Jump to content

"आंबेडकर जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५०: ओळ ५०:


== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची]]
* [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी]]
* [[महापरिनिर्वाण दिन]]
* [[महापरिनिर्वाण दिन]]
* [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]
* [[धम्मचक्र प्रवर्तन दिन]]

२३:५१, १८ जुलै २०१९ ची आवृत्ती

आंबेडकर जयंती
जाफ्राबादमधील १२६वी आंबेडकर जयंती, इ.स. २०१७
अधिकृत नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
इतर नावे भीम जयंती
साजरा करणारे भारत व जगातील ६० पेक्षा अधिक देशातील बौद्ध, हिंदू व इतर लोक
प्रकार सामाजिक
उत्सव साजरा १ दिवस
सुरुवात १४ एप्रिल १९२८, पुणे (जनार्धन रणपिसे यांच्याद्वारे)
दिनांक १४ एप्रिल
वारंवारता वार्षिक
जाफ्राबादमध्ये १२६वी आंबेडकर जयंती
जाफ्राबादमध्ये १२६वी आंबेडकर जयंती

आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस असून एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. भारतासह जगभरात हा उत्सव साजरा केला जातो.[] हा सामाजिक व सांस्कृतिक स्वरूपाचा सण आहे. भारतातील अनेक राज्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. या दिवशी आंबेडकरांना सर्व स्तरातील लोकांद्वारे अभिवादन केले जाते. आंबेडकरवादी बौद्ध लोक या दिनाला ‘समता दिन’ आणि ‘ज्ञान दिन’ म्हणूनही साजरा करतात, कारण बाबासाहेब आंबेडकरांना ‘समतेचे प्रतिक’ तसेच ‘ज्ञानाचे प्रतिक’ मानले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.[][]

बाबासाहेबांच्या प्रत्येक जन्मदिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी महू (मध्य प्रदेश), दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत आंबेडकर जयंती साजरी केली जाते.[][]

नवी दिल्ली, भारतीय संसदेमध्ये त्यांच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा मर्तीला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात.

अभिवादने

इ.स. २०१५ मध्ये, गुगलने बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंती निमीत्त आपल्या 'गूगल डूडल' वर त्यांची प्रतिमा लावून त्यांना अभिवादन केले होते.[][][] हे गूगल डूडल तीन खंडातील ७ देशांत प्रसिद्ध करण्यात आले होते.

इ.स. २०१६ मध्ये, संपूर्ण जगासह भारत सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती गुरूवार रोजी साजरी केली. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्रानेे बाबासाहेबांना विश्वाचा प्रणेता म्हणून गौरव केला.[] संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती डॉ॰ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, बाबासाहेब यांच्यशिवाय जगात केवळ दोन असे महापुरूष आहेत ज्यांची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली – मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला.[] डॉ. आंबेडकर, किंग आणि मंडेला हे तिन्ही महापुरूष मानवी हक्क संघर्षाचे सर्वात महान नेते राहिलेले आहेत.

इ.स. २०१७ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जन्मदिवस यापुढे ‘ज्ञान दिन’ म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.[१०]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ट्विटरकडून खास इमोजी तयार करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले होते.[११][१२]

साजरीकरण

पूर्ण भारतभर वाराणसी, दिल्ली सोबत दुसऱ्या मोठ्या शहरांत प्रचंड जोश-उल्लासात आंबेडकर जयंती साजरी केली जाते. कचेरी क्षेत्रात डॉ. आंबेडकर जयंती समारोह समिती द्वारा डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस उत्सवासाठी कार्यक्रम वाराणसीत आयोजित केला जातो. आंबेडकरवादी विभिन्न प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात जसे चित्रकला, सामान्य ज्ञान प्रश्न-उत्तर स्पर्धा, चर्चा, नृत्य, निबंध लेखन, परिचर्चा, खेळ स्पर्धा आणि नाटक ज्यासाठी जवळच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थांसोबत अनेक लोक भाग घेतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी, लखनऊमध्ये भारतीय पत्रकार लोक कल्याण संघ द्वारा प्रत्येक वर्षी एक मोठा सेमीनार आयोजीत केला जातो.

आंबेडकर जयंती कुठे साजरी केली जाते

आंबेडकर जयंती संपूर्ण विश्वात विशेषत: संपूर्ण भारतात व्यापक प्रमाणात साजरी केली जाते. भारताच्या प्रत्येक राज्यात, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील लाखों गावांत साजरी केली जाते. भारतीय समाज, लोकशाही, राजनीती इत्यादी क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा खोलवर प्रभाव पडलेला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणारे काही प्रमुख देश

भारत, अमेरीका, ऑस्ट्रिया, बहरीन, ब्राजील, डेनमार्क, बांग्लादेश, मिस्र, जर्मनी, ग्वाटेमाला, हाँग काँग, इंडोनेशिया, इराक, आयरलंड, सउदी अरब, दक्षिण आफ्रिका, जपान, मेडागास्कर, मंगोलिया, नेपाळ, ओमान, फ्रांस, श्रीलंका, सेशेल्स, दक्षिण सूडान, स्पेन, स्विझरलॅड, तंजानिया, संयुक्त राजशाही (ग्रेट ब्रिटेन, लंडन), युक्रेन, कॅनडा, हंगरी, म्यान्मार, कुवैत, आस्ट्रेलिया, मलेशिया, न्यूजीलंड, थायलंड, चीन, पाकिस्तान, दुबई, कैलिफोर्निया, सैन फ्रांसिस्को इत्यादी देश आंबेडकर जयंती साजरी करतात.[१३]

जगातील ६५ पेक्षा अधिक देशांत दर वर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Ambedkar Jayanti from ccis.nic.in on 19th March 2015
  2. ^ एप्रिल २०१८ चे लोकराज्य (महाराष्ट्र शासनाचे मासिक)
  3. ^ a b Loksatta. 2018-04-14 https://www.loksatta.com/desh-videsh-news/how-birth-anniversary-started-of-babasaheb-ambedkar-1660712/. 2018-06-19 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.mea.gov.in/ambedkar.htm जहामध्ये आंबेडकर जयंती
  5. ^ . The Telegraph http://www.telegraph.co.uk/technology/google/google-doodle/11534732/B.R.-Ambedkar-a-hero-of-Indias-independence-movement-honoured-by-Google-Doodle.html. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ . The Times of India http://timesofindia.indiatimes.com/tech/tech-news/Google-doodle-marks-Dr-BR-Ambedkars-124th-birthday/articleshow/46915919.cms. 9 January 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Google Honored Dr. Babasaheb Ambedkar with Google Doodle https://drambedkarbooks.com/2015/04/13/google-honored-dr-babasaheb-ambedkar-with-google-doodle/
  8. ^ United Nations to celebrate Dr. Babasaheb Ambedkar’s Jayanti but at what cost? [१]
  9. ^ prahaar.in (इंग्रजी भाषेत) http://prahaar.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ desale, sunil. India.com (इंग्रजी भाषेत) http://www.india.com/marathi/maharashtra/babasaheb-ambedkar-jayanti-2017-ambedkar-jayanti-to-be-celebrated-as-gyan-diwas/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ Loksatta. 2017-04-13 https://www.loksatta.com/desh-videsh-news/twitter-salutes-iconic-dr-ambedkar-with-emoji-hashtags-1451841/. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ Lokmat. 2017-04-14 http://m.lokmat.com/storypage.php?catid=2&newsid=18865198. 2018-05-08 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ "125th birth Anniversary of Dr Ambedkar and first statue in Sajókaza, Hungary, Central Europe". 1 मे, 2016. 3 मार्च, 2019 रोजी पाहिले – YouTube द्वारे. |accessdate=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे