"रा.सु. गवई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२७: ओळ १२७:


==कारकीर्द==
==कारकीर्द==
गवई महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते ९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी [[इ.स. १९६८]] ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि [[इ.स. १९७८]] ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. इ.स. १९९८ गवई हे मध्ये १२व्या लोकसभा निवडणुकीत [[अमरावती लोकसभा मतदारसंघ|अमरावती लोकसभा मतदारसंघातून]] विजयी झाले, १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) राहिले.<ref>https://www.bbc.com/marathi/india-47689500</ref> पुढे एप्रिल २००० मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते.
गवई हे महाराष्ट्र [[विधान परिषद|विधान परिषदेचे]] इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी [[इ.स. १९६८]] ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि [[इ.स. १९७८]] ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. इ.स. १९९८ गवई हे मध्ये १२व्या [[लोकसभा]] निवडणुकीत [[अमरावती लोकसभा मतदारसंघ|अमरावती लोकसभा मतदारसंघातून]] विजयी झाले, १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) राहिले.<ref>https://www.bbc.com/marathi/india-47689500</ref> त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते [[राज्यसभा|राज्यसभेचे]] सभासद (खासदार) होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते.


महाराष्ट्र राज्यात [[रोजगार हमी योजना]] सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष [[वि.स. पागे]] यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-bihar-former-governer-r-s-gawai-passed-way-5063833-NOR.html</ref>
महाराष्ट्र राज्यात [[रोजगार हमी योजना]] सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री [[वसंतराव नाईक]] आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष [[वि.स. पागे]] यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-bihar-former-governer-r-s-gawai-passed-way-5063833-NOR.html</ref>

१८:१९, २ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

दादासाहेब रामकृष्ण सूर्यभान गवई

कार्यकाळ
११ जुलै २००८ – ७ सप्टेंबर २०११

कार्यकाळ
१३ जुलै २००६ – १२ ऑगस्ट २००६

कार्यकाळ
२२ जून २००६ – ९ जुलै २००८

कार्यकाळ
३ एप्रिल २००० – २ एप्रिल २००६

कार्यकाळ
१० मार्च इ.स. १९९८ – २६ एप्रिल इ.स. १९९९
राष्ट्रपती के.आर. नारायणन
पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल

अटल बिहारी वाजपेयी

मागील अनंतराव महादेवअप्पा गुडे
पुढील अनंतराव महादेवअप्पा गुडे
मतदारसंघ अमरावती

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
१२ डिसेंबर १९८६ – २० डिसेंबर १९८८
मागील देविदास कराळे
पुढील विठ्ठलराव हांडे
कार्यकाळ
२० डिसेंबर १९९० – १७ जुलै १९९१
मागील विठ्ठलराव हांडे
पुढील प्रमोद नवलकर

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती
कार्यकाळ
इ.स. १९७८ – इ.स. १९८२

महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती
कार्यकाळ
इ.स. १९६८ – इ.स. १९७८

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
कार्यकाळ
इ.स. १९६४ – इ.स. १९९४

जन्म ३० ऑक्टोबर, १९२९
दारापूर (अमरावती जिल्हा), महाराष्ट्र, भारत
मृत्यू २५ जुलै, २०१५ (वय ८५)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष
भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)
आई सरूबाई गवई
वडील सूर्यभान गवई
पत्नी कमला गवई
अपत्ये २ मुलगे: भूषण गवई
राजेंद्र गवई
१ मुलगी: कीर्ती
शिक्षण नागपूर विद्यापीठ
व्यवसाय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते
धर्म बौद्ध

रामकृष्ण सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब गवई (३० ऑक्टोबर १९२९२५ जुलै, २०१५) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते होते. ते बिहार, सिक्किमकेरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभाराज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता म्हणून कार्य केले होते. गवई यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते.[१]

कारकीर्द

गवई हे महाराष्ट्र विधान परिषदेचे इ.स. १९६४ ते १९९४ अशी सलग ३० वर्षे सभासद (आमदार) होते. या कालावधी दरम्यान त्यांनी इ.स. १९६८ ते १९७८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि इ.स. १९७८ ते १९८२ मध्ये विधान परिषदेचे सभापती म्हणून कार्य केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८ आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१ या काळात दोनदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आले. इ.स. १९९८ गवई हे मध्ये १२व्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले, १९९९ पर्यंत ते लोकसभेचे सदस्य (खासदार) राहिले.[२] त्यानंतर ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६ दरम्यान ते राज्यसभेचे सभासद (खासदार) होते. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसियेशनचे ते अध्यक्ष होते.

महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजना सुरू व्हावी, यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष वि.स. पागे यांच्या सहकार्याने पायाभूत काम केले. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सेंट्रल जनरल कौन्सिल ऑफ जागतिक बौद्ध फेलोशिपच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अमरावतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष होते.[३]

राज्यसभेत त्यांनी अरुण शौरी लिखित 'वरशिपिंग फॉल्स गॉड' या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप ठेवून या पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली.

वैयक्तिक माहिती

अमरावती जिल्ह्यातील दारापूर येथे ३० आॅक्टोबर १९२९ रोजी गवईंचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरूबाई तर वडिलांचे नाव सूर्यभान गवई होते. इ.स. १९५४ मध्ये नागपूर विद्यापीठतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. २९ नोव्हेंबर १९५९ रोजी त्यांचा विवाह कमला गवई यांच्याशी झाला. त्यांना अपत्ये दोन मुले भूषण व राजेंद्र आणि एक मुलगी आहे. गवई हे एक आंबेडकरवादीबौद्ध धर्मीय होते.[४][५]

भारतीय रिपब्लिकन पक्ष

दादासाहेब गायकवाड व गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. गायकवाड यांनी १९६७ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी युती केली. यावेळी पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसने १९६८ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर उपसभापती म्हणून निवडून रा.सु. गवई यांना आणि बॅ. खोब्रागडे यांना राज्यसभेवर उपसभापती म्हणून पाठविले. इ.स. १९६८ मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली. केंद्रीय कार्यकारिणीतील निवड व विधान परिषदेवर मिळालेले उपसभापतीपद या दोन्ही पदांमुळे गवई यांची महत्त्वाकांक्षा वाढली. याच काळात दादासाहेब गायकवाड यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे रिपब्लिकन पक्षनेता निवडीचा प्रश्न निर्माण झाला. गवईंना बॅ. खोब्रागडे अडसर वाटत होते. तो दुर करण्यासाठी गवईंनी शांताबाई दाणी यांच्या मार्फत आपले वजन वाढविले. त्यामुळे, दादासाहेब गायकवाड यांना गवई जवळचे वाटू लागले. ऑक्टोबर १९७० ला नागपूर येथे दादासाहेब गायकवाड प्रणित गटाचे अधिवेशन भरविले. दुसरीकडे याचवेळी बॅ. खोब्रागडे यांनी देखील अधिवेशन भरविले व दोन गट भारतीय रिपब्लिकन पक्षात उदयास आले. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला 'गवई गट' असे म्हटले जाऊ लागले.[६] यानंतर शांताबाई दाणी व गवई यांच्यात वाद झाला. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनरुज्जीवित केले. अशाप्रकारे १९५९ ते १९७९ या वीस वर्षांच्या काळात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले. प्रत्येक गट स्वत:ला अखिल भारतीय स्तरावरील भारतीय रिपब्लिकन पक्ष असल्याचा खोटा दावा करू लागला. कुणी काँग्रेससोबत सख्य साधून; तर कुणी जनसंघाशी सख्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर बौद्ध-दलितांच्या मतांचा राजकीय लाभ मिळविण्याचे प्रयत्न नेते करू लागले. त्यामुळे १९५७ च्या यशासारखे घवघवीत यश या पक्षाला मिळाले नाही. फाटाफुटीच्या या काळात रिपब्लिकन पक्ष ऐक्याविषयी जे प्रयत्न झाले, ते निरुपयोगी ठरले व पक्षाची वाताहत झाली. रिपब्लिकन पक्षाच्या या वाताहतीचा परिणाम म्हणून पुढे दलित पँथरचा उदय झाला.

इ.स. १९९८ मध्ये, १२व्या लोकसभेवर महाराष्ट्रातून भारतीय रिपब्लिकन पक्षाचे चार उमेदवार हे खासदार म्हणून निवडून गेले होते, त्यांत एक गवईही होते, अन्य तीघे प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडेरामदास आठवले हे होते.

शैक्षणिक कार्य

बिहारचे राज्यपाल असताना, रा.सु. गवई यांनी शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्यासाठी नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले होते..

धार्मिक काम

बिहारचे राज्यपाल असताना रा.सु. गवई यांनी तेथील जैनबौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्रातून तीर्थ यात्रेसाठी गेलेल्या राजेंद्र दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सु. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.

निधन

गवईंचा निधन वयाच्या ८६व्या वर्षी २५ जुलै २०१५ रोजी नागपूरातील कृष्‍णा रूग्णालयात झाला, या दवाखान्यात ते महिनाभर उपचार घेत होते. त्यांच्या मूळ गावी दारापुर येथे त्यांचा अंतिम संस्कार केला गेला.[७][८]

भूषविलेली पदे

गवईंनी भूषविलेली काही प्रमुख पदे खालीलप्रमाणे आहेत:

  • १९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले.
  • १९७२ मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष झाले.
  • १९७२ मध्ये नागपूर येथील दीक्षाभूमीच्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती"चे अध्यक्ष झाले.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य (आमदार) [सलग पाच वेळा, १९६४ ते १९९४] : १९६४ ते ७०, १९७० ते ७६, १९७६ ते ८२, १९८२ ते ८८ आणि १९८८ ते ९४
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती : इ.स. १९६८ ते ७८.
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती : इ.स. १९७८ ते ८२
  • कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचे सदस्य
  • महाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष
  • महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता (दोनदा): १२ डिसेंबर १९८६ ते २० डिसेंबर १९८८; आणि २० डिसेंबर १९९० ते १७ जुलै १९९१[९]
  • १२व्या लोकसभेचे सदस्य (खासदार) : १९९८ ते ९९
  • राज्यसभा सदस्य (खासदार) : ३ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००६
  • बिहारचे राज्यपाल : २२ जून २००६ ते ९ जुलै २००८
  • सिक्किमचे राज्यपाल : १३ जुलै २००६ ते १२ ऑगस्ट २००६
  • केरळचे राज्यपाल : १० जुलै २००८ ते २५ आॅगस्ट २०११

लिहिलेली पुस्तके

  • आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व (गौरव प्रकाशन)

मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • कुष्ठरोग्यांकरिता केलेल्या मदतीबद्दल मिळालेले ‘कुष्ठमित्र अ‍ॅवॉर्ड’ आणि ‘कुष्ठरोग्यांचा मित्र अ‍ॅवॉर्ड’
  • प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे ‘प्रियदर्शिनी अ‍ॅवॉर्ड (१९९०-९१)
  • नॅशनल प्रेस इंडिया नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘नॅशनल प्रेस अ‍ॅवॉर्ड (१९९४)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ‘ईश्वरी देवी अ‍ॅवॉर्ड (हैदराबाद, १९९९)
  • मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार

संदर्भ

  1. ^ https://lokmat.news18.com/news/article-178063.html
  2. ^ https://www.bbc.com/marathi/india-47689500
  3. ^ https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-bihar-former-governer-r-s-gawai-passed-way-5063833-NOR.html
  4. ^ The Indian Express (इंग्रजी भाषेत) https://indianexpress.com/article/india/india-others/former-kerala-bihar-governor-r-s-gavai-passes-away/. 2019-04-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Sikka, Sonia; Puri, Bindu; Beaman, Lori G. (2015-08-11). Living with Religious Diversity (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317370987.
  6. ^ क्षीरसागर, आर. के. (१९७९). औरंगाबाद: नाथ प्रकाशन. pp. १०१ ते १०३. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Loksatta https://www.loksatta.com/maharashtra-news/senior-dalit-leader-r-s-gavai-passed-away-1126285/. 2019-04-02 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ https://www.nagpurtoday.in/amravati-former-governor-rasu-gawai-passes-away/07252000
  9. ^ महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत