"पंढरी जुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
त्यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘चार दिन चार राहे’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पंढरीदादांना रशियाला जायला मिळाले आणि शूटिंग आटपल्यावर वर्षभर राहून दादांनी तिथे मेकअपचे रीतसर शिक्षण घेतले. तिथून परतल्यावर भारतीय सिनेमाच्या मायासृष्टीत ते रमले. आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या काळात एकतरी मेकअप केल्याशिवाय त्यांचा दिवस सरत नव्हता. रशियातून आल्यावर दादा अनेक वर्षे [[बी.आर. चोप्रा]] यांच्यासोबत होते. परंतु, यश चोप्रांनी, चोप्रा ग्रुपला अलविदा केल्यावर दादाही त्यांच्याबरोबर बाहेर पडले आणि ‘दाग’पासून ‘यशराज फिल्म्स’बरोबर त्यांचे जे स्नेहबंध जुळले ते कायमचे.

राजकमल कलामंदिर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स यांसारख्या अनेक चित्रपट निर्मिती संस्थांसाठी त्यांनी काम केले. अमिताभ बच्चन, काजोल, जुही चावला, दिलीपकुमार, मधुबाला, माधुरी दीक्षित, मीनाकुमारी, श्रीदेवी यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे सौंदर्य खुलवण्यात पंढरी जुकार यांचा मोलाचा वाटा होता. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारख्या किमान ७२ चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप आर्टिस्टचे काम केले.
राजकमल कलामंदिर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स यांसारख्या अनेक चित्रपट निर्मिती संस्थांसाठी त्यांनी काम केले. अमिताभ बच्चन, अशोककुमार, आमीर खान, करीना कपूर, काजोल, जुही चावला, दिलीपकुमार, देव आनंद, नूतन, मधुबाला, माधुरी दीक्षित, मीनाकुमारी, राज कपूर, राजेश खन्ना, विद्या बालन, शाहरूख खान, श्रीदेवी, सुनील दत्त, यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे सौंदर्य खुलवण्यात पंढरी जुकार यांचा मोलाचा वाटा होता. 'काला पत्थर', 'चित्रलेखा', 'झनक झनक पायल बाजे', 'ताजमहाल','दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'नागिन','नील कमल','नूरजहाँ','मिस्टर इंडिया', 'शोले', यां सारख्या किमान ५०० चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप आर्टिस्टचे काम केले.

==पंढरीदादा जुकर यांना मिळालेले पुरस्कार==
==पंढरीदादा जुकर यांना मिळालेले पुरस्कार==

२३:२२, १७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

पंढरीदादा जुकर (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : मुंबई, १७ फेब्रुवारी २०२०), पूर्ण नाव - नारायण हरिश्चंद्र जुकर, हे हिंदी-मराठी अभिनेत्यांंचा मेकअप करणारे रंगभूषाकार होते. कृष्ण-धवल चित्रपटांपासून सुरू झालेली त्यांची त्यांची कारकीर्द उण्यापुऱ्या ७० वर्षांची होती.

पंढरीदादा मूळचे मुंबईतील जुहूचे. पण त्यांची कर्मभूमी ठरली, ती मुंबईतील गावदेवी. कारण गावदेवीत राहायला आल्यावरच त्यांची प्रसिद्ध रंगभूषाकार बाबा वर्दम यांच्याशी गाठ पडली आणि बाबांनी, दादांना रंगभूषेची उज्ज्वल वाट दाखवली. खरेतर, तोपर्यंत रंगभूषेचे शिक्षण वगैरे दादांनी कधीच घेतले नाही. वर्दम यांचे वडील आजारी पडल्यानंतर फक्त एक दिवस बाबा वर्दम यांनी पंढरीदादांना हाताशी घेतले. त्या एका दिवसाने पंढरीदादांच्या आयुष्यात रंगभूषेचे रंग भरले, ते कायमचे. बाबांमुळे पंढरीदादा व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत कामाला लागले. तिथे त्यावेळी ‘झनक झनक पायल बाजे’ सिनेमातील रंगभूषेसाठी खास ब्रिटिश रंगभूषाकार आला होता. तो राजकमलमध्ये असेपर्यंत दादांना त्याच्या हाताखाली खूप शिकायला मिळाले.

