चित्पावन नेहमीच पुढे राहीले आहेत. गणेशोत्सव आणि शिवजयंती ह्या दोन चळवळी चालु करणार्‍या टिळकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. भाषाबंदि, रोटीबंदि सारख्या बेड्यांनी जखडलेल्या समाजाला जागे करण्याचे काम सावरकरांनी रत्नागिरीत राहुन केले. जात्योच्छेदनाची चळवळ सावरकरांनी मोठ्या दणक्यात चालवली होती. शिवाय आगरकर, लोकहितवादिंनी केलेले समाजकार्य कौतुकास्पद आहे. राष्ट्रसेविका लक्ष्मीबाई केळकर हे देखिल स्त्री-सबलिकरणाचे उत्तम उदाहरण आहे, ज्या काळात स्त्रिया सहसा बाहेर पडत नसत त्या काळात त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या मार्गदर्शना खाली "राष्ट्रसेविका मंच" स्थापन केला. आज १०,००० पेक्षा जास्त स्त्रिया या संस्थेचा डोलारा सांभाळत आहे.


आमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन या चित्पावन ब्राह्मणाने कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता. [१६] महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला त्यांनी आंतरशाखीय विवाहाचे समर्थन केले.

आगरकर आणि गोखले रानडे

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाजकारण

चित्पावन स्वातंत्र्य उत्तरकाल विसावे शतक

चित्पावन स्वातंत्र्य उत्तरकाल एकविसावे शतक

चित्पावनांची आडनावे

आडनावांच्या निर्मिती बद्दल माहिती या विभागात लिहावी .चित्पावन आडनावांची यादी येथे स्थानांतरीत केली आहे.

चित्पावनांच्या संस्था आणि ऊपक्रम

प्रसिद्ध चित्पावन

सत्पुरुष स्वामी स्वरुपानंद, मामा दांडेकर, दासगणु महाराज, केळकर महाराज, प्रल्हाद महाराज काळे, केवलानंद सरस्वती, पांडुरंगशस्त्री आठवले, नारायण दिक्षीत ते अगदी विनोबा भावे शंकर अभ्यंकर ,

राजवाडे , गंगाधर गाडगीळ, य.दि. फडके, वि.ग. कानिटकर

पत्रकार द्वारकानाथ लेले, अरविंद गोखले, कुमार केतकर, श्रीकांत परांजपे, मिलींद गाडगीळ,वैजयंती आपटे, राहि भिडे

समाजसुधारकांत लोकहीतवादी(गोपाळ हरी देशमुख), गोपाळ गणेश आगरकर, र. धों कर्वे, देहदान चळवळ चालवणारे सोहोनी, साने गुरुजी, वीर सावरकर

भारतरत्न मिळवणारे महर्षी कर्वे, महोपाध्याय काणे आणि आचार्य विनोबा भावे

[१७]


इरावती कर्वे,

माधुरी दिक्षित

चित्पावनांचे आंतरधर्मीय/जातीय/शाखीय/भाषीय/प्रांतीय विवाह

लोकमान्य टिळकांचे १९०० सालातील 'कोकणस्थ, देशस्थ व कर्‍हाडे' या मथळ्याचे केसरीतील दोन अग्रलेख आहेत. यात लोकमान्यांनी कोकणस्थ, देशस्थ व कर्‍हाडे यांनी आपापसात विवाह करावेत, असे स्पष्टपणे लिहिले आहे. लोकमान्य टिळकांनी साली दैनिक केसरीत अग्रलेख लिहून देशस्थ,कर्^हाडे आणि कोकणस्थांना आंतरशाखीय विवाह करावेत असे सुचवले.[१८]नवीन पिढीत अशा आंतरधर्मीय/जातीय/शाखीय/भाषीय/प्रांतीय विवाहांमुळे काळाला अनुसरून चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला जातो.

चित्पावनांचे काही प्रसिद्ध बिगरचित्पावन जावई त्यापैकी काही -

शंतनुराव किर्लोस्कर, ग. दि. माडगुळकर, प्रा. राम शेवाळकर, रत्नाकर मतकरी, खासदार प्रकाश आंबेडकर, प्रा. डॉ. अ. रा. कुळकर्णी, इ.[१९]

चित्पावनांचे काही प्रसिद्ध बिगरचित्पावन स्नुषा मृणाल गोरेपुष्पा भावे

चित्पावनांचे आपापसातील वाद विवाद आक्षेप

जातीचा अहंगंड ‘चित्पावन ब्राह्मण जन्मजात बुद्धिमान असतात,‘ यासारख्या वाक्यातून दिसून येई[२०]

चित्पावन हे स्वांतत्र्यपूर्व ब्राम्हणेतर चळवळीचे खास लक्ष्य असे. वेदोक्त प्रकरणानंतर त्यांची भूमीका विशेषत्वाने टिकेचे लक्ष्य बनली. तसेच शासकीय नौकर्‍यातील त्यांचे वर्चस्व हा विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत टिकेचा विषय असे. ....... अधिक जाणून घ्याया म्हणीनुसार "नव्याने ब्राह्मण समाजात आलेले अधिक आक्रमक असतात". कोकणस्थ ब्राह्मण किंवा ज्यांना चित्पावन म्हटले जाते त्यांच्या आक्रमकपणामुळे ब्राह्मणद्वेष वाढला असावा.[२१]

कोकणस्थ देशस्थ ब्राम्हणांवर "देशस्थ आणि गैरशिस्त" अशी टिका करतात तर देशस्थ कोकणस्थांच्या काटकसरीला व अतीथ्यात हात आखडता घेण्यास नावे ठेवतात.[२२]


चित्पावनांवरील शेजवलकरांची टिप्पणी

"या महाराष्ट्रातील चित्पावनद्वेषी जे लोक आहे त्यांच्यात जोवर एखादा राजवाडे, एखादा वासुदेव शस्त्री खरे, एखादा टिळक, एखादा आगरकर, फार काय एखादा दत्तोपंत आपटेही निर्माण होत नाही, तोवर त्यांनी कितीही दात चावले, कितीही निंदा केली, कितीही दोष दाखविले, किंवा कितीही बोटे मोडली तरी त्यामुळे चित्पावनांचे काहिही वाकडे होण्याचा संभव नाहि. कावळ्यांच्या शापांचा किंवा म्हातारीच्या हात चोळण्याचा जेव्हढा परिणाम होण्याचा संभव तेव्हढाच तसाच उपयोग अश्या वृथा जळफळाटांचा आहे. चित्पावनांचे खरे यश रावबहादुरे, प्रोफेसरे, किंवा मोटारवाले हवेल्यावाले किंवा बडे नोकरीवाले यांनी वाढवलेले नाही. त्यांची पैदास इतर जातीतही भरपुर आहे. चित्पावनांचे यश त्यांच्या त्यागाच्या पराकाष्ठेत, एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवण्याच्या चिकाटित, एकांतीक अढळ निष्ठेत, अविश्रांत उद्योगात, व सुखलालसेच्या विन्मुखतेत आहे. जोवर या गुणांची योग्यता जगात मोठी मानली जात आहे तोंवर त्यांचे यश चिरंजीव आहे."[२३]

