"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३: ओळ ३३:


==शिफारश पद्धती==
==शिफारश पद्धती==
या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.<ref name=":official"/>
* व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
* व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
* विना दुराचार प्रमाणपत्र
* विना दुराचार प्रमाणपत्र
ओळ ३८: ओळ ३९:
* सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
* सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
* संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल
* संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल

== पुरस्काराचे स्वरुप ==
== पुरस्काराचे स्वरुप ==
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - [[आंबेडकर जयंती]] रोजी प्रदान करण्यात येतो.
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - [[आंबेडकर जयंती]] रोजी प्रदान करण्यात येतो.

११:२१, १८ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील योगदान
देश भारत
प्रदानकर्ता महाराष्ट्र शासन
प्रथम पुरस्कार १९७१-७२
शेवटचा पुरस्कार २०१७-१८
संकेतस्थळ www.sjsa.maharashtra.gov.in

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.[१]

निकष व अटी

महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[२]

व्यक्तींसाठीचे निकष
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
  • व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे.
संस्था
  • संस्थेत कोणताही गैरव्यवहार नसावा.
  • संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आवश्यक.
  • मागील ५ वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक.
  • या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात.
  • या संस्था राजकारणापासून अलिप्त असाव्यात.

शिफारश पद्धती

या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[२]

  • व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
  • विना दुराचार प्रमाणपत्र
  • गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
  • सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
  • संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल

पुरस्काराचे स्वरुप

पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.

पुरस्कार विजेते

२०१२

२०१७-१८

राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे.[४]

  1. डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे
  2. यादव सीताराम तामगाडगे
  3. केशव गोरोबा कांबळे
  4. पंडित केरबा सूर्यवंशी
  5. माजीद गफूरसाब मोमीन
  6. भीमराव नागराव हत्तीअंबिरे
  7. साहेबराव कामाजीराव कांबळे
  8. सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर)
  9. शंकर चन्नापा वीटकर

२०१८-१९

हेही पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "http://www.mumbaitarunbharat.in/Encyc/2016/8/17/samajik-nyaya-v-vishesh-sahya-vibhag". www.mumbaitarunbharat.in. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in |title= (सहाय्य)
  2. ^ a b "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.
  3. ^ "सिंधुताई सपकाळसह ७१ जणांना समाजभूषण पुरस्कार प्रदान". marathibhaskar. 2012-04-15. 2018-05-18 रोजी पाहिले.
  4. ^ "News| Latest News in Marathi | Live Updates in Marathi | Lokmat.com". http://www.lokmat.com. 2018-05-14 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)