"द्वारकानाथ संझगिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: द्वारकानाथ संझगिरी (जन्म : १५ नोव्हेंबर) हे प्रामुख्याने क्रिकेट...
(काही फरक नाही)

११:१७, २८ मार्च २०१९ ची आवृत्ती

द्वारकानाथ संझगिरी (जन्म : १५ नोव्हेंबर) हे प्रामुख्याने क्रिकेटवर लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. मुंबईतून किंग जाॅर्ज हायस्कूल, रुईया काॅलेज मधून शिकल्यावर, त्यांनी माटुंग्याच्याच व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नाॅलाॅजिकल इन्स्टिट्यूटमधून इंजिनिअरिंग केले. मुंबई महापालिकेतून ते मुख्य अभियंता म्हणून ते निवृत्त झाले. क्रिकेट आणि अन्य खेळ, चित्रपट, प्रवास, पर्यटन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर द्वारकानाथ यांचे लेख मराठी-इंग्रजी वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून १९८० सालापासून प्रकाशित होत आहेत.

द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके

  • अफलातून अवलिये (व्यक्तिचित्रणे)
  • आठवणींचा रिव्हर्स स्वीप (आठवणी)
  • क्रिकेट काॅकटेल (क्रिकेटविषयक)
  • क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स (क्रिकेटविषयक)
  • खुल्लमखिल्ली
  • चॅम्पियन्स (क्रीडाविषयक)
  • चित्तवेधक विश्वचषक २००३ (क्रिकेटविषयक)
  • चिरंजीव सचिन (व्यक्तिचित्रण)
  • तानापिहिनिपाजा (आत्मकथन)
  • तिरकटधा (चित्रपटविषयक)
  • दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी (मुलाखती)
  • पॉवर प्ले (क्रीडाविषयक)
  • पूर्व अपूर्व (प्रवासवर्णन)
  • फाळणीच्या देशांत (प्रवासवर्णन)
  • फिरता-फिरता (प्रवासवर्णन)
  • माझी बाहेरख्याली (प्रवासवर्णन)
  • माझी बाहेरख्याली
  • वल्ली आणि वल्ली (व्यक्तिचित्रणे)
  • स.न.वि.वि. - पत्रास कारण की...(काल्पनिक विनोदी पत्रे)
  • संवाद लिजंड्सशी (व्यक्तिचित्रणे)
  • स्टंप व्हिजन (क्रिकॆटपटूंची चरित्रे)

द्वारकानाथ संझगिरी यांना मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र सरकारचा साहित्यिक पुरस्कार
  • विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार
  • क्रीडाविषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार
  • वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार