"बी.सी. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) + 15 categories - हॉटकॅट वापरले |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९१९ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:भारतीय लेखक]] |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
|||
[[वर्ग:भारतीय इतिहाससंशोधक]] |
|||
[[वर्ग:भारतीय समाजसेवक]] |
|||
[[वर्ग:भारतीय राजकारणी]] |
|||
[[वर्ग:मराठी राजकारणी]] |
|||
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]] |
|||
[[वर्ग:लोकसभा सदस्य]] |
|||
[[वर्ग:संपादक]] |
|||
[[वर्ग:पत्रकार]] |
|||
[[वर्ग:भारतीय रिपब्लिकन पक्षातील राजकारणी]] |
|||
[[वर्ग:आंबेडकरवादी]] |
|||
[[वर्ग:भारतीय बौद्ध]] |
|||
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]] |
२०:५२, २४ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
बापू चंद्रसेन कांबळे (जन्म: १५ जुलै १९१९) हे एक भारतीय लेखक, संपादक, वक्ता, राजकारणी, व घटनातज्ज्ञ आहेत. ते आंबेडकरवादी विचारवंत, अनुवादक व चरित्रकारही आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी "समग्र आंबेडकर चरित्र" (खंड १-२४) नावाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी जीवनचरित्र लिहिले आहे.
विधिज्ञ असलेल्या काबळेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना मदत केली होती. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५० वर्षे कांबळे यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व केले. बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टीत फूट पडली. त्यातील एका गटाचे (कांबळे गट) ते अध्यक्ष होते. त्या दोन पक्षांना, गटांना अनुक्रमे दुरूस्त व नादुरूस्त असे नावेही पडली होती, त्यातील नादुरूस्त गटाचे प्रतिनिधीत्व हे बापू कांबळे करायचे.
१९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ साली पुणे येथे 'पुणे करार रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. या सत्याग्रहाच्याबाजूने कांबळे यांनी 'दलित सत्याग्रहींची कैफियत' हा लेख मराठीतील त्यावेळच्या अग्रगण्य अशा 'किर्लोस्कर' मासिकाकडे पाठवला. हा लेख नोव्हेंबर १९४६च्या 'किर्लोस्कर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
१९४८ ते १९५४ पर्यंत कांबळे हे 'जनता साप्ताहिका'चे संपादक होते. जनता हे आंबेडकरांचे पाक्षिक होते.
कांबळे १९५२ ते १९५७ या काळात मुंबई असेंब्लीत शेड्यूल कास्ट फेडरेशनचे आमदार होते. या काळात त्यांनी विधिमंडळात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर एकाकी लढा दिला. त्यांनी आणीबाणीच्या विरोधात लढा दिला. ते १९५७ ते १९६२ व १९७७ ते १९७९ असे दोनदा लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे खासदार होते. आणीबाणी व ४४व्या घटना दुरुस्तीला त्यांनी विरोध केला होता. ते भारतीय रिपब्लिकन पक्षातील ते एक बुद्धिमान व विद्वान नेते होते.