"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ १०: ओळ १०:
म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.
म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.
== हे सुद्धा पहा==
== हे सुद्धा पहा==
* [[दीक्षाभूमी]]
* [[चैत्यभूमी]]

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{बाबासाहेब आंबेडकर}}


[[वर्ग:मध्य प्रदेशचा इतिहास]]
[[वर्ग:मध्य प्रदेशचा इतिहास]]
ओळ १८: ओळ २३:
[[वर्ग:दलित संस्कृती]]
[[वर्ग:दलित संस्कृती]]
[[वर्ग:मध्य प्रदेशातील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:मध्य प्रदेशातील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:भारतातील पर्यटनस्थळे]]

१२:३७, २३ मे २०१८ ची आवृत्ती

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेशातील महू (डॉ. आंबेडकर नगर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. येथे मध्य प्रदेश शासनाने भव्य स्मारक उभे केले आहे. या स्मारकाचे उद्घाटन १४ एप्रिल १९९१ रोजी १००व्या आंबेडकर जयंतीदिनी मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ईडी निमगडे यांनी तयार केली. पुढे याचे १४ एप्रिल २००८ रोजी ११७ व्या भीमजयंती दिनी लोकार्पण केले गेले.

येथे लाखो भीमानुयायी व पर्यटक दरवर्षी भेट देऊन बाबासाहेबांच्या जन्स्थळाला वंदन करीत असतात. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथून दोन ते तीन तासांच्या अंतरावर व इंदौर येथून २० किलोमीटरच्या अंतरावर महू आहे. २०१६ मध्ये १२५व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व २०१८ मध्ये १२७व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महू ला भेटी देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

इतिहास

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी पुण्यातील पंतोजी शाळेमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करामध्ये शिक्षक म्हणून नोकरीस सुरुवात केली व नंतर शाळेत ते प्रधान शिक्षक झाले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली. १४ वर्षे मुख्याध्यापकाचे काम सांभाळल्याने त्यांना सैन्यात मेजर (सुभेदार) म्हणून बढती मिळाली. नंतर ते महू इथे नोकरी निमित्त वास्तव्यास होते. कारण महू म्हणजेच 'मिलीटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर' होते. महूच्या काली पलटन भागात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.

स्मारक

कार्यक्रम

म. प्रदेश सरकार महूमध्ये आंबेडकर जयंतीला दरवर्षी 'सामाजिक समरसता संमेलन' आयोजित करते. याशिवाय विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम येथे राबवले जातात.

हे सुद्धा पहा

संदर्भ