"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०: ओळ १०:


[[वर्ग:लेह]]
[[वर्ग:लेह]]
[[वर्ग:लडाख]]
[[वर्ग:जम्मू आणि काश्मीर]]
[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:पुतळे]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील निर्मिती]]
[[वर्ग:लेह जिल्हा]]

२३:३३, ६ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा जम्मू काश्मिरच्या लडाख प्रदेशातील लेह येथील पुतळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा भारतातील सर्वाधिक उंच स्थानी असलेला पुतळा समजला जातो. या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २४ जुलै २०१६ रोजी करण्यात आलं. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा असून नागपुरातून हा पुतळा लेहला नेण्यात आला होता. देशी-विदेशी लोकांना डॉ. आंबेडकरांच्या कार्यांची आणि विचारांची माहिती व प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसवण्यात आला आहे.[१]

इतिहास

प्राचीन काळापासून बौद्धकालीन परिसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेह-लडाखमध्ये पहिल्यांदाच २०१६ च्या २३ ते २५ जुलैदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न झाली. त्यावेळी तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंटर स्थापित केले गेले असून, त्याचा कोनशिला समारंभ झाला आहे. यानिमित्ताने डॉ. बाबासाहेबांचा पुतळा लडाखमध्ये उभारला गेला आहे. हा पुतळा नागपुरात तयार करण्यात आला आहे. सनदी अधिकारी असलेले हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोंचाना व्हनिच यांनी हा पुतळा उभारणीसाठी आर्थिक सहकार्य दिले होते. पुतळा अनावरण प्रसंगी लडाखचे भंते संघसेना यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे "आधुनिक भारताचे निर्माते" असल्याचे मत मांडले. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी लडाखमध्ये परिषद आयोजित गेली दिली. हा पुतळा साडेसात फूट उंचीचा आहे. पुतळ्याचे प्रतिकात्मक दान भंते संघसेना यांना करण्यात आले. लडाखमध्ये भारतीय आणि विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना बाबासाहेबांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा मिळावी, हा उद्देश पुतळा उभारमागे होता.[२]

महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे आंबेडकरांचा हा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण रविवारी २४ जुलै २०१६ रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची उपस्थिती होती. या पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा असून त्याच्या अनावरणासोबतच येथे स्थापण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्कचा शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला.[३]

संदर्भ