"जमशेदजी नसरवानजी रुस्तुम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जमशेदजी नसरवानजी रुस्तुम (जन्म : ७ जानेवारी १८८६; मृत्यू : इ.स. १९८८)...
(काही फरक नाही)

११:०४, १० फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

जमशेदजी नसरवानजी रुस्तुम (जन्म : ७ जानेवारी १८८६; मृत्यू : इ.स. १९८८) हे कराची शहराचे बादशहा म्हणून ओळखले जातात.

पहिल्या महायुद्धानंतर जगभरात जशी इन्फ्लुएंझाची साथ आली, तशी ती कराचीतही आली. कराचीत रोगी जास्त आणि डाॅक्टर कमी होते. लोक आपल्यालाही हे दुखणे लागू नये म्हणून इन्फ्लुएंझाच्या रोग्यापासून दूर पळत. घरचे कुटुंबीयपण रोग्याची सेवा करायला घाबरत. अश्या वेळी जमशेटजी दुखणेकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले. मृत्यूलाही न घाबरणारे जमशेटजी पाहून लोक त्यांना भगवान मानू लागले.

जन्माने पारशी असले तरी जमशेटजींनी आपले सगळे आयुष्य धर्मांध लोकांना जाहीर विरोध करत व्यतीत केले. त्यांचे साधे व्यक्तिमत्त्व हे धार्मिक तत्त्वज्ञान, एकी आणि मैत्रीचे मूर्तरूप होते. यांच्याच आधारे जमशेटजी आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सलोख्याचे संबंध टिकवून होते. त्यांचे आपलेपण हे जात, धर्म, वंश यांच्या पलीकडे होते. ते दुर्दैवाच्या फेऱ्यात गरीब झालेल्या खानदानी लोकांना नेहमी आर्थिक मदत करीत. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जमशेटजी त्यांच्या यादीत असलेल्या गरिबी आलेल्या कुटुंबीयांचे नाव लिहून रोख रकमेचे लिफाफे बनवत आणि त्यांना पोचते करत. कराचीच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना ते मनीऑर्डरीने किंवा चेकने पैसे पाठवत.

सन १९३३मध्ये जमशेटजी नसरवानजी कराचीचे मेयर झाले. त्यांच्या मेयरपदाच्या कारकिर्दीत त्यांनी कराची शहराला प्रगतिपथावर आणले. त्याकाळी कराचीतले रस्ते रोज पाण्याने धुतले जात. जमशेटजींसारखे लोकसेवक जेव्हा संपतील तेव्हा याच रस्त्यांवरून पुढे रक्ताचे पाट वाहतील याची कल्पना जमशेटजींनाही आली नव्हती.

कराची शहरात एकेकाळी रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकांत महान लोकसेवकांचे पुतळे होते, जमशेटजींचाही होता. परंतु नंतर आलल्या सुल्तानशाहीत हे सर्व पुतळे उखडून फेकून दिले गेले.

शहरात 'मामा पारसी गर्ल्स हायस्कूल' नावाची मुलीची एक उच्च दर्जाची शाळा आहे, तिला जमशेटजींनी आपल्या वडिलांच्या, खान बहादुर नसरवान यांच्या नावाने एक लाख पस्तीस हजाराची देणगी दिली होती, या देणगीची आज कुणालाच आठवण नाही.

कराचीतले वयोवृद्ध लोक आजही कराचीचे बादशहा म्हणून जमशेटजी नसरवान रुस्तुम यांची आठवण काढतात.

पाकिस्तान सरकारने जमशेटजीचे छायाचित्र असलेले एक ३ रुपये किंमतीचे पोस्टाचे तिकीट काढले आहे.