"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ३६: | ओळ ३६: | ||
==उमेदवारी== |
==उमेदवारी== |
||
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ [[लोकसभा]] उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या [[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्मांचा]] उल्लेख करण्यात आलेला होता. [[धनगर]], [[कुणबी]], [[भिल्ल]], [[बौद्ध]], [[कोळी]], [[वडार]], [[लोहार]], [[वारली]], [[बंजारा]], [[मुसलमान|मुस्लिम]], [[माळी]], [[कैकाडी]], [[धिवर]], [[मांग|मातंग]], [[आगरी]], [[शिंपी]], [[लिंगायत]] आणि [[मराठा]] अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी [[मराठा|मराठ्यांशिवाय]] इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. [[शिवसेना]], [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], [[राष्ट्रवादी काँग्रेस]] ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.<ref name=":1">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47587553|शीर्षक='लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'|last=कोण्णूर|first=तुषार कुलकर्णी आणि मयुरेश|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref> प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-04-20}}</ref> महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघाच्या]] एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313|शीर्षक=महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?|last=Khushbu|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=India TV Hindi|भाषा=hindi|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref> त्यापैकी एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार [[इम्तियाज जलील]] विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.<ref>https://www.bbc.com/marathi/india-48393039</ref> |
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ [[लोकसभा]] उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या [[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्मांचा]] उल्लेख करण्यात आलेला होता. [[धनगर]], [[कुणबी]], [[भिल्ल]], [[बौद्ध]], [[कोळी]], [[वडार]], [[लोहार]], [[वारली]], [[बंजारा]], [[मुसलमान|मुस्लिम]], [[माळी]], [[कैकाडी]], [[धिवर]], [[मांग|मातंग]], [[आगरी]], [[शिंपी]], [[लिंगायत]] आणि [[मराठा]] अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी [[मराठा|मराठ्यांशिवाय]] इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. [[शिवसेना]], [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], [[राष्ट्रवादी काँग्रेस]] ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.<ref name=":1">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47587553|शीर्षक='लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'|last=कोण्णूर|first=तुषार कुलकर्णी आणि मयुरेश|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref> प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-04-20}}</ref> महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघाच्या]] एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313|शीर्षक=महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?|last=Khushbu|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=India TV Hindi|भाषा=hindi|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref> त्यापैकी एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार [[इम्तियाज जलील]] विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-48393039|शीर्षक=या 7 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे झाला काँग्रेसचा पराभव?|last=कदम|first=अमृता|date=2019-05-24|access-date=2019-05-28|language=en-GB}}</ref> |
||
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, तर अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तसेच ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.<ref> |
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, तर अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तसेच ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19|शीर्षक=General Election 2019 - Election Commission of India|संकेतस्थळ=results.eci.gov.in|अॅक्सेसदिनांक=2019-05-28}}</ref> |
||
=== उमेदवारांची यादी === |
=== उमेदवारांची यादी === |
१७:१९, २८ मे २०१९ ची आवृत्ती
वंचित बहुजन आघाडी | |
---|---|
चित्र:Flag of Vanchit Bahujan Aghadi.png | |
पक्षाध्यक्ष | प्रकाश आंबेडकर |
सचिव | सागर डबरासे |
स्थापना | २० मे २०१८ |
राजकीय तत्त्वे | संविधानवाद, आंबेडकरवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, पुरोगामीत्व |
संकेतस्थळ | www.joinvba.com |
वंचित बहुजन आघाडी (संक्षिप्त: वंबआ, व्हीबीए) हा २० मे २०१८ रोजी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी असून समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांसोबत युती किंवा आघाडी आहे. १५ मार्च २०१९ रोजी वंचित बहुजन आघाडीस महाराष्ट्रातील नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली.[१] प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या पक्षासह जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत सहभागी आहेत.[२] या पक्षाने एआयएमआयएम पक्षांसह १७व्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या, ज्यात एका जागेवर एआयएमआयएम उमेदवार उभा होता तर इतर ४७ जागांवर वंबआचे उमेदवार उभे होते.[३][४] या युतीतील, एकमेव एआयएमआयएम चा उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचे संपूर्ण ४७ उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये वंबआ व एआयएमआयएम ने एकत्रित ४१,३२,२४२ (७.६४%) मते मिळवली.
तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा पिंकी शेख ह्या वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्त्या आहेत. दिशा शेख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते म्हणून कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) आहेत.[५][६] तसेच पक्षाचे प्रदेश महासचिव म्हणून सागर डबरासे कार्य करीत आहेत.[७]
इतिहास व पार्श्वभूमी
इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[८] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[९] आंबेडकरांनी पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेतले. १९९९ ते २०१४ पर्यंतच्या सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत.[१०]
१ जानेवारी २०१८ रोजी पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाज मेळाव्यात "वंचित बहुजन आघाडी" हे नाव सर्वप्रथम वापरले गेले. या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते. यानंतर अनेक शोषित, वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे अशा सर्व समाजांच्या संघटना यात सहभागी होत गेल्या. सध्या बहुजन वंचित आघाडीत जवळपास १०० लहान पक्ष व सामाजिक संघटना सहभागी झालेल्या आहेत.[११] जून २०१८ मध्ये, लक्ष्मण माने, हरिदास भदे आणि विजय मोरे यांच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची 'वंचित बहुजन आघाडी' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. "या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील. प्रत्येक पक्षाचं अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल." अशाप्रकारे आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली. त्यानंतर २० मे २०१८ रोजी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. १५ मार्च २०१९ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील नोंदणीकृत पक्षांची यादी जाहीर केली त्यानुसार वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत 'राजकीय पक्ष' म्हणून मान्यता मिळाली आहे, आणि पुढे यात भारिप बहुजन महासंघ पक्ष विलीन करणार असल्याचेही आंबेडकरांनी म्हटले आहे.[१२] वंचित बहुजन आघाडीचे पहिले अधिवेशन किंवा सभा २८ सप्टेंबर २०१८ रोजी सोलापुरात झाले होती, ज्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर एआयएमआयएम ला या आघाडीत सहभागी करण्यासाठी एआयएमआयएम पक्षाचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी एआयएमआयएम चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांच्याशी चर्चा केली व ती सकारात्मक ठरली, त्यानंतर ओवैसी यांनी २ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या औरंगाबादमधील वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबादच्या सभेमधे बहुजन वंचित आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले आणि एआयएमआयएम पक्ष आघाडीमध्ये सहभागी झाला. या आघाडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यात येणार आहेत.[१३] आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत महाराष्ट्र राज्यभर सभा-मेळावे घेऊन निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी वातावरण निर्मिती केली. सुरुवातीला शेतकरी, कामगार, युवक, आरक्षण अशा वेगवेगळ्या नावाने परिषदा घेऊन विविध समाजघटकांना संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यात सत्ता संपादन मेळावे घेऊन राजकारणात उतरण्याची तयारी केली.[१४]
२३ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथील शिवाजी पार्कवर वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली होती. ह्या सभेचे अध्यक्ष आगरी-कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील होते तसेच प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवैसी यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्या परिषदेत ओबीसींच्या हक्काबद्दलचे प्रश्न मांडण्यात आले तसेच मुंबईत आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी यांची २०० गावठाणे आहेत. त्यांचे सीमांकन करून भुमिपूत्रांना प्रॉपर्टी कार्ड मिळावेत, त्यांना स्वयंविकासाचा अधिकार सरकारने द्यावा. याचप्रमाने झोपड़पट्टयांचा विकासही गावठाण हक्क कायद्याने व्हावा ह्या मागण्या करण्यात आल्या. शिवाजी पार्कवरील या सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला होता, तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षाही अधिक जनसमुदाय वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उपस्थित होता.[१५] या आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीसुद्धा भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरांनी जावे, यासाठी प्रयत्न झाले होते. वंचित घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर, माळी, भटके, ओबीसी, छोटे ओबीसी व मुसलमान अशा सहा घटकांना लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा अशा एकूण १२ जागांचा प्रस्ताव आंबेडकरांनी काँग्रेसपुढे ठेवला. यावर काँग्रेसने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळे आंबेकडरांनी एआयएमआयएमची साथ घेतली. त्यानंतर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला चार जागा देऊ केल्या.[१६] "आम्ही काँग्रेससमोर [सुरुवातीला] १२ जागांचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्या प्रस्तावाला अनुकुल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर [आता] २२ जागांबाबतही चर्चा होती. पण तीदेखील बारगळली आहे," असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच आता थेट ४८ जागांची तयारी करून ठेवली असल्याचेही आंबेडकरांनी सांगितले.[१७]
१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी भारिप बहुजन महासंघ या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[१८][१९][२०][२१]
लोकसत्ताचे सहसंपादक मधु कांबळे यांच्या मतानुसार, "वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार लोकसभेवर निवडून येतील की नाही, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. पण विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर अशा मतदारसंघांमध्ये नक्कीच प्रभाव पाडतील." तसेच त्यांनी असे निरीक्षणही नोंदवले की, "मुंबईतही ईशान्य, दक्षिण-मध्य आणि वायव्य या तीन मतदारसंघांमध्ये दलित आणि मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चांगली कामगिरी करू शकतात."[२२]
उमेदवारी
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या जातीचा किंवा धर्मांचा उल्लेख करण्यात आलेला होता. धनगर, कुणबी, भिल्ल, बौद्ध, कोळी, वडार, लोहार, वारली, बंजारा, मुस्लिम, माळी, कैकाडी, धिवर, मातंग, आगरी, शिंपी, लिंगायत आणि मराठा अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी मराठ्यांशिवाय इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.[३][२३] प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.[२४] महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबाद मतदारसंघाच्या एका जागेवर एआयएमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.[२५] त्यापैकी एआयएमआयएम चा एकमेव उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाला तर वंबआचा कोणताही उमेदवार जिंकू शकला नाही. राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी ८० हजारांहून अधिक मते घेतली आहेत.[२६]
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, तर अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तसेच ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.[२७]
उमेदवारांची यादी
निवडणूक चिन्ह
२०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीच्या बहुतेक उमेदवारांना "कपबशी" हे निवडणूक चिन्ह दिले होते, तर काही उमेदवारांना किल्ली, शिट्टी व पतंग ही चिन्हे दिली होती.
ध्वज
३१ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत ध्वजाचे अनावरण केले. या ध्वजात अशोकचक्रासह निळा भीम ध्वज, केशरी, पिवळा व हिरवा रंग घेतलेला आहे.
जाहीरनामा
६ एप्रिल २०१९ रोजी, वंचित बहुजन आघाडीने भारतीय संविधानाचा सरनामा हाच त्यांचा जाहीरनामा असल्याचे सांगितले. या जाहीरनाम्यात वेगवेगळ्या २७ मुद्द्यांवर भर देण्यात आला होता. त्यामध्ये केजी ते पीजी मोफत शिक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत आणणे, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देणे, तसेच शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणे अशी अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आलेली होती.[२८][२९]
निवडणुका
लोकसभेसाठी निवडणुका
लोकसभा क्रमांक | निवडणूक वर्ष | लढवलेल्या जागा |
जिंकलेल्या जागा |
मिळालेली मते | राज्यातील मतांचे शेकडा प्रमाण |
लढवलेल्या जागांवरील मतांचे शेकडा प्रमाण |
राज्य (जागा) |
---|---|---|---|---|---|---|---|
१७वी लोकसभा | २०१९ | ४७ | ०० | ३७,४३,२०० | ६.९२ | ७.०८ | महाराष्ट्र (०) |
हे सुद्धा पहा
- आंबेडकरवाद
- महाराष्ट्रातील राजकारण
- भारतीय रिपब्लिकन पक्ष
- भारिप बहुजन महासंघ
- सतरावी लोकसभा
- २०१९ लोकसभा निवडणुका
संदर्भ
- ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/maharashtra/depatriate-bahujan-leaders-turn-maharashtra-change/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.jagran.com (हिंदी भाषेत) https://www.jagran.com/elections/lok-sabha-prakash-ambedkar-front-to-contest-all-48-lok-sabha-seats-in-maharashtra-19037696.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ a b (इंग्रजी भाषेत). 2019-03-15 https://www.bbc.com/marathi/india-47583698. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-bjp-shivsena-will-get-advantage-in-loksabha-election-2019-after-prakash-ambedkar-break-alliance-hope-with-congress-dlpg-1753129.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/ahmadnagar/location-third-party-deprived-bahujan-frontier-sheik/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/transgender-social-activist-and-poet-disha-pinky-shaikh-has-been-appointed-as-the-state-spokesperson-of-the-vanchit-bahujan-aaghadi/articleshow/68129797.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/nagpur-vidarbha-news/nagpur/strengthen-the-deprived-bahujan-alliance/articleshow/66800325.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.
- ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-04-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Sat, सुधीर महाजन on; March 30; 2019 9:22pm. Lokmat http://www.lokmat.com/editorial/lok-sabha-election-2019-vanchit-bahujan-aaghadi-new-political-power-maharashtra/. 2019-04-22 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Maharashtra Times https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/prakash-ambedkar-announced-vanchit-bahujan-aghadi-in-state/articleshow/64660700.cms. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ The Quint Hindi (इंग्रजी भाषेत) https://hindi.thequint.com/news/india/prakash-ambedkar-and-asaduddin-owaisi-alliance-in-maharashtra-problem-for-congress. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta https://www.loksatta.com/mumbai-news/dalit-leader-prakash-ambedkar-rally-in-mumbai-on-saturday-1843952/. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ News18 Lokmat https://lokmat.news18.com/mumbai/prakash-ambedkar-rally-in-mumbai-344459.html. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta https://www.loksatta.com/aurangabad-news/ashok-chavan-help-prakash-ambedkar-1851287/. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ News18 India https://hindi.news18.com/news/maharashtra/mumbai-loksabha-election-2019-maharashtra-bahujan-vanchit-aghadi-prakash-ambedkar-declares-no-aliiance-to-congress-and-fight-independently-loksabha-election-dlpg-1751764.html. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Loksatta https://www.loksatta.com/desh-videsh-news/after-lok-sabha-election-2019-bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-aghadi-says-prakash-ambedkar-1857578/. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ अकोला, उमेश अलोणे, एबीपी माझा. ABP Majha https://abpmajha.abplive.in/election/bharip-bahujan-mahasangh-merge-in-vanchit-bahujan-alliance-says-prakash-ambedkar-643168. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/akola/bharip-bahujan-mahasangh-will-merge-vanchit-bahujan-alliance-big-decision-prakash-ambedkar/. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ divyamarathi https://divyamarathi.bhaskar.com/news/a-big-decision-of-prakash-ambedkar-bharip-bahujan-mahasangh-will-merge-with-vanchit-bahujan-alliance-6034113.html. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ टिल्लू, रोहन (2019-03-10). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47514003. 2019-03-12 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ कोण्णूर, तुषार कुलकर्णी आणि मयुरेश (2019-03-15). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-47587553. 2019-03-15 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ author/lokmat-news-network. Lokmat http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/. 2019-04-20 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Khushbu. India TV Hindi (hindi भाषेत) https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313. 2019-05-03 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ कदम, अमृता (2019-05-24). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/marathi/india-48393039. 2019-05-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ results.eci.gov.in http://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19. 2019-05-28 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ www.esakal.com https://www.esakal.com/loksabha-2019-pune/kg-pg-education-assures-free-vanchit-bahujan-alliance-181673. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ author/online-lokmat. Lokmat http://www.lokmat.com/pune/our-manifesto-code-constitution-deprived-bahujan-lead/. 2019-04-08 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- भारिप – एआयएमआयएमच्या मैत्रीतून राजकीय चित्र बदलणार?
- Lok Sabha Election 2019 : वंचित बहुजन आघाडी : नवी राजकीय शक्ती, By सुधीर महाजन on Sat, March 30, 2019
- 'वंचित बहुजन आघाडी'चे राजकीय यश भलेही मर्यादित असेल, पण ती उद्याच्या महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलू शकते!