"भंते प्रज्ञानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६: ओळ १६:
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खु]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खु]]
[[वर्ग:इ.स. १९२७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९१७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

२०:५८, ७ मे २०१८ ची आवृत्ती

भन्ते प्रज्ञानंद (जन्म : कॅण्डी-श्रीलंका, १८ डिसेंबर, १९२७; मृत्यू : लखनौ, ३० नोव्हेंबर २०१७) हे बौद्ध भिक्षू होते.


या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह लाखो अनुयायांना, १४ ऑक्टोबर १९५६ला धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भन्तेंच्या पथकात प्रज्ञानंद होते. रंगून येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा भेटले.

प्रज्ञानंदांचे प्राथमिक शिक्षण श्रीलंकेत झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांना धर्मप्रसाराचे महत्त्व वाटू लागले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अनागरिक धम्मपाल यांनी त्यांना श्रीलंकेतून भारतात आणले. येथे आल्यावर त्यांचा संपर्क उत्तर प्रदेशातील लालकुंवा येथील बुद्ध विहाराचे संस्थापक भन्ते बोधानंद यांच्याशी झाला. उर्वरित शिक्षण उत्तर प्रदेशात पूर्ण करत त्यांनी त्रिपिटीकाचार्य ही पदवी मिळवली. १९४२ला त्यांनी धम्मदीक्षा घेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले. श्रामणेर दीक्षेनंतर त्यांना प्रज्ञानंद हे नाव देण्यात आले.

डॉ. आंबेडकर नाशिकजवळील येवल्याला गेले असताना त्यांना बोधानंद व प्रज्ञानंद भेटले. या भेटीत नागपूरच्या धम्मदीक्षा कार्यक्रमाचे स्वरूप ठरले. बोधानंदांनी प्रज्ञानंदांना आंबेडकरांच्या सोबत दिले. नंतर नागपूरच्या सोहळ्यात महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वातील पथकात प्रज्ञानंद सहभागी झाले. बोधानंद यांचे निधन झाले तेव्हा प्रज्ञानंद केवळ २५ वर्षांचे होते. तरुण वयातच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुखपद आले. आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर देशातील अनेक भागांत लोक दीक्षेसाठी इच्छुक होते. देशभरातील असंख्य लोकांकडून धम्मदीक्षेसाठी मागणी येऊ लागली. त्यासाठी प्रज्ञानंद अनेक ठिकाणी गेले. उत्तर प्रदेशातील अलीगडला त्यांनी अडीच लाख लोकांना दीक्षा दिली. दीक्षा देण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित भिक्खू नसल्याने प्रज्ञानंदांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला रेन चेन भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज जगभरात या केंद्राचे नाव आदराने घेतले जाते.

नंतरच्या काळात धर्मप्रसार व रचनात्मक कार्यासाठी वाहून घेतलेल्या प्रज्ञानंदांनी अनेक संस्थांमध्ये पदे भूषवली. भारती शिक्षण परिषद, श्रावस्तीचे जेतवन महाविद्यालय, भारतीय बौद्ध परिषद व महाबोधी विद्यापरिषद यांचे ते अध्यक्ष होते. देशाच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. ‘मानव उत्थान’ हे पाक्षिक तसेच ‘मध्यम मार्ग’ नावाचे साप्ताहिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित व्हायचे. उत्तर प्रदेशातील रायबरेलीला त्यांनी मूळ भारत निवासी वसतिगृहाची स्थापना केली. शैक्षणिक, धार्मिक व सामाजिक कार्य करता यावे म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशात व मध्य प्रदेशात मानव उत्थान मिशन नावाचे अभियान प्रभावीपणे राबवले. १९५४ला ब्रह्मदेशातील रंगून येथे झालेल्या सहाव्या धम्मसंगिनी परिषदेसह प्रज्ञानंदांनी देