Jump to content

"मीरा आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४८: ओळ ४८:
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:मराठी समाजसेविका]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:समाजसेविका]]

१५:०३, ६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

मीरा आंबेडकर
टोपणनाव: नीरा
जन्म: ४ मे
रावडूळ, महाड तालुका, रायगड जिल्हा (कुलाबा)
चळवळ: आंबेडकरवादी चळवळी
संघटना: भारतीय बौद्ध महासभा
कार्यक्षेत्र: सामाजिक, राजकीय, धार्मिक
धर्म: बौद्ध धर्म
प्रभाव: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वडील: विठ्ठल साळवे
आई: कमळाबाई साळवे
पती: यशवंत आंबेडकर
अपत्ये: प्रकाश, रमा, भीमरावआनंदराज

मीरा यशवंत आंबेडकर (जन्म: नीरा विठ्ठल साळवे; ४ मे, वर्ष?) ह्या सामाजिक, राजकीय व आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुन व यशवंत आंबेडकर यांच्या पत्नी आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश[] तसेच रमाबाई, भीमरावआनंदराज यांच्या त्या आई आहेत. त्यांची मुलगी रमा यांचा आनंद तेलतुंबडे यांचेशी विवाह झालेला आहे. मीराबाईंनी अनेक सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळीत भाग घेतलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर व यशवंत आंबेडकर यांच्यानंतर मीरा यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून काम केले आहेत.[]

मीरा आंबेडकर यांचा जन्म रावडूळ ता. महाड जि. रायगड (कुलाबा) येथे झाला. त्यांच्या वडीलांचे नाव विठ्ठल साळवे, तर आईचे नाव कमळाबाई होते. मीरा यांचे माहेरकडचे नाव 'नीरा' असे होते.[] परिवारात नीरा (मीरा), सिंधू, निर्मला, ऊर्मिला व विमल ह्या पाच मुली तर पांडुरंग हा एकुलता मुलगा होता.[] त्यावेळी नीरा गुजरात मधील मेहसाणा येथे राहात होत्या. वडील रेल्वेत नोकरीला होते. आई, वडील व नीरा मुंबईला सुशिला जाधव या त्यांच्या चुलत बहिणीकडे आले असताना यशवंत आंबेडकरांनी त्यांना पाहिले. यशवंतरावांनी अधिक माहिती काढून त्यांच्या कुटुंबापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. लग्न जुळवणीत चांगदेव खैरमोडे यांच्या पत्नी द्वारकाबाईंचा विशेष सहभाग होता. मीरा व यशवंत यांचा विवाह १९ एप्रिल १९५३ रोजी परळ येथील आर.एम. भट हायस्कूलच्या हॉल मध्ये बौद्ध पद्धतीने झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली नव्हती. या लग्नास बाबासाहेब हजर नव्हते, मात्र सविता आंबेडकर उपस्थित होत्या.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास". Lokmat. 9 ऑक्टो, 2019. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Battle to head Ambedkar’s Society nears end in HC". 16 एप्रि, 2014. C1 control character in |title= at position 24 (सहाय्य); |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ Khobragade, Fulchand (2014). Suryaputra Yashwantrao Ambedkar (Marathi भाषेत). Nagpur: Sanket Prakashan. p. 12.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ Khobragade, Fulchand (2014). Suryaputra Yashwantrao Ambedkar (Marathi भाषेत). Nagpur: Sanket Prakashan. pp. 12, 13.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ Khobragade, Fulchand (2014). Suryaputra Yashwantrao Ambedkar (Marathi भाषेत). Nagpur: Sanket Prakashan. p. 13.CS1 maint: unrecognized language (link)