"संकल्प भूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Sankalp Bhoomi, life-size statue of Dr. B.R. Ambedkar sitting under the Banyan Tree, at the Dr. Ambedkar National Memorial, in Delhi.jpg|thumb|दिल्लीतील [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]ातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.]]
[[File:Sankalp Bhoomi, life-size statue of Dr. B.R. Ambedkar sitting under the Banyan Tree, at the Dr. Ambedkar National Memorial, in Delhi.jpg|thumb|दिल्लीतील [[डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक]]ातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.]]
'''संकल्प भूमी''' हे [[गुजरात]] राज्यातील [[वडोदरा]] (बडोदा) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण [[अस्पृश्य]] समाजाला या जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता.<ref>http://www.dalitdastak.com/mayawati-will-go-vadodara-sankalp-bhumi/</ref><ref>http://jansangharsh.in/ambedkar-sankalp-bhumi-vadodara/amp/</ref>
'''संकल्प भूमी''' हे [[गुजरात]] राज्यातील [[वडोदरा]] (बडोदा) येथील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेतील या ठिकाणी आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण [[अस्पृश्य]] समाजाला या जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता.<ref>http://www.dalitdastak.com/mayawati-will-go-vadodara-sankalp-bhumi/</ref><ref>http://jansangharsh.in/ambedkar-sankalp-bhumi-vadodara/amp/</ref> १४ एप्रिल २००६ रोजी आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेचे "संकल्प भूमी" असे नामकरण करण्यात आले.


==इतिहास==
==इतिहास==

१७:१२, २२ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

दिल्लीतील डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील संकल्प भूमीचे दृष्य, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वडाच्या झाडाखाली बसलेले आहेत, आणि संकल्प करित आहेत.

संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेतील या ठिकाणी आपल्या दबलेल्या-पिचलेल्या संपूर्ण अस्पृश्य समाजाला या जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याच्या संकल्प केला होता.[१][२] १४ एप्रिल २००६ रोजी आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेचे "संकल्प भूमी" असे नामकरण करण्यात आले.

इतिहास

सयाजी महाराजांच्या वडोदरा संस्थानाकडूनं मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे इ.स. १९१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले होते. या दोघांमधील करार असा होता की, आंबेडकरांना शिष्यवृत्तीच्या बदल्यात वडोदरा संस्थानामध्ये काही काळ काम करावे लागणार. या कराराअंतर्गत, २३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकर आपल्या थोरल्या भावासह बडोदा येथे पोहोचले. तथापि, त्यांना रेल्वे स्थानकावरून आणण्याचा आदेश सयाजीरावांनी दिला होता, परंतु एका अस्पृश्याला आणण्यासाठी कुणीही तयार झाले नाही, त्यामुळे आंबेडकरांना स्वतःच व्यवस्था करून पोहोचावे लागले. त्यांना आपल्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागणार होती, त्यासाठी ते जागा शोधत होते, परंतु त्यांच्या वडोदऱ्यात पोहोचण्यापूर्वीच बॉम्बेवरून एक महार युवक वडोदरा संस्थानात नौकरीसाठी येत असल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे त्यांच्या "अस्पृश्य" जातीची माहिती झाल्यामुळे कोणीही हिंदू आणि अहिंदू लोक त्यांना जेवण व राहण्यासाठी जागा देण्यासाठी तयार झाले नाही. शेवटी, त्यांना नाव बदलून व अधिकचे भाडे देऊन एका पारसी धर्मशाळेत राहण्यासाठी जागा मिळाली.

सयाजीराव गायकवाड यांना आंबेडकरांना अर्थमंत्री बनवण्याची इच्छा होती पण अनुभव नसल्यामुळे आंबेडकरांनी सैनाच्या सचिव पदाचा स्वीकार केला.

सचिवालयात आंबेडकरांना अस्पृश्य असल्यामुळे खूप अपमानीत व्हावे लागले, त्यांनी तेथील पाणी सुद्धा पिण्यासाठी मिळत नव्हते. कर्मचारी-चपराशी हे दुरुनच आंबेडकरांकडे फाईल्स फेकत असत, त्यांच्या येण्याच्या व जाण्याच्या पूर्वी फर्शीवर पडलेल्या चटया हटवल्या जात होत्या, असल्या अमानवीय व्यवहारांच्या नंतरही ते आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अग्रेसर असत, परंतु त्यांना तेव्हाच अभ्यासासाठी ग्रंथालयात जाण्याची परवानगी मिळे जेव्हा तेथे रिकाम्या वेळेत दुसरा किंवा अन्य कोणी हजर नसेल. यासारख्या अनेक गैरव्यवहार त्यांना सहन करावा लागला, कारण तेथे जातियता अधिकच तीव्र होती.

यानंतर परत एक घटना घडली, पारसी आणि हिंदूंना कळले की पारसींच्या धर्मशाळेमध्ये रहाणारा व्यक्ती अस्पृश्य (दलित) आहे. तसे लोक पारसींच्या हॉटेलच्या बाहेर जमले आणि हॉटेलमधून आंबेडकरांना बाहेर काढण्यासाठीची मागणी करू लागले. अखेरीस आंबेडकरांना अपमानीत होऊन रात्रीच्या वेळीच ते हॉटेल सोडून जावे लागले. त्यांना रात्री राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यांना त्याच ठिकाणी जवळच्या एका पार्कमध्ये रात्री काढावी लागली, पण आज ही रात्र डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील एक सर्वात महत्त्वाची रात्र होती. त्यांनी असा विचार केला की जेव्हा माझ्यासारख्या परदेशातून शिकून आलेल्या विद्वान व्यक्तीसोबत हिंदू अशा प्रकारे वागतात, तर जे माझ्या (अस्पृश्य) समाजातील अशिक्षित आणि गरीब लोक आहेत, त्यांच्याशी कसे वागले जात असेल?

मग त्यांनी असा संकल्प केलै की ते संपूर्ण आयुष्य या वंचित आणि उपेक्षित समाजाच्या लोकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी व्यतीत करेल. त्यांना मानवी हक्क मिळवून देईल. वडोदराच्या ज्या सियाजी पार्कमध्ये बाबासाहेबांनी हा संकल्प केला होता, त्याला "संकल्प भूमी" म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे देशभरातून लक्षावधी आंबेडकरवादी एकत्र येत असतात.

संरचना

संदर्भ