"डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे''' (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speech...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:२२, २९ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches) महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाद्वारे निर्मीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंग्रजी लेखन साहित्याचे २२ खंड आहेत. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे महत्त्व व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या संपूर्ण साहित्याला अनेक खंडात प्रकाशित करण्याची योजना बनवली आणि याच्या अंतर्गत आतापर्यंत "डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेस" (डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे) या नावाने २२ खंड प्रकाशित केले गेलेले आहेत. इंग्रजी भाषेत प्रकाशित हे वाल्युम (खंड) महत्त्वाचे असून यांची किंमतही कमी ठेवण्यात आली आहे. या वृहत योजनेच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल, इ.स. १९७९ रोजी झाले.

महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेसच्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान'ने या खंडांचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून हिंदी भाषक जनता सुद्धा बाबासाहेबांच्या साहित्यापर्यंत पोहचू शकेल. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत "बाबासाहेब डॉ. आंबेडकर: संपूर्ण वाङ्मय" नावाने २१ खंड हिंदी भाषेत प्रकाशित करण्यात आले आहेत.[१] हे हिंदी खंड सुद्धा लोकप्रिय ठरले असून आतापर्यंत याच्या अनेक आवृत्या प्रकाशित केल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस याची मागणी वाढतच जात आहे. हिंदी क्षेत्रात या संपूण वाङ्मयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

  1. ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकर: संपूर्ण वाड्मय, २१ खंड पीएफ में