"पी. लक्ष्मी नरसु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४: ओळ २४:
| प्रभावित =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| वडील_नाव = पोकल चेल्लम नयनायागारु
| आई_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| पत्नी_नाव = रुक्मिणी अमल<br /> रमारत्नम अमल
| अपत्ये =
| अपत्ये = वेंकट (मुलगा)<br /> विरलक्ष्मी (मुलगी)
| स्वाक्षरी_चित्र =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| संकेतस्थळ_दुवा =

१३:१६, २ मार्च २०१९ ची आवृत्ती

पी. लक्ष्मी नरसु
पी. लक्ष्मी नरसु
जन्म नाव पोकला लक्ष्मी नरसु
जन्म १८६१
मृत्यू १४ जुलै १९३४
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र साहित्य, धर्म, विज्ञान
संघटना साऊथ इंडियन बुद्धीस्ट असोसिएशन
प्रसिद्ध साहित्यकृती द इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०७)
वडील पोकल चेल्लम नयनायागारु
पत्नी रुक्मिणी अमल
रमारत्नम अमल
अपत्ये वेंकट (मुलगा)
विरलक्ष्मी (मुलगी)

पी. लक्ष्मी नरसु (१८६१ - १४ जुलै १९३४) हे एक भारतीय लेखक, प्राध्यापक व बौद्ध अभ्यासक होते. ते भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते आणि त्यांचे या विषयातील शोधनिबंध जगभरातल्या विज्ञान पत्रिकेतून प्रकाशित झालेले आहेत. भौतिकशास्त्रावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्या विषयातील वादविवादात त्यांनी अनेक युरोपियन आणि ब्रिटिश विद्वानांवर त्यांनी मात केली होती.

धार्मिक कार्य

टी. सिंगारीवेलू, आयोथी थासर आणि नरसु यांनी मद्रास प्रांतात "साऊथ इंडियन बुद्धीस्ट असोसिएशन" (शाक्य बुद्धिस्ट सोसायटी) या बौद्ध संस्थेची स्थापना केली, ही संस्था अनागरिक धर्मपाल यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत कार्य करणारी एक बौद्ध संस्था होती. १८९० साली स्थापन झालेल्या या महाबोधी सोसायटीचे (मद्रास शाखा) एम. सिंगरलवेलू, आयोथी थासार आणि पी लक्ष्मी नरसु हे तिघेही सदस्य होते. नरसुंनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. इ.स. १९०७ साली त्यांनी लिहिलेला "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हा ग्रंथ शाक्य बुद्धिस्ट सोसायटीचा प्रमाणग्रंथ होता. या ग्रंथाला जपानमध्ये खूप मागणी होती. त्यांनी लिहिलेला "व्हॉट इज बुद्धिझम" हा ग्रंथ चेकोस्लोव्हाकिया देशाचे विदेशमंत्री जीन मॅसारीक यांनी स्वत: अनुवादित करून त्या देशाचा मार्गदर्शक ग्रंथ मानला. त्यांनी "बुद्धिझम इन अ नटशेल", "अ स्टडी ऑफ कास्ट" हे सुद्धा ग्रंथ लिहिलेत. विज्ञानवादावर आधारित बौद्ध धर्माची मांडणी करणारे त्यांचे लेख "द रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धीस्ट" या अलोसियस यांनी संपादित केलेल्या ग्रंथात प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी साऊथ बुद्धिष्ट असोसिएशनच्या माध्यमातून सन १९१० मध्ये मद्रासमधील बौद्धांची जनगणना करून घेतली जी १८,००० इतकी निघाली. नरसुंनी चार बौद्ध परिषदांचे आयोजन मद्रास प्रांतात केले होते. त्यापैकी पहिली बौद्ध धर्म परिषद १९१७ मध्ये मूर पॅव्हीलीयन पीपल्स पार्क, मद्रास येथे; दुसरी १९२० मध्ये बेंगलोर येथे, तिसरी १९२८ मध्ये मद्रास येथे तर शेवटची चौथी परिषद १९३२ मध्ये बेंगलोर प्रेसिडेंसी, तिरुपतूर कोलार गोल्ड फिल्ड येथे आयोजित केल्या गेल्या होत्या.[१] त्यांनी श्रीलंकेत जाऊन जाहीरपणे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराकरता व्यतित केले. त्यांना आधुनिक काळातील "इग्गेज्ड बुद्धिझम"चे प्रवर्तक मानले जात होते. त्यांचे इंग्रजी, फ्रेंच, तामिळ, तेलगू, जपानी, संस्कृत आणि पाली या भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक प्रगतिशील संस्था आणि संघटनेत एक सक्रिय आणि सन्माननीय सभासद म्हणून कार्य केले. १९४८ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नरसुंच्या "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करून त्याला प्रस्तावना लिहिली, प्रस्तावनेत त्यांनी 'प्राध्यापक पी.एल. नरसु हे एकोणिसाव्या शतकातील भारतातील अत्यंत प्रतिभावान व्यक्ती होते' असे म्हटले होते. बौद्ध धम्माच्या वाचकांसाठी उपलब्ध असलेले "द इसेन्स ऑफ बुद्धिझम" हे एक अत्यंत मौलिक पुस्तक आहे असा अभिप्रायसुद्धा त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला. आंबेडकरांनी म्हटले की, "प्राध्यापक नरसु--जे लढले युरोपियन उद्धटपणाविरुद्ध देशभक्तीपूर्ण उत्साहाने, सनातनी (रुढीप्रिय) हिंदुत्त्वाविरुद्ध मूर्तीभंजक आवेशाने, पाखंडी ब्राम्हणांसोबत राष्ट्रीय दृष्टीने आणि आक्रमक ख्रिस्ती धर्माविरुद्ध बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीकोनाने. हे सर्व कार्य त्यांनी महान तथागत सम्यक संबुद्धांच्या शिकवणूकीच्या प्रेरणादायी ध्वजाखाली (मार्गदर्शनाखाली) केले".[२]

लेखन

नरसु यांनी अनेक ग्रंथ इंग्रजीत लिहिलेले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे हिंदीत अनुवादही झाले आहेत.

  • इसेन्स ऑफ बुद्धिझम (१९०७)
    • द्वितीयावृत्ती १९११; तृतीयावृत्ती १९४८ मध्ये आंबेडकरांनी काढली तसेच हिंदी अनुवाद भदंत आनंद कौसल्यायन यांनी केला आहे.
  • व्हॉट इस बुद्धिझम (१९१६)
  • अ स्टडी ऑफ कास्ट (१९२२)
  • रिलीजन ऑफ मॉडर्न बुद्धिस्ट (2002; सम्यक प्रकाशन, नवी दिल्ली)
  • बुद्धिझम इन अ नटशेल

वयक्तिक जीवन

नरसु यांचा जन्म १८६१ मध्ये एका संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मद्रास उच्चन्यायालयात एक नामांकित वकील होते. नरसुंचे काही भाऊ आणि मुले तरुण वयातच मरण पावले. तसेच त्यांच्या पत्नीचेही लवकर निधन झाले होते.

विचार

जाती विषयक विचार

स्त्रियांविषयी विचार

विज्ञान विषयक विचार

संदर्भ

  1. ^ Narasu, P. L. What is Buddhism (English भाषेत). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. 8, 9. ISBN 81-88794-42-2.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ Narasu, P. L. What is Buddhism (English भाषेत). Delhi: Samyak Prakashan, New Delhi. pp. 3, 4. ISBN 81-88794-42-2.CS1 maint: unrecognized language (link)