"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) 2402:3A80:681:50D:0:59:BD34:6C01 (चर्चा)यांची आवृत्ती 1711057 परतवली. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १५: | ओळ १५: | ||
'''महार''' (इतर नावे किंवा तत्सम जाती: '''मेहरा''', '''मेहर''', '''महारा''', '''तरल''', '''तराल''', '''धेगुमेग''') हा [[भारत|भारतातील]] [[अनुसूचित जाती]]चा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. [[हिंदू वर्णव्यवस्था|हिंदू वर्णव्यवस्थेत]] या जातीला [[अस्पृश्य]] ([[दलित]]) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटी पेक्षा जास्त आहे. [[महाराष्ट्र]]ाच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.<ref name="Clothey2007">{{स्रोत पुस्तक|author=Fred Clothey|शीर्षक=Religion in India: A Historical Introduction|दुवा=https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213|year=2007|publisher=Psychology Press|isbn=978-0-415-94023-8|page=213}}</ref> महाराष्ट्रानंतर [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]], [[कर्नाटक]], [[पश्चिम बंगाल]], [[गुजरात]], [[ओडिसा]], [[तेलंगाणा]] या राज्यात महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यात हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यात महार समुदायाला [[अनुसूचित जाती]]मध्ये समाविष्ठ केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://socialjustice.nic.in/UserView/index?mid=76750|शीर्षक=List of Scheduled Castes : Ministry of Social Justice and Empowerment - Government of India|website=socialjustice.nic.in|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html|शीर्षक=Census of India - Tables on Individual Scheduled Castes (SC) and Scheduled Tribes (ST)|date=2013-02-07|access-date=2018-03-19}}</ref> भारताव्यतिरिक्त [[पाकिस्तान]] आणि [[बांगलादेश]]ातही महार हे कमी संख्येने आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.encyclopedia.com/humanities/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/mahar|शीर्षक=Mahar - Dictionary definition of Mahar {{!}} Encyclopedia.com: FREE online dictionary|website=www.encyclopedia.com|language=en|access-date=2018-03-19}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://joshuaproject.net/people_groups/17405/IN|शीर्षक=Mahar (Hindu traditions) in India|last=Project|first=Joshua|access-date=2018-03-19|language=en}}</ref> आज बहुतांश महार हे [[बौद्ध धर्म]]ीय आहेत. |

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत. |
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — ''महार + राष्ट्र'' = ''महाराष्ट्र''. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत. |
||
== इतिहास == |
== इतिहास == |
११:५४, २४ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती
महार |
---|
A Mahar Man winding thread from The Tribes and Castes of the Central Provinces of India (1916) |
एकूण लोकसंख्या |
१ ते १.५ कोटी |
लोकसंख्येचे प्रदेश |
प्रमुख महाराष्ट्र इतर लक्षणीय लोकसंख्या |
भाषा |
मुख्यः- मराठी व वऱ्हाडी |
धर्म |
बहुसंख्यः - बौद्ध धर्म (नवयान) अल्पसंख्यः - हिंदू धर्म अत्यल्पसंख्यः - शीख धर्म, ख्रिश्चन धर्म |
संबंधित वांशिक लोकसमूह |
मराठी बौद्ध, मराठी लोक |
महार (इतर नावे किंवा तत्सम जाती: मेहरा, मेहर, महारा, तरल, तराल, धेगुमेग) हा भारतातील अनुसूचित जातीचा समाज आहे, जो प्रमुख्याने महाराष्ट्रात राहतो. हिंदू वर्णव्यवस्थेत या जातीला अस्पृश्य (दलित) मानले गेले होते. महारांची महाराष्ट्र राज्यातील लोकसंख्या १ कोटी पेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ११% ते १५% महार आहेत.[२] महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, ओडिसा, तेलंगाणा या राज्यात महार समाजाची मोठी संख्या आहे. भारतातील एकूण ३० राज्यात हा समाज आढळतो, यापैकी १६ राज्यात महार समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ठ केले आहे.[३][४] भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातही महार हे कमी संख्येने आहेत.[५][६] आज बहुतांश महार हे बौद्ध धर्मीय आहेत.
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — महार + राष्ट्र = महाराष्ट्र. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य मातृभाषा मराठी आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत.
इतिहास
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा होता. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहित म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.
महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते मेलेल्या जनावरांना वाहून नेणारे (मृत + हार) ते महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रू ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होत. वऱ्हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करीत असे रसेल व हिरालाल सांगतात. त्यावेळी त्यांचे धार्मिक संस्कार हिंदूंसारखेच होते. ग्रामपंचायतीत बारा बलुतेदारांपैकी महार एक होते. त्यांच्याकडे खेडेगांवच्या सरहद्दी संभाळणे, चौकीदारी व जासुसी इत्यादी कामे असत.[७]
उपजाती
महार जातीत १२ (साडेबारा) उपजाती होत्या. महारांच्या सोमवंशी व मिराशी या मुख्य उपजाती आहेत, तर आंदवण, लाडवण, अक्करमाशी, बारमाशी या इतर उपजाती आहेत. त्याचप्रमाणे महारांत रायरंद, डोंब अशा पोटजातीही आहेत. महारांत 'सोमवंशी' हे उच्चकुलीन समजले जातात, तर 'अक्करमाशी' हे कमी प्रतिचे समजले जातात. एका आडनावाचे लोक एका कुळीचे समजले जात असल्याने, महारांत एका आडनावात लग्नविधी होत नाहीत. पूर्वी या उपजातींदरम्यान रोटी-बेटी क्वचितच होत असत. मात्र इ.स. १९५६ मध्ये अस्पृश्यता त्यागून हा सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध धर्मीय बनला. बौद्ध व्यक्तींमध्ये कुणीही क्षेष्ठ-कनिष्ठ नसतो या शिकवणूकीतून या समाजात रोटी-बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि आज हा भेद जवळजवळ समाप्त झाला आहे.
धर्म
२००१ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रीय महार हे ५६.२% बौद्ध, ४३.७% हिंदू आणि ०.१% शीख होते.[८]
१९५१ मध्ये म्हणजेच डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ८०% होते. धर्मांतरांनंतर महारांनी बौद्ध धर्म स्वीकारला व आज सुमारे ९८% महार हे बौद्ध धर्मीय आहेत. मात्र काही महार हे 'महार' ही 'हिंदू ओळख' नाकारत बौद्ध झाले तर काही महार जातीने 'महार' व धर्माने बौद्ध ही ओळख सांगत बौद्ध बनले. त्यामुळे आज अनुसूचित जातीत महाराष्ट्राचे प्रमाण २००१ मध्ये ५७.५% झाले, व यातील ५८% महारांनी आपला धर्म बौद्ध सांगितला होता.
सुरुवातीला हिंदू धर्मातील अस्पृश्य वर्गात गणला जाणारा हा समाज १४ ऑक्टोबर १९५६ नंतर बौद्ध धर्मीय झाला. आज ह्या समाजातील सर्व लोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली आहेत तर अनेकांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारला आहे. आज महाराष्ट्राच्या लोकसंख्येत १०% महार समाज आहे. महाराष्ट्रात महार आणि बौद्ध समाजाची एकत्रित लोकसंख्या ही १६% म्हणजेच २ कोटींच्या आसपास आहे.
हिंदू परंपरेने हा समाज भारतीय जातिव्यवस्थेत कमी लेखला जातो. हा समाज अनुसूचित जातींमध्ये येतो, हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेत हा समाज सर्वात खालच्या जातींपैकी होता. विसाव्या शतकाच्या मध्यात ह्या समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यामुळे त्या लोकांना बौद्ध म्हणतात. ह्या समाजातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाची जी काही चागली स्थिती आज आहे, ती फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. महार नावाच्या अस्पृश्य समाजातून येऊन परदेशी जाऊन शिक्षण घेऊन येणारे बाबासाहेब पहिली व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळेच हा समाज बौद्ध झाला.
लोकसंख्या
२०१७ पर्यंत, महार समुदायाला १६ भारतीय राज्यांमध्ये 'अनुसूचित जाती' म्हणून घोषित केले गेले होते: आंध्र प्रदेश, अरूणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मिझोरम, राजस्थान, तेलंगाणा आणि पश्चिम बंगाल.
राज्यानुसार भारतातील महार लोकसंख्या, २००१[९] | |||
---|---|---|---|
राज्य | लोकसंख्या | टीप | |
आंध्र प्रदेश[a] | २८,३१७ | ||
अरूणाचल प्रदेश | ६४ | ||
आसाम | १,७२५ | ||
छत्तीसगढ | २,१२,०९९ | ८.७७% राज्यातील अनु. जातीची लोकसंख्या | |
दादरा आणि नगर हवेली | २७१ | ६.६०% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या | |
दमण आणि दीव | ५ | ||
गोवा | १३,५७० | ५७% राज्याची अनु. जातीची लोकसंख्या | |
गुजरात | २६,६४३ | ||
कर्नाटक | ६४,५७८ | ||
मध्य प्रदेश | ६,७३,६५६ | ||
महाराष्ट्र | ५६,७८,९१२ | ५७.५% राज्यातील अनु. जातीपैकी लोकसंख्या | |
मेघालय | ५३ | ||
मिझोरम | ९ | ||
राजस्थान | ७,२४१ | ||
पश्चिम बंगाल | २८,४१९ |
याशिवाय इतर राज्यातील महारांची लोकसंख्या (२०११): (तेलंगाणा वगळता इतर राज्यात महरांचा समावेश अनु. जातीत केलेला नाही.)
- ओडिसा - ३२,०००
- तेलंगणा - ३२,०००
- त्रिपुरा - ३,७००
- तमिळनाडू - ३,१००
- दिल्ली - २,९००
- उत्तर प्रदेश - १,५००
- केरळ - १,१००
हे देखील पहा
- मराठी बौद्ध
- महार रेजिमेंट
- दलित बौद्ध चळवळ
- महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म
- महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादी
संदर्भ आणि नोंदी
- ^ https://joshuaproject.net/maps/india/17405
- ^ Fred Clothey (2007). Psychology Press. p. 213. ISBN 978-0-415-94023-8 https://books.google.com/books?id=7s376jMWBcEC&pg=PA213. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ socialjustice.nic.in (इंग्रजी भाषेत) http://socialjustice.nic.in/UserView/index?mid=76750. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ . 2013-02-07 https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.encyclopedia.com (इंग्रजी भाषेत) http://www.encyclopedia.com/humanities/encyclopedias-almanacs-transcripts-and-maps/mahar. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Project, Joshua. (इंग्रजी भाषेत) https://joshuaproject.net/people_groups/17405/IN. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ memberj. ketkardnyankosh.com (इंग्रजी भाषेत) http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/12528-2013-03-13-06-52-19. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (PDF). 2012-11-14 https://web.archive.org/web/20121114021927/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/dh_sc_maha.pdf. 2018-03-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ archive.org. Officer of the Registrar General. 7 March 2007 https://web.archive.org/web/20130207163453/http://www.censusindia.gov.in/Tables_Published/SCST/scst_main.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/>
खूण मिळाली नाही.