"गुणरत्न सदावर्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने अॅडव्होकेट आहेत. महाराष्ट्रामध...
(काही फरक नाही)

२०:२०, ११ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती

गुणरत्न सदावर्ते हे व्यवसायाने अॅडव्होकेट आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना अारक्षण देऊ नये यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत. ही याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली आहे. त्यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. २०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.

सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.

काही वर्षांपूर्वी सदावर्ते नांदेडहून मुंबईला स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागले. वकिलीअगोदर ते शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टरही झाले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते..

कौटुंबिक माहिती

सदावर्ते यांचे वडील भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाकडून नांदेड महापालिकेवर निवडून गेले होते.

परळच्या 'क्रिस्टल प्लाझा' या इमारतीला आग लागली तेव्हा सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने प्रसंगावधान दाखवत घरातल्या सगळ्यांना वेळीच सावध केले होते, त्यामुळे काहींचे प्राण वाचले होते.

गुणरत्न सदावर्ते यांनी हाताळलेल्या केसेस

  • अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणाऱ्या आबाळाची केस
  • ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस
  • डॉक्टरांना काम बंद आंदोलन करू न देण्याची केस
  • प्रशिक्षणानंतरही १५४ पोलिसांना फौजदारपदी नियुक्त न करण्याची केस
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची हायकोर्टातली एक केस
  • 'मॅट'च्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस
  • सुप्रीम कोर्टात ५० लाख कर्मचाऱ्यांची केस
  • हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, वगैरे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या केसची सुनावणीनंतर माध्यमांशी बोलत असताना जालन्याच्या वैजनाथ पाटील नावाच्या एका व्यक्तीने 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत सदावर्तेंवर हल्ला केला. हल्ला होताच सदावर्तेंच्या सहकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांना सुरक्षितरीत्या बाजूला घेतले.