Jump to content

"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६२: ओळ ६२:
२५) सर्वदर्शी आंबेडकर – कविता पी. विठ्ठल
२५) सर्वदर्शी आंबेडकर – कविता पी. विठ्ठल


== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२०:२३, ३१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने तयार केलेले पुस्तक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बहुश्रुत, बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.[]


डॉ. आंबेडकरांनी उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे व समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदाययित्व आहे. ते निभावण्याचा प्रयत्न नांदेड विद्यापीठाने या ग्रथांच्या माध्यमातून केला आहे.


विविध अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावरती या ग्रंथामधून प्रकाश टाकला आहे. डॉ. पी. विठ्ठल आणि डॉ. नागोराव कुंभार यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे.

अनुक्रमणिका

विभाग अ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मूल्यदृष्टी :-

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धार्मिक संकल्पना आणि धर्मांतर – डॉ. जनार्दन वाघमारे

२) डॉ. बाबासाहेबांचा बुद्ध व त्यांचा धम्म – डॉ. रावसाहेब कसबे

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म विषयक तत्त्वज्ञान – डॉ. ज. रा. दाभोळे

४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक मूल्यविषयक दृष्टिकोण – प्रा.सुहास पळशीकर

५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वंतत्रविषयक संकल्पना – प्रा. जयदेव डोळे

६) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही संकल्पना – बी.व्ही. जोंधळे

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाहीची संकल्पना – प्रा. मोतीराम कटारे

८) राजकारण, धर्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. राजीव आरके

९) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रजासत्ताक राष्ट्रवाद – प्रा. डॉ. सिधोधन (?)

विभाग ब

१०) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा शैक्षणिक संदर्भ – डॉ. पंडित विद्यासागर

११) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेक्षणिक विचार – डॉ. नागोराव कुभार

१२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कामगारांचे प्रश्न – डॉ. गंगाधर पानतावणे

१३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीविषयक विचार – ज.वी. पवार

१४) जागतिकीकरण व डॉ. आंबेडकर प्रणीत दलितांचा मुक्तिप्रपंच – डॉ. आनंद तेलतुंबडे

१५) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती – प्रतिक्रांतीचे वास्तव - डॉ. संजय मून

१६) जातिव्यवस्थेचे राजकीय अर्थशास्त्र डॉ. आंबेडकर यांचे योगदान – प्रा. सचिन गरुड

१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक विचारांची वर्तमान उपयुक्तता – डॉ. पी.एस. कांबळे

१८) आंबेडकर विचारधारा आणि आदिवासी क्रांतिवाङ्मय – डॉ. वैजनाथ अनमुलवाड

१९) अतुलनीय अद्भुत – डॉ. नरेद्र जाधव

२०) वेटिंग फॉर व्हिसा – प्रा. अविनाश डोळस

२१) राष्ट्रनिर्माता डॉ. आंबेडकर –डॉ. प्रकाश मोगले

२२) डॉ.आंबेडकर व हिंदू कोडबिल – डॉ. संगीता ठोसर

२३) हेद्राबाद स्वतंत्र सागरम व डॉ. आंबेडकर – डॉ. प्रकाश वाघमारे

२४) डॉ. आंबेडकर विद्रोही – सृजनशील संकृतीचा महान आदर्श - डॉ. राजेश्वर दुडूकनाळे

२५) सर्वदर्शी आंबेडकर – कविता पी. विठ्ठल

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [१]