"पंढरी जुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पंढरीदादा जुकर (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : १७ फेब्रुवारी २०२०), पूर्ण...
(काही फरक नाही)

२२:४०, १७ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

पंढरीदादा जुकर (जन्म : इ.स. १९३२; मृत्यू : १७ फेब्रुवारी २०२०), पूर्ण नाव नारायण हरिश्चंद्र जुकर, हे हिंदी-मराठी अभिनेत्यांंचा मेकअप करणारे रंगभूषाकार होते. कृष्ण-धवल चित्रपटांपासून सुरू झालेली त्यांची त्यांची कारकीर्द उण्यापुऱ्या ६५ वर्षांची होती.

पंढरीदादा मूळचे मुंबईतील जुहूचे. पण त्यांची कर्मभूमी ठरली, ती मुंबईतील गावदेवी. कारण गावदेवीत राहायला आल्यावरच त्यांची प्रसिद्ध रंगभूषाकार बाबा वर्दम यांच्याशी गाठ पडली आणि बाबांनी, दादांना रंगभूषेची उज्ज्वल वाट दाखवली. खरेतर, रंगभूषेचे शिक्षण वगैरे दादांनी कधीच घेतले नाही. फक्त एक दिवस बाबा वर्दम यांनी पंढरीदादांना हाताशी घेतले. त्या एका दिवसाने पंढरीदादांच्या आयुष्यात रंगभूषेचे रंग भरले, ते कायमचे. बाबांमुळे पंढरीदादा व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत कामाला लागले. तिथे त्यावेळी ‘झनक झनक पायल बाजे’ सिनेमातील रंगभूषेसाठी खास ब्रिटिश रंगभूषाकार आला होता. तो राजकमलमध्ये असेपर्यंत दादांना त्याच्या हाताखाली खूप शिकायला मिळाले.

त्यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘चार दिन चार राहे’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पंढरीदादांना रशियाला जायला मिळाले आणि शूटिंग आटपल्यावर वर्षभर राहून दादांनी तिथे मेकअपचे रीतसर शिक्षण घेतले. तिथून परतल्यावर भारतीय सिनेमाच्या मायासृष्टीत ते रमले. आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या काळात एखादा मेकअप केल्याशिवाय त्यांचा दिवस सरत नाही. रशियातून आल्यावर दादा अनेक वर्षे बी. आर. चोप्रा यांच्यासोबत होते. परंतु, यश चोप्रांनी, चोप्रा ग्रुपला अलविदा केल्यावर दादाही त्यांच्याबरोबर बाहेर पडले आणि ‘दाग’पासून ‘यशराज’बरोबर त्यांचे जे स्नेहबंध जुळले ते कायमचे.

राजकमल कलामंदिर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स यांसारख्या अनेक चित्रपट निर्मिती संस्थांसाठी त्यांनी काम केले. अमिताभ बच्चन, काजोल, दिलीपकुमार, मधुबाला, माधुरी दीक्षित, मीनाकुमारी यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे सौंदर्य खुलवण्यात पंढरी जुकार यांचा मोलाचा वाटा होता. ;दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारख्या किमान ७२ चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप आर्टिस्टचे काम केले.

पंढरीदादा जुकर यांना मिळालेले पुरस्कार

  • चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार (२०१३).