संदर्भ

  1. ^ http://www.dainikgomantak.com/Gomantak/03092009/NT000844EA.htm गूगल् कॅश आहे. 11 Mar 2009 05:42:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  2. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल
  3. ^ http://www.nationmaster.com/encyclopedia/Maharashtrian-Konkanastha-Brahmins २७ मे २००९ ११.१५ सकाळी संदर्भाकरिता वापरले त्याप्रमाणे
  4. ^ इंग्रजी विकिपीडियातील chitpavan लेख दिनांक २७ मे २००९ ला भाषांतरित
  5. ^ http://74.125.153.132/search?q=cache:ieKQ8mEg1JcJ:www.chitpavans.in/marathi/gotra.htm+%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5&cd=50&hl=mr&ct=clnk&gl=in तारीख २६/५/२००९ १६.५० वाजता घेतेलेला आंतरजालीय संदर्भ
  6. ^ http://www.maharashtra.gov.in/pdf/gazeetter_reprint/Kolaba/population_brahmans.html#1
  7. ^ chitpavans in 'bombay gazetteer' - by Dr. anghavi (Maharashtra State Gazetteer, Maharashtra land & its people page 53-54)
  8. ^ ही Google च्या http://dharm.webduniaportals.co.in/2008/01/18/1200635640000.html ची कॅश आहे. 11 May 2009 18:46:54 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल. अधिक जाणून घ्या
  9. ^ ही Google च्या http://www.marathiworld.com/portal/?q=sanskruti/sanvar/sanvar7.htm ची कॅच आहे. 11 May 2009 18:35:34 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  10. ^ Chitpavani dialect is found in Gazetteer of the Bombay Presidency- Ratnagiri and Sawantwadi Districts, which has been published in 1880.
  11. ^ (taken from From Ratnagiri Gazetteer published in 1880).
  12. ^ 'कोकण आणि कोकणस्थ' हे चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेले आहे.
  13. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  14. ^ लिन्दा कॉकस या अमेरिकेतील विद्यर्थिनीने 'चित्पावन' या विषयावर एक प्रबंध पूर्ण केला आहे. २२ फेब्रुवारी १९७० च्या 'द इलस्टरेटेड विकली ऑफ इंडिया'त तिचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्याचा स्वैर अनुवाद आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीत Publisher: नीलकंठ प्रकाशन पुस्तकावरून.
  15. ^ आम्ही चित्पावन 'चित्पावन समाज दर्शन' या शीर्षकाचे प्रकरण Author: म. श्री. दीक्षीत Publisher: नीलकंठ प्रकाशन
  16. ^ ही Google च्या http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b44500&lang=marathi ची कॅश आहे. 19 May 2009 19:07:28 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
  17. ^ Google's cache of http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007_11_01_archive.html. It is a snapshot of the page as it appeared on 3 Jan 2010 04:42:11 GMT.
  18. ^ आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीतPublisher: नीलकंठ प्रकाशन
  19. ^ आम्ही चित्पावन Author: म. श्री. दीक्षीत Publisher: नीलकंठ प्रकाशन
  20. ^ ही Google च्या http://www.loksatta.com/daily/20050124/ch02.htm ची कॅश आहे. 7 Apr 2009 03:34:30 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल ’समानतेत स्त्रीवादही अनुस्यूत’-वासंती दामले लोकसत्ता चतुरंग शनिवार, २२ जानेवारी २००५
  21. ^ ही Google च्या http://mr.upakram.org/node/1781 ची कॅश आहे. 19 May 2009 22:07:40 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल. अधिक जाणून घ्या
  22. ^ ही Google च्या http://mr.upakram.org/node/1781 ची कॅश आहे. 19 May 2009 22:07:40 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. या दरम्यान वर्तमान पृष्ठ बदललेले असू शकेल.
  23. ^ पानिपत १७६१ चे अभ्यासु लेखक श्री शेजवलकर यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत चित्पावनांबाबत पुढील टिप्पणी केलीये -

इंग्रजी विकिपीडियात वापरलेगेलेले संदर्भ

Londhe also found in "Malvi Sonar" In Vidharbha and Madhya Pradesh

नोंदी

by grant duff. a popular writer of history of Maratha. he wrote book "History of the Maharattas" in 1927 in England.

he wrote:- "Independant of two Maharatta division of Concanist & Deshist, there are in the Maharatta country eight classess of brahmins,who differs from each other in some of their usage, & present, to those accustomed to observe them, preceptible differences both of character & appearance."

  • वरच्या वाक्यातील "Concanist" (कोकणस्थ)या शब्दासाठी डफने पुढील तळटीप दिली आहे.

"The Peshwas who attained sovereign authority in the Maharatta Nation, were of this class......They are termed Chitpawan. Of all the Brahmins with whome I am acquainted, the Concanists are the most sensible & intelligent."


by 'Mr. Candy' रघुनाथराव परांजप्यांच्या अभिनंदनार्थ भरलेल्या मुंबई विद्यापिठाच्या एका सभेत बोलताना माजी न्यायधिश आणि मुंबई विद्यापिठाचे उपकुलगुरु 'Mr. Candy' म्हणाले :- "There never has been any question as to an Indian being perfectly equal to an Englishman in intellect.....Indeed i should say that a Konkan brahman in acuteness of intellect is superior to the average Englishman.

बाह्य दुवे