सिनेनट दिलीप कुमार एकदा म्हणाले होते, की 'पात्राच्या वठण्यामागे अभिनय वीस टक्के असतो तर रंगभूषा ऐंशी टक्के असते.' पंढरीदादा जुकर यांच्या दीर्घ यशस्वी कारर्कीर्दीमुळे दिलीपकुमार यांच्या विधानाचा प्रत्यय येतो. मेकअपमुळे कलाकाराचे रुपडेच बदलून जाते. पंढरीनाथ यांचे नाव रंगभूषा क्षेत्रातील ज्येष्ठ होते. पंढरीदादा जुकर यांच्या कारकीरदीत बाॅलिवुडच्या तीन पिढ्या घडल्या.

एक योग त्या काळातच जुळून आला. चेतन आनंद हे मोठे सिनेदिग्दर्शक गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवत होते. चेतन आनंद त्या सिनेमाच्या केशभूषेबद्दल फार चिंतेत होते. त्यांना विग मेकरने गौतम बुद्धासाठी बनवलेले कोणतेही विग पसंत पडेनात. मात्र पंढरीदादांनी केवळ चोवीस तासांत बनवलेला विग चेतन आनंद यांना खूपच आवडला आणि त्यांनी पंढरीदादांना ‘त्यासाठी तुला किती पैसे हवेत?’ असे विचारले. पंढरीदादांनी ‘तुम्हाला वाटते त्याप्रमाणे द्या’ असे नम्र उत्तर दिले. चेतन आनंद यांनी त्यांच्या अकाऊंटंटला बोलावून दादांच्या हातावर बाराशे रुपये ठेवले. पंढरीदादांसाठी ती कमाई अमूल्य होती. कारण त्यांची सुरुवात महिना सत्तर रुपये एवढ्या तुटपुंज्या पगारावर सिनेजगतात झाली होती आणि त्यांना त्या वेळी तर कामच नव्हते.

त्यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘चार दिन चार राहे’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पंढरीदादांना रशियाला जायला मिळाले आणि शूटिंग आटपल्यावर वर्षभर राहून दादांनी तिथे मेकअपचे रीतसर शिक्षण घेतले. तिथून परतल्यावर भारतीय सिनेमाच्या मायासृष्टीत ते रमले. आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या काळात एकतरी मेकअप केल्याशिवाय त्यांचा दिवस सरत नव्हता. रशियातून आल्यावर दादा अनेक वर्षे बी.आर. चोप्रा यांच्यासोबत होते. परंतु, यश चोप्रांनी, चोप्रा ग्रुपला अलविदा केल्यावर दादाही त्यांच्याबरोबर बाहेर पडले आणि ‘दाग’पासून ‘यशराज फिल्म्स’बरोबर त्यांचे जे स्नेहबंध जुळले ते कायमचे.

राजकमल कलामंदिर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स यांसारख्या अनेक चित्रपट निर्मिती संस्थांसाठी त्यांनी काम केले. अमिताभ बच्चन, अशोककुमार, आमीर खान, करीना कपूर, काजोल, जुही चावला, दिलीपकुमार, देव आनंद, नूतन, मधुबाला, माधुरी दीक्षित, मीनाकुमारी, राज कपूर, राजेश खन्ना, विद्या बालन, शाहरूख खान, श्रीदेवी, सुनील दत्त, यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे सौंदर्य खुलवण्यात पंढरी जुकार यांचा मोलाचा वाटा होता. 'काला पत्थर', 'चित्रलेखा', 'झनक झनक पायल बाजे', 'ताजमहाल','दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'नागिन','नील कमल','नूरजहाँ','मिस्टर इंडिया', 'शोले', यां सारख्या किमान ५०० चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप आर्टिस्टचे काम केले.

पंढरीदादा जुकर यांना मिळालेले पुरस्कार

  • चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (२०१३).