"आनंद तेलतुंबडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५: ओळ २५:
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंब]]
[[वर्ग:भारतीय लेखक]]
[[वर्ग:भारतीय लेखक]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:भारतीय शिक्षणतज्ञ]]

२३:३३, २ फेब्रुवारी २०१९ ची आवृत्ती

आनंद तेलतुंबडे हे एक मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक, राजकीय विश्लेषक आणि दलित-आंबेडकरवादी चळवळीतील विचारवंत आहेत.

शिक्षण व कारकीर्द

तेलतुंबडेंचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यानंतर काही काळ नोकरी केली व त्यानंतर आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केले. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी कार्य केले आहे. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे. त्यांनी आयआयटी खरगपूरलाही अध्यापन केले असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ते जाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (टीपीडीआर)चे ते सरचिटणीस आहेत. तसेच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.[१]

लेखन

तेलतुंबडे यांनी २६ पुस्तके लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन सुद्धा केले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.

वैयक्तीक जीवन

तेलतुंबडे यांचा विवाह रमाबाई आंबेडकर यांच्याशी झालेला असून त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात आहेत. प्रकाश आंबेडकरआनंदराज आंबेडकर हे तेलतुंबडेंचे मेहुणे आहेत.

नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय

पुणे येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी दलित-बौद्धांविरूद्ध हिंसाचार झाला होता. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना अटक करून कारवाई केली होती. मात्र पुणे सत्र न्यायालयाने या कारवाईला स्थगित करण्याचा आदेश दिला आहे.[२][३]

संदर्भ