"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
|||
ओळ ८२: | ओळ ८२: | ||
[[वर्ग:भारत सरकार]] |
[[वर्ग:भारत सरकार]] |
||
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील निर्मिती]] |
[[वर्ग:इ.स. २०१७ मधील निर्मिती]] |
||
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके व संग्रहालये]] |
०८:५४, १३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | आंतरराष्ट्रीय केंद्र व स्मारक |
ठिकाण | १५ जनपथ, नवी दिल्ली |
बांधकाम सुरुवात | २० एप्रिल २०१५ |
पूर्ण | ७ डिसेंबर २०१७ |
मूल्य | १९५ कोटी रूपये |
क्षेत्रफळ | ३.२ एकर |
मालकी | भारत सरकार |
संदर्भ | |
http://daic.gov.in/aboutdaic.html |
डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar international Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.
इतिहास
बाबासाहेबांना समर्पित असणारी एकही वास्तू राजधानी दिल्लीत नव्हती. यामुळे बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष १९९०-९१ मध्ये लुटेन्स दिल्लीमधील 'जनपथ' मार्गावर त्यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी घेतला व त्यासाठी सव्वातीन एकर जागा मिळाली पण त्यापुढील वीस वर्ष यावरील काम रखडले. यूपीए सरकारच्या काळात २०१२ स्मारकाच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. पुढे मे २०१४ रोजी या प्रकल्पाला औपचारिक फेरमंजुरी मिळाली आणि भूमिपूजनानंतर ३२ महिन्यांत भव्य स्मारक उभे राहिले.[१][२]
२० एप्रिल इ.स. २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वास्तूचे भूमिपूजन केले होते, ७ डिसेंबर इ.स. २०१७ रोजी या आंतरराष्ट्रीय केंद्राचा उद्घाटन सोहळा मोदींच्या हस्ते संपन्न झाला.[३][४]
रचना व वैशिष्ट्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची काही वैशिष्ट्ये खालिलप्रमाणे आहेत:[५]
- स्मारकाच्या जागेचे क्षेत्रफळ : ३.२ एकर
- स्मारकासाठी लागणारा एकूण खर्च : १९५ कोटी रुपये
- स्मारकाच्या निर्मितीचा कालावधी : २ वर्ष ८ महिने
- केंद्रात १० हजार पुस्तकांचे ग्रंथालय, ई-लायब्ररीच्या माध्यमाद्वारे २ लाख पुस्तके आणि सत्तर हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय मासिके, जर्नल्स उपलब्ध आहेत.
- ७०० क्षमतेचे एक भव्य सभागृह आणि प्रत्येकी १०० क्षमतेची दोन लहान सभागृहे आहेत.
- दर्शनी भागात खुर्तीत बसलेल्या स्थितीत डॉ. आंबेडकरांचा आणि ध्यानस्थ बुद्धांचा असे दोन भव्य पुतळे आहेत. शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल यांनी हे पुतळे साकारलेत.
- केंद्राच्या परिसरात एक अन्य आंबेडकरांचा एक उभा असलेला भव्य पुतळा उभारला गेला आहे.
- येथे ७० फुटांचा अशोक स्तंभदेखील असणार. कदाचित हा देशातील सर्वांत उंच अशोक स्तंभ ठरणार.
- स्मारकाची दोन प्रवेशद्वारे सांची स्तूपाच्या तोरणासारखी आहेत. यावर एकूण बौद्ध वास्तूशैलीचा प्रभाव आहे.
चित्रदालन
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
संदर्भ
- ^ NDTV.com https://www.ndtv.com/india-news/pm-narendra-modi-inaugurates-b-r-ambedkar-international-centre-1784720. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.narendramodi.in https://www.narendramodi.in/mar/pm-narendra-modi-inaugurates-dr-ambedkar-international-centre-in-new-delhi-538116. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.pmindia.gov.in (इंग्रजी भाषेत) http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82-3/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Devendra Fadnavis Fan Club (2017-12-11), https://m.youtube.com/watch?v=gxlrEWfuk9A, 2018-05-08 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta. 2017-12-07 https://www.loksatta.com/desh-videsh-news/ambedkar-international-center-in-delhi-1596976/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)