"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ९९: | ओळ ९९: | ||
| १९ ऑक्टोबर २०१८ || पुखरायन (गाव), काणपूर देहत जिल्हा, उत्तर प्रदेश || १०,००० पेक्षा अधिक || हिंदू धर्मीय अनुसूचित जाती व मागास वर्गीय ||<ref>https://m.timesofindia.com/city/kanpur/over-10000-dalits-adopt-buddhism-in-kanpur-dehat/articleshow/66300146.cms</ref><ref>https://m.timesofindia.com/india/10000-dalits-in-up-district-convert-to-buddhism/articleshow/66299423.cms</ref> |
| १९ ऑक्टोबर २०१८ || पुखरायन (गाव), काणपूर देहत जिल्हा, उत्तर प्रदेश || १०,००० पेक्षा अधिक || हिंदू धर्मीय अनुसूचित जाती व मागास वर्गीय ||<ref>https://m.timesofindia.com/city/kanpur/over-10000-dalits-adopt-buddhism-in-kanpur-dehat/articleshow/66300146.cms</ref><ref>https://m.timesofindia.com/india/10000-dalits-in-up-district-convert-to-buddhism/articleshow/66299423.cms</ref> |
||
|- |
|- |
||
| |
| ऑक्टोबर २०१८ (धम्मचक्र प्रवर्तन दिन) || [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]], महाराष्ट्र || ६५,००० || हिंदू व्यक्ती ||देशभरातील व्यक्ती<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html?ref=fbo</ref> |
||
|- |
|||
| ६-८ ऑक्टोबर २०१९ (धम्मचक्र प्रवर्तन दिन) || [[दीक्षाभूमी]], [[नागपूर]], महाराष्ट्र || ६७,५४३ || हिंदू धर्मीय अनुसूचित जाती व मागास वर्गीय ||देशभरातील व्यक्ती<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html?ref=fbo</ref><ref>https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262</ref> |
|||
|- |
|- |
||
| || || || || |
| || || || || |
२१:४६, ९ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
भारतात दरवर्षी लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची सामुहिक सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे होत आहेत. धर्मांतरित बौद्धांना आंबेडकरवादी बौद्ध किंवा नवबौद्ध सुद्धा म्हटले जाते.
२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामध्ये ८४ लाखांहून अधिक बौद्ध आहेत आणि त्यापैकी ८७% म्हणजेच ७३ लाख हे धर्मांतरित बौद्ध आहेत, जे इतर धर्मांतून धर्म बदलून बौद्ध बनलेले आहेत. त्यामध्ये बहुतेक अनुसूचित जातीचे आहेत, ज्यांनी हिंदू धर्मातील जातीभेदामुळे धर्मांतर केले आहे. इतर १३% बौद्ध हे पूर्वोत्तर आणि उत्तरी हिमालयीन क्षेत्रीय पारंपरिक बौद्ध समुदायाशी संबंधित आहेत.
धर्मांतरित बौद्धांत सुमारे ७३ लाख बौद्ध समाविष्ट होतात, त्यापैकी ६५ लाख (९०%) महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत ६% बौद्ध आहेत, आणि यातील ९९.९८% धर्मांतरित बौद्ध आहे. उर्वरित सुमारे ९ लाख धर्मांतरित बौद्ध मध्यप्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि पंजाब, तसेच छोटे उत्तर राज्ये हरियाणा आणि दिल्ली येथे आहेत.
पार्श्वभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतराबाबत स्पष्ट मत होते की, अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो. हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही. बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, “जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे? त्यामुळे बाबासाहेबांनी १३ ऑक्टोबर १९३५ येवला, नाशिक येथे हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली — "मी जरी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही." धर्मांतराच्या या घोषणेनंतर ख्रिश्चन, मुस्लिम, शिख, जैन, बौद्ध, यहूदी इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारावा, पाकिस्तानाला यावे व पाकिस्तानचे गव्हर्नर व्हावे अशी ऑफर दिली होती. तर त्यावेळेची जगातील सर्वाधिक श्रीमंत राजवट असलेल्या निझामाने बाबासाहेबांना इस्लाम स्वीकारल्यास धर्मांतरीत प्रति व्यक्ति मागे लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी रूपये बाबासाहेबांना देण्याचे कबूल केले होते.[१] परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही ऑफर नाकारल्या. एका ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याती विनंती केली व धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली. महाबोधी सोसायटीकडून बौद्ध भिक्खूंनी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म आशिया खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांचे उद्धिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी धर्मांतराची घाई न करता आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर सलग २१ वर्षे जगातील विविध धर्मांचे सखोल अध्ययन केले. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून पूर्णपणे बौद्ध धम्माकडे वळला. म्हणूनच धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे सिद्धार्थ स्थापन केले.तसेच औरंगाबाद या ठिकाणी इ.स. १९५० महाविद्यालयात काढून त्यास मिलिंद महाविद्यालय व परिसरास नागसेनवन असे नाव दिले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाला ‘राजगृह’ असे नाव दिले. त्यांनी 'दिनांक १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी विविध धर्मांचे, जातीचे लोक विशेषत: अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.
नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली. त्या दिवशी अशोक विजयादशमी होती (या दिवशी सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता). हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून सर्वप्रथम धम्मदीक्षा घेतली आणि त्यांनंतर स्वत: आपल्या ५,००,००० अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि बावीस प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.[२][३] दुसऱ्या दिवशी, १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा नागपूरमध्ये त्यांनी आदल्या दिवशी येऊ न शकलेल्या २,००,००० अनुयायांना दीक्षा दिली. त्यानंतर १६ ऑक्टोबरला धम्मदीक्षेसाठी चंद्रपूरला गेले, आणि तेथेही तिसऱ्यांदा त्यांनी ३,००,००० अनुयायांना धम्म दीक्षा दिली. अशाप्रकारे केवळ तीन दिवसांत आंबेडकरांनी १०,००,००० पेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.[४] या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते कारण ते जगातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते.
बाबासाहेबांनी आपल्या नवीन बौद्धांना, ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या त्या बौद्ध धर्माचेच सार आहेत, अशा स्वतःच्या २२ प्रतिज्ञा दिल्या ज्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला हिंदू देव-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्याच्या आहेत. बाबासाहेबांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाचा आहे.
बाबासाहेबांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग आग्रा सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीच कमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.[५]
१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी महाराष्ट्रात फक्त २४८७, पंजाबात १५५०, उत्तर प्रदेशाात ३२२१, मध्य प्रदेशात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती.[६][४] ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती. म्हणजेच भारतात १९५९ मध्ये ४.५% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीयांची होती आता हीच बौद्ध लोकसंख्या २०११ मध्ये ५.५% झाली असून भारतीतील १२१ कोटी जनतेत ६.७ कोटी बौद्ध आहेत.[५][७] मात्र सरकारी आकडेवारीनुसार, इ.स. २०११ मध्ये भारतातील बौद्धांची लोकसंख्या अवघी ८५ लाख (०.७%) आहे.
इ.स. १९५० ते १९५९
एका संदर्भानुसार, ऑक्टोबर १९५६ ते मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती. आणि ही बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या ४.५% होती.[८]
धर्मांतराची तारीख | धर्मांतराचे स्थान | धर्मांतरित व्यक्तींची संख्या | धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग | संदर्भ व टीप |
---|---|---|---|---|
१४ ऑक्टोबर १९५६ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | बाबासाहेब आंबेडकर व सविता आंबेडकरांसह ५,००,००० | हिंदू (अनुसूचित जाती व इतर), मुस्लिम, ख्रिश्चन, शीख | बाबासाहेब आंबेडकरांद्वारे धम्मदीक्षा[९] |
१५ ऑक्टोबर १९५६ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ३,००,००० | हिंदू (अनुसूचित जाती व इतर), मुस्लिम, ख्रिश्चन, शीख | बाबासाहेब आंबेडकरांद्वारे धम्मदीक्षा[१०] |
१६ ऑक्टोबर १९५६ | दीक्षाभूमी, चंद्रपूर, महाराष्ट्र | ३,००,००० | हिंदू अनुसूचित जाती | बाबासाहेब आंबेडकरांद्वारे धम्मदीक्षा[११] |
७ डिसेंबर १९५६ | चैत्यभूमी, मुंबई, महाराष्ट्र | १०,००,००० पेक्षा जास्त | हिंदू अनुसूचित जाती | अंतिम संस्काराच्या प्रसंगी आंबेडकरांच्या पार्थिवाला साक्ष ठेवून[१२] |
डिसेंबर १९५६ | दिल्ली | ३०,००० | हिंदू अनुसूचित जाती | बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर[१३] |
डिसेंबर १९५६ | आग्रा, उत्तर प्रदेश | २०,००० | हिंदू अनुसूचित जाती | बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर[१४] |
१३ एप्रिल १९५७ | अलीगड, उत्तर प्रदेश | २,००,००० | हिंदू अनुसूचित जाती | बाबासाहेबांच्या अस्थींना साक्ष ठेवून धर्मांतर[१५] |
इ.स. १९६० ते १९६९
इ.स. १९७० ते १९७९
इ.स. १९८० ते १९८९
- १९८५ मध्ये जुनागढमध्ये ५,००० अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[१६]
इ.स. १९९० ते १९९९
इ.स. २००० ते २००९
धर्मांतराची तारीख | धर्मांतराचे स्थान | धर्मांतरित व्यक्तींची संख्या | धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग | संदर्भ व टीप |
---|---|---|---|---|
२७ मे २००७ | मुंबई, महाराष्ट्र | लक्ष्मण मानेसह १,००,००० | हिंदू धर्मीय ४२ पोटजातींचे भटके विमुक्त | रामदास आठवले व लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर[१७][१८] |
इ.स. २०१० ते २०१९
धर्मांतराची तारीख | धर्मांतराचे स्थान | धर्मांतरित व्यक्तींची संख्या | धर्मांतरितांचा पूर्वीचा धर्म/जात/प्रवर्ग | संदर्भ व टीप |
---|---|---|---|---|
ऑक्टोबर २०१६ | गुजरातमधील अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) व सुरेंद्रनगर ही शहरे | २,००० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [१९][२०][२१] |
मे २०१७ | उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हा | ८५० (१८० कुटुंबे) | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [२२] |
१४ एप्रिल २०१६ | दादर, मुंबई | २; रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ राजा वेमुला | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे दीक्षा[२३][२४] |
१३ ऑक्टोबर २०१६ | गुजरातमधील अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर शहरे | २११ | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [२५] |
१ ऑक्टोबर २०१७ | गुजरातची अहमदाबाद आणि बडोदा शहरे | ३०० पेक्षा जास्त | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [२६] |
२५ डिसेंबर २०१६ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ५,००० | हिंदू धर्मीय ओबीसी | [२७][२८] |
२५ डिसेंबर २०१७ | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ५,००० | हिंदू धर्मीय ओबीसी, ख्रिश्चन व मुसलमान | [२९][३०] |
११ एप्रिल २०१८ | शिरसगाव, महाराष्ट्र | ५०० पेक्षा अधिक | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | [३१] |
२९ एप्रिल २०१८ | गुजरातमधील उना | ३०० - ३५० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[३२][३३] |
२ जून २०१८ | दिल्लीतील लद्दाख बौद्ध भवनात | १२० | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती | हरियाणातील व्यक्ती[३४] |
१९ ऑक्टोबर २०१८ | पुखरायन (गाव), काणपूर देहत जिल्हा, उत्तर प्रदेश | १०,००० पेक्षा अधिक | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती व मागास वर्गीय | [३५][३६] |
ऑक्टोबर २०१८ (धम्मचक्र प्रवर्तन दिन) | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ६५,००० | हिंदू व्यक्ती | देशभरातील व्यक्ती[३७] |
६-८ ऑक्टोबर २०१९ (धम्मचक्र प्रवर्तन दिन) | दीक्षाभूमी, नागपूर, महाराष्ट्र | ६७,५४३ | हिंदू धर्मीय अनुसूचित जाती व मागास वर्गीय | देशभरातील व्यक्ती[३८][३९] |
धर्मांतरीत बौद्धांची स्थिती
भारतातील एकूण जेवढे बौद्ध आहेत त्यापैकी ८७% धर्मपरिवर्तनाच्या माध्यमाने बौद्ध बनलेले आहेत आणि यापैकी बरेच अनुसूचित जाती आहेत. धर्मांतर करुन बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानंतर मध्य प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशचा नंबर आहे.
साक्षरता
२०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार बौद्धांचा साक्षरता दर ८१.२९% आहे, राष्ट्रीय सरासरी ७२.९८% पेक्षा अधिक आहे तर हिंदुंमध्ये साक्षरता दर ७३.२७% आहे, तर अनुसूचित जातीचा साक्षरता दर ६६.०७% आहे. या आधारानुसार बौद्धांच्या विकासाचा फायदा मुख्यतः अनुसूचित जातींना प्राप्त होतो. झारखंड (८०.४१%), महाराष्ट्र (८३.१७%) आणि छत्तीसगड (८७.३४%) मध्ये सर्वाधिक साक्षर बौद्ध धर्मांचे लोक आहेत.
हे सुद्धा पहा
- हिंदू धर्मातून धर्मांतरित बौद्ध व्यक्तींची यादी
- नवबौद्ध चळवळ
- नवयान
- भारतामधील बौद्ध धर्म
- महाराष्ट्रामधील बौद्ध धर्म
संदर्भ
- ^ Zee News (2016-04-14), https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ, 2018-03-30 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta. 2013-12-06 https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/. 2018-03-30 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ marathibhaskar. 2011-10-06 http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html. 2018-03-14 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b Sangharakshita (2006). (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120830233 https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;:2
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ भारतीय जनगणना, १९५१ व १९६१
- ^ [१]
- ^ पुस्तक- आंबेडकर अँड बुद्धिझम; लेखक महास्थविर संघरक्षित
- ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ Times, Metro (ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५). मेट्रो टाइम्स: ३२.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ पुस्तक- आंबेडकर अँड बुद्धिझम; लेखक महास्थविर संघरक्षित
- ^ पुस्तक- आंबेडकर अँड बुद्धिझम; लेखक महास्थविर संघरक्षित
- ^ पुस्तक- आंबेडकर अँड बुद्धिझम; लेखक महास्थविर संघरक्षित
- ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
- ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-laxman-mane-writes-article-in-rashik-about-cast-of-president-5652122-NOR.html
- ^ https://www.thehindu.com/todays-paper/One-lakh-people-convert-to-Buddhism/article14769767.ece
- ^ https://www.bbc.com/hindi/india-37619084
- ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
- ^ dainikbhaskar (हिंदी भाषेत) https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/Rohith-Vemulas-mother-and-brother-converted-to-Buddhism/articleshow/51822970.cms
- ^ https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_rohit_vemula_family_converted_buddhism_rd
- ^ dainikbhaskar (हिंदी भाषेत) https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Navbharat Times. 2017-10-01 https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.esakal.com http://www.esakal.com/vidarbha/dhammadiksha-obc-people-23055. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.loksatta.com https://www.loksatta.com/nagpur-news/thousands-of-hindus-convert-to-buddhism-1369986//lite/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.archakmanews.com/over-5000-hindus-and-christians-embrace-buddhism-in-maharastras-nagpur/amp/
- ^ Shakya Gan (2017-12-28), https://m.youtube.com/watch?v=sSWaAvI_kiU, 2018-05-08 रोजी पाहिले Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.dw.com/hi/%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/a-43594709?xtref=http%253A%252F%252Fwww.google.com%252F
- ^ Loksatta. 2018-04-30 https://www.loksatta.com/desh-videsh-news/una-dalits-assaulted-by-cow-vigilantes-with-300-others-adopt-buddhism-quit-hinduism-1671233/?utm_source=FBLS_30042018utm_medium=Social. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). BBC News मराठी (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-43945628. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (हिंदी भाषेत) http://hindi.timesnownews.com/india/article/120-dalits-from-the-jind-haryana-converted-to-buddhism-as-state-government-did-not-fulfill-their-demands/235534. 2018-06-19 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ https://m.timesofindia.com/city/kanpur/over-10000-dalits-adopt-buddhism-in-kanpur-dehat/articleshow/66300146.cms
- ^ https://m.timesofindia.com/india/10000-dalits-in-up-district-convert-to-buddhism/articleshow/66299423.cms
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html?ref=fbo
- ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/dhammchakra-pravartan-din-news-in-marathi-125855855.html?ref=fbo
- ^ https://www.bhaskarhindi.com/news/55-thousand-followers-took-the-initiation-of-buddhism-88262