"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५९: ओळ ५९:
हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व [[पुनर्जन्म|पुनर्जन्मा]]वर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व [[पुनर्जन्म|पुनर्जन्मा]]वर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.


==भारतातील बुद्ध जयंती==
[[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक [[बुद्ध जयंती]] [[दिल्ली]] येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.

'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.
== चित्रदालन ==
== चित्रदालन ==
<gallery>
<gallery>

१२:१८, १२ मे २०१८ ची आवृत्ती

बुद्ध जयंती
आपल्या जन्माच्या apocryphal कथेत वर्णन केल्याप्रमाणे बालक गौतम बुद्ध मूर्ती
अधिकृत नाव बुद्ध जयंती
Fódàn (佛誕)
Phật Đản
Chopa-il (초파일, 初八日)
বুদ্ধ পূর্ণিমা
वैशाख
इतर नावे बुद्ध जयंती
बुद्ध पौर्णिमा
वैशाखी पौर्णिमा
साजरा करणारे जगभरातील बौद्ध लोक
प्रकार बौद्ध, संस्कृतिक
महत्त्व गौतम बुद्धांचा जन्मदिवस साजरा करणे
दिनांक

varies by region:

  • ८ एप्रिल (जपान)
  • मेचा दुसरा रविवार (तैवान)
  • 8th day of 4th lunar month (mainland East Asia)
  • first full moon of Vaisakha (South Asia and Southeast Asia)
वारंवारता वार्षिक
यांच्याशी निगडीत वैशाख


बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात मोठा व प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पोर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो.[२] या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.[३] आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते, असे मानले जाते. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्याने भारत, चीन, नेपाल, सिंगापूर, व्हियेतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांतील १८० कोटींहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतातील बुद्ध पौर्णिमेसाठी सार्वजनिक सुट्टी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली.[४][२]

बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर त्यांना एका-बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.[३] बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातीला हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बौद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणा शी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील (भू-स्पर्श मुद्रा) ६.१ मीटर लांब मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली आहे तेथेच हे विहार तयार केले आहे.[५] विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले.

श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस 'वेसाक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.[६] या दिवशी बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया येथे येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केले जाते. विहार तसेच घरातील बुद्धाच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.

उत्सवाचे स्वरूप

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थींना सर्वांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.[२] या दिवशी बौद्ध धर्माचे अनुयायी बौद्ध परंपरेतील सारनाथ, गया, कुशीनगर अशा पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजन करतात. बौद्ध धर्माशी संबंधित सूत्रे, त्रिपिटके यातील भागांचे वाचन व पठण केले जाते. व्रताचा भाग म्हणून या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो.[२] या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वेगवेगळ्या देशात तेथील रीति-रिवाज आणि संस्कृतिनुसार कार्यक्रम आयोजित केले जातात.

  • श्रीलंकन लोक या दिनाला 'वेसाक' उत्सव म्हणून साजरा करतात, जो 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे.
  • या दिवशी बौद्ध घरांमध्ये दीपक प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घराला सजवले जाते.
  • जगभरातून बौद्ध धर्माचे अनुयायी बोधगयेला येतात आणि प्रार्थना करतात.
  • बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचा निरंतर पठण केले जाते.
  • बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिर) आणि घरांमध्ये अगरबत्ती लावली जाते. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जातात आणि दीवा लावून पूजा केली जाते.
  • बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
  • त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मूळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दीवे प्रज्वलित केले जातात.
  • या दिवशी मांसाहार वर्ज्र असतो.
  • पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करुन खुल्या आकाशात सोडले जाते.
  • गरीबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
  • दिल्ली संग्रहालय या दिवशी बुद्धांच्या अस्थींना बाहर काढतो कारण की बौद्ध अनुयायी तेथे जाऊन प्रार्थना करु शकतील.

बुद्ध जयंतीचे महत्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.[७]

आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.[८] दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.[३]

हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.

भारतातील बुद्ध जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. याप्रसंगी आंबेडकरांनी बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले. या जयंती समारोहास अनेक देशांचे वकील/प्रतिनिधी, भिक्खू समुदाय व सुमारे वीस हजार लोकांचा समुदायही उपस्थित होता. अशाप्रकारे भारतात बुद्ध जयंतीची सुरुवात झाली.

१९५१ मध्ये आंबेडकरांच्याच अध्यक्षतेखाली तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. दिल्लीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रातही बुद्ध जयंतीस १९५३ पासून सुरुवात केली. १९५६ पर्यंत त्यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत बुद्ध जयंतीचे महाराष्ट्रात भव्य कार्यक्रम झाले. महाराष्ट्रातले बुद्ध जयंतीचे कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत झाले. भारतात व महाराष्ट्रात बुद्ध जयंती महोत्सवाच्या परंपरेची सुरूवात बाबासाहेब आंबेडकर केली, म्हणून ते भारतातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते ठरतात.

'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Official Site of Korea Tourism Org. National Holidays
  2. ^ a b c d Verma, Manish (2013). Fasts and Festivals of India (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 9788171820764.
  3. ^ a b c मनोहर पुरी. "बुद्ध पोर्णिमा" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). अभिव्यक्ति. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ साचा:Citebook
  5. ^ लेखक कुमार आनंद. "बुद्ध पौर्णिमा" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). नूतन सवेरा. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "बुद्ध पूर्णिमा या बुद्ध जयंती" (एचटीएम) (हिन्दी भाषेत). वेब दुनिया. Unknown parameter |accessyear= ignored (|access-date= suggested) (सहाय्य); Unknown parameter |accessmonthday= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ Bansal, Sunita Pant (2005-06). Encyclopaedia of India (इंग्रजी भाषेत). Smriti Books. ISBN 9788187967712. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ Tsering, Geshe Tashi (2010-07). The Four Noble Truths: The Foundation of Buddhist Thought (इंग्रजी भाषेत). ReadHowYouWant.com. ISBN 9781458783950. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे