"संकल्प भूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३: ओळ २३:
[[वर्ग:वडोदरा]]
[[वर्ग:वडोदरा]]
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:बौद्ध तीर्थस्थळे]]
[[वर्ग:दलित संस्कृती]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]

१२:३९, २३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

दिल्लीतील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.

संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. येथे दरवर्षी लक्षावधी लोक भेटी देत असतात.[१] २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेमध्ये आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण अस्पृश्य समाजाला या जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता.[२][३] १४ एप्रिल २००६ रोजी आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेचे "संकल्प भूमी" असे नामकरण करण्यात आले. गुजरात सरकार द्वारे येथे भव्य आंबेडकर स्मारक निर्माण करण्यात येणार आहे.[४]

हे गुजरात मधील एक प्रमुख बौद्ध व दलित तीर्थस्थळ म्हणून विकसित झाले असून येथे लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[५][६]

इतिहास

सयाजी महाराजांच्या वडोदरा संस्थानाकडूनं मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे इ.स. १९१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. या दोघांमधील करार असा होता की, आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या बदल्यात वडोदरा संस्थानामध्ये काही काळ काम करावे लागणार. या कराराअंतर्गत, २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकर आपल्या थोरल्या भावासह बडोदा येथे पोहोचले. तथापि, त्यांना रेल्वे स्थानकावरून आणण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला होता, परंतु एका अस्पृश्याला आणण्यासाठी कुणीही तयार झाले नाही, त्यामुळे आंबेडकरांना स्वतःच व्यवस्था करून पोहोचावे लागले. त्यांना आपल्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार होती, त्यासाठी ते जागा शोधत होते, परंतु त्यांच्या वडोदऱ्यात पोहोचण्यापूर्वीच बॉम्बेवरून एक महार युवक वडोदरा संस्थानात नौकरीसाठी येत असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे त्यांच्या "अस्पृश्य" जातीची माहिती झाल्यामुळे कोणीही हिंदू आणि अहिंदू लोक त्यांना जेवण व राहण्यासाठी जागा देण्यासाठी तयार झाले नाही. शेवटी, त्यांना नाव बदलून व अधिकचे भाडे देऊन एका पारसी धर्मशाळेत राहण्यासाठी जागा मिळाली.[२][३]

सयाजीराव गायकवाड यांना आंबेडकरांना अर्थमंत्री बनवण्याची इच्छा होती पण अनुभव नसल्यामुळे आंबेडकरांनी सैनाच्या सचिव पदाचा स्वीकार केला. सचिवालयात आंबेडकरांना अस्पृश्य असल्यामुळे खूप अपमानीत व्हावे लागले, त्यांनी तेथील पाणी सुद्धा पिण्यासाठी मिळत नव्हते. कर्मचारी-चपराशी हे दुरुनच आंबेडकरांकडे फाईल्स फेकत असत, त्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या पूर्वी फर्शीवर पडलेल्या चटया हटवल्या जात होत्या, असल्या अमानवीय व्यवहारांच्या नंतरही ते आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अग्रेसर असत, परंतु त्यांना तेव्हाच अभ्यासासाठी ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळे जेव्हा तेथे रिकाम्या वेळेत दुसरा किंवा अन्य कोणी हजर नसेल. यासारख्या अनेक गैरव्यवहार त्यांना सहन करावा लागला, कारण तेथे जातियता अधिकच तीव्र होती.[२][३]

यानंतर आंबेडकर राहत असलेल्या ठिकाणी एक घटना घडली, पारसी आणि हिंदूंना कळले की पारसींच्या धर्मशाळेमध्ये रहाणारा व्यक्ती हा अस्पृश्य (दलित) आहे. रात्रीच्या वेळी तेव्हा क्रोधित झालेल्या पारसी व हिंदू लोकांचा समूह लाठ्या-काठ्या घेऊन हॉटेलच्या बाहेर जमला आणि हॉटेलमधून आंबेडकरांना बाहेर काढण्यासाठीची मागणी करू लागला. त्यांनी आंबेडकरांनी विचारले की, तू कोण आहेस? त्यावर आंबेडकर म्हणाले , मी एक हिंदू आहे. त्यालोकांपैकी एक जण म्हणाला की, मला माहिती आहे की तू एक अस्पृश्य आहेस, आणि तू आमचे अथितीगृह बाटवले (अपवित्र केले) आहे! तू येथून आत्ताच चालता हो! आंबेडकर म्हणाले की, सध्या रात्रीची वेळ आहे त्यामुळे मला केवळ ८ तासांची अधिक सवलत मला द्यावी, मी सकाळी येथेन निघून जाईन, अशाप्रकारची विनंती आंबेडकरांनी त्या लोकांना केली. परंतु त्या लोकांनी त्यांचे काहिही न ऐकता त्यांचे सामान बाहेर फेकून दिले. अखेरीस आंबेडकरांना अपमानीत होऊन रात्रीच्या वेळीच ते हॉटेल सोडून जावे लागले. त्यांना राहण्यासाठी इतर कोणी हिंदू किंवा मुसलमान आदींनी सुद्धा जागा दिली नाही. त्यांना रात्री राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यामुळे त्यांना ते ठिकाण सोडावे लागले. त्या रात्री त्यांनी जवळच्या एका उद्यानामधील (सध्या सजायी उद्यान) एक वडाच्या झाडाखाली दुःखी मनाने रात्र काढली. पण ही रात्र डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची रात्र होती. त्यांनी असा विचार केला की जेव्हा माझ्यासारख्या परदेशातून शिकून आलेल्या विद्वान व्यक्तीसोबत हिंदू अशा प्रकारे वागतात, तर जे माझ्या (अस्पृश्य) समाजातील अशिक्षित आणि गरीब लोक आहेत, त्यांच्याशी कसे वागले जात असेल? तेव्हा त्यांनी त्या झाडाथाली संकल्प केला की ते संपूर्ण आयुष्य या वंचित आणि उपेक्षित समाजाच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी व्यतित करेल. त्यांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देईल. आंबेडकरांनी ८ तास या उद्यानात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आंबेडकर परत मुंबई ला निघून गेले.[२][३]

वडोदराच्या ज्या सयाजी पार्कमध्ये बाबासाहेबांनी हा संकल्प केला होता, त्या जागेच्या ठिकाणी १४ एप्रिल २००६ रोजी एक चौथरा बांधून "संकल्प भूमी" असे नामकरण केले गेले. दरवर्षी येथे देशभरातून लक्षावधी आंबेडकरवादी लोक एकत्र येऊन आंबेडकरांच्या त्या संकल्पाने पुनर्उच्चारण करून आंबेडकरांना अभिवादन करित असतात. गुजरात सरकारने येथे भव्य आंबेडकर स्मारक उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे.[७][८][९][२][३]

संरचना

संदर्भ

  1. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/dalits-organise-rally-in-vadodara-to-pay-tribute-to-ambedkars-resolve/. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d e (इंग्रजी भाषेत) http://www.dalitdastak.com/mayawati-will-go-vadodara-sankalp-bhumi/. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b c d e jansangharsh.in http://jansangharsh.in/ambedkar-sankalp-bhumi-vadodara/amp/. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/city/vadodara/Sankalp-Bhoomi-to-become-Ambedkar-Smarak/articleshow/47940804.cms. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/city/vadodara/30-dalits-embrace-buddhism-at-sankalp-bhoomi-in-city/articleshow/60896570.cms. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ https://www.newsstate.com (हिंदी भाषेत) https://www.newsstate.com/gujarat/more-than-300-dalits-convert-to-buddhism-in-ahmedabad-and-vadodara-of-gujarat-article-39000.html. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  7. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/india/like-other-great-men-pm-modi-took-pledge-from-gujarat-says-cm-vijay-rupani-bjp-4858258/. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/city/vadodara/Historic-Sanklap-Bhoomi-tree-gives-away/articleshow/6184529.cms. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ The Times of India https://timesofindia.indiatimes.com/city/vadodara/international-buddhist-meet-in-vadodara/articleshow/66705505.cms. 2019-04-23 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)