"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ १४३: ओळ १४३:


==निवडणूक चिन्ह==
==निवडणूक चिन्ह==
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "[[कपबशी]]" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना [[किल्ली]], [[शिट्टी]] व [[पतंग]] ही चिन्हे दिली होती. Gas cylinder(विधानसभा २०१९)
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "[[कपबशी]]" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना [[किल्ली]], [[शिट्टी]] व [[पतंग]] ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे.


==ध्वज==
==ध्वज==

१२:१४, १३ सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

वंचित बहुजन आघाडी
पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर
सचिव गोपीचंद पडळकर
स्थापना २० मे २०१८
राजकीय तत्त्वे संविधानवाद, आंबेडकरवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामीत्व
संकेतस्थळ www.joinvba.com

वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंबआ, व्हीबीए) हा २० मे २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली.[१] प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. अनेक सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.[२] या पक्षाने एआयएमआयएम पक्षांसह १७व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.[३][४] या युतीतील, एकमेव एआयएमआयएमचा उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंबआ व एआयएमआयएम ने एकत्रित ४१,३२,२४२ (७.६४%) मते मिळवली.

तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[५][६] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.[७]

इतिहास व पार्श्वभूमी

इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[८] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[९] आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.[१०]

१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[११] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.[१२] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एआयएमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला.[१३] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[१४]

२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[१५] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एआयएमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१६] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१७]

१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[१८][१९][२०][२१][२२]

२०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या जागा वाटपासंबंधी वंचित बहुजन आघाडी व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्यात मतभेद झाला आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांची युती तुटली.

उमेदवारी

मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[३][२३] प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.[२४] महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.[२५] त्यापैकी एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.[२६]

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तर ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.[२७]

लोकनिती-सीएसडीएस संस्थेच्या सर्व्हेक्षणानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बौद्ध धर्मीयांचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला तर मुस्लिम धर्मीयांचा पाठिंबा काँग्रेसला होता. महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम मते ८७% काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, १२% भाजप-शिवसेना युतीला व १% वंबआ-एआयएमआयएम युतीसह इतर पक्षांना मिळाली. बौद्ध मते ८१% वंचित बहुजन आघाडीला, १२% काँग्रेस आघाडीला, व ७% भाजप-सेना युतीला मिळाली.[२८]

उमेदवारांची यादी

सतरावी लोकसभा, २०१९ मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार
अ.क्र. मतदारसंघ उमेदवार निकाल मिळालेली मते
अकोला प्रकाश आंबेडकर पराभूत 278848
सोलापूर प्रकाश आंबेडकर पराभूत 170007
नांदेड यशपाल भिंगे पराभूत 166196
धुळे नबी अहमद अहमदुल्ला पराभूत 39449
अमरावती गुणवंत देवपारे पराभूत 65135
सांगली गोपीचंद पडळकर पराभूत 300234
बुलढाणा बळीराम सिरस्कार पराभूत 172627
लातूर राम गारकर पराभूत 112255
बीड विष्णू जाधव पराभूत 92139
१० परभणी आलमगीर खान पराभूत 149946
११ नाशिक पवन पवार पराभूत 109981
१२ मावळ राजाराम पाटील पराभूत 75904
१३ उस्मानाबाद अर्जुन सलगर पराभूत 98579
१४ हिंगोली मोहन राठोड पराभूत 174051
१५ माढा विजय मोरे पराभूत 51532
१६ कोल्हापूर अरुणा माळी पराभूत 63439
१७ नंदुरबार दाजमल गजमल मोरे पराभूत 25702
१८ रामटेक किरण रोडगे पराभूत 36340
१९ नागपूर सागर डबरासे पराभूत 26128
२० रत्नागिरी-सिंधुदुर्ग मारुती रामचंद्र जोशी पराभूत 30882
२१ यवतमाळ-वाशिम प्रवीण पवार पराभूत 94228
२२ जालना शरदचंद्र वानखेडे पराभूत 77158
२३ दिंडोरी बापू केळू बरडे पराभूत 58847
२४ पुणे अनिल जाधव पराभूत 64793
२५ बारामती नवनाथ पडळकर पराभूत 44134
२६ शिर्डी संजय सुखदान पराभूत 63287
२७ अहमदनगर सुधाकर आव्हाड पराभूत 31807
२८ सातारा सहदेव एवळे पराभूत 40673
२९ हातकणंगले असलम बादशाहजी सय्यद पराभूत 123419
३० शिरूर राहुल ओव्हाळ पराभूत 38070
३१ चंद्रपूर राजेंद्र महाडोळे पराभूत 112079
३२ गडचिरोली-चिमूर रमेश गजबे पराभूत 111468
३३ जळगाव अंजली बाविस्कर पराभूत 37366
३४ रावेर नितीन कांडेलकर पराभूत 88365
३५ वर्धा धनराज वंजारी पराभूत 36340
३६ भंडारा-गोंदिया एन.के. नान्ह पराभूत 45842
३७ पालघर सुरेश अर्जुन पडवी पराभूत 13728
३८ भिवंडी ए.डी. सावंत पराभूत 51455
३९ कल्याण संजय हेडावू पराभूत 65572
४० ठाणे मल्लिकार्जुन पुजारी पराभूत 47432
४१ उत्तर मुंबई सुनील उत्तम थोरात पराभूत 15651
४२ वायव्य मुंबई संभाजी शिवाजी काशीद पराभूत
४३ ईशान्य मुंबई नीहारिका खोंडले पराभूत 68239
४४ उत्तर मध्य मुंबई अब्दुल रहमान पराभूत 33703
४५ दक्षिण मध्य मुंबई संजय भोसले पराभूत 63412
४६ दक्षिण मुंबई अनिल कुमार पराभूत 30348
४७ रायगड सुमन कोळी पराभूत 23196

निवडणूक चिन्ह

२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टीपतंग ही चिन्हे दिली होती. महाराष्ट्र विधानसभा २०१९ निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना गॅस सिलेंडर हे चिन्ह मिळाले आहे.

ध्वज

३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळाहिरवा रंग घेतलेला आहे.

जाहीरनामा

६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.[२९][३०]

निवडणुका

लोकसभेसाठी निवडणुका

लोकसभा क्रमांक निवडणूक वर्ष लढवलेल्या
जागा
जिंकलेल्या
जागा
मिळालेली मते राज्यातील मतांचे
शेकडा प्रमाण
लढवलेल्या जागांवरील
मतांचे शेकडा प्रमाण
राज्य (जागा)
१७वी लोकसभा २०१९ ४७ ०० ३७,४३,२०० ६.९२ ७.०८ महाराष्ट्र (०)


पक्षाचे पदाधिकारी

वंचित बहुजन आघाडी कार्यकारिणी खालीलप्रमाणे:

  1. अध्यक्ष तथा सर्वेसर्वा - प्रकाश आंबेडकर
  2. उपाध्यक्ष –
    1. शंकरराव लिंगे
    2. विजयराव मोरे
    3. धनराज वंजारी
  3. महासचिव – गोपीचंद पडळकर
  4. सचिव –
    1. राजाराम पाटील
    2. डॉ. अरुण सावंत
    3. सचिन माळी
    4. ए.आर. अंजेरीया
    5. कुशल मेश्राम
    6. प्रा. किसन चव्हाण
    7. अनिल जाधव
    8. नवनाथ पडळकर
    9. शिवानंदजी हैबतपुरे
  5. स्वतंत्र प्रभार व पक्षीय जबाबदारी
    1. राम गारकर
    2. सचिन माळी
    3. मोहन राठोड
    4. प्रा.यशपाल भिंगे
  6. पार्लमेंट्री बोर्ड
    1. अण्णाराव पाटील
    2. अशोक सोनवणे
  7. महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष – रेखा ठाकूर

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ www.jagran.com (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.
  9. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-04-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ Sat, सुधीर महाजन on; March 30; 2019 9:22pm. Lokmat http://www.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/. 2019-04-22 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ The Quint Hindi (इंग्रजी भाषेत) https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ Loksatta https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-lok-sabha-election-2019-bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-aghadi-says-prakash-ambedkar-1857578/. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/akola/bharip-bahujan-mahasangh-will-merge-vanchit-bahujan-alliance-big-decision-prakash-ambedkar/. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/a-big-decision-of-prakash-ambedkar-bharip-bahujan-mahasangh-will-merge-with-vanchit-bahujan-alliance-6034113.html. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47514003. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47587553. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/. 2019-04-20 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ Khushbu. India TV Hindi (hindi भाषेत) https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  26. ^ कदम, अमृता (2019-05-24). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-48393039. 2019-05-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ results.eci.gov.in http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19. 2019-05-28 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/mahaelection-87-muslim-behind-the-congress-mim-hits-breakthrough-1567826038.html
  29. ^ www.esakal.com https://www.esakal.com/loksabha-2019-pune/kg-pg-education-assures-free-vanchit-bahujan-alliance-181673. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/pune/our-manifesto-code-constitution-deprived-bahujan-lead/. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे