"प्रकाश आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७: ओळ ५७:
==वैयक्तिक जीवन==
==वैयक्तिक जीवन==
===कुटुंब===
===कुटुंब===
प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडीलांचे नाव [[यशवंत आंबेडकर]] (भैयासाहेब) व आईचे नाव मीरा आंबेडकर आहे. [[आंबेडकर कुटुंब]] हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहिण आहे – भीमराव आंबेडकर, [[आनंदराज आंबेडकर]] व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या [[आनंद तेलतुंबडे]] यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह [[चित्पावन ब्राह्मण]] कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला. दामत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.

===संपत्ती===
===संपत्ती===
मार्च २०१९ मध्ये, [[लोकसभा]] उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.<ref>http://m.lokmat.com/solapur/name-prakash-ambedkar-wealth-worth-41-lakh-81-thousand-rupees/</ref>
मार्च २०१९ मध्ये, [[लोकसभा]] उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.<ref>http://m.lokmat.com/solapur/name-prakash-ambedkar-wealth-worth-41-lakh-81-thousand-rupees/</ref>

०२:०५, २७ मार्च २०१९ ची आवृत्ती

प्रकाश आंबेडकर
जन्म १० मे १९५४
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान राजगृह, मुंबई
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे बाळासाहेब आंबेडकर
शिक्षण बी.ए, एल्‌एल.बी
पेशा राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ता
निव्वळ मालमत्ता ४१.८१ लाख रुपये
राजकीय पक्ष भारिप बहुजन महासंघ
वंचित बहुजन आघाडी
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार अंजली आंबेडकर
अपत्ये सुजात आंबेडकर
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ.बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
आनंद तेलतुंबडे (मेहुणा)
हे सुद्धा पहा: आंबेडकर कुटुंब


प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व वकील आहेत. आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत. २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली, या आघाडीत सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांचा समावेश असून २०१९ ची १७वी लोकसभा निवडणुका या आघाडीमार्फत लढवण्यात येणार आहे.

वैयक्तिक जीवन

कुटुंब

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडीलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीरा आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहिण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला. दामत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.

संपत्ती

मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी आहे. तसेच आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[१]

शिक्षण

प्रकाश आंबेडकर हे मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा इ.स. १९७२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई मधून इ.स. १९७८ मध्ये त्यांनी बी.ए. शिक्षण पूर्ण केले. पुढे सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधूनच इ.स. १९८१ साली त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[२]

कारकीर्द

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

चरित्र

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

हे सुद्धा पहा

संदर्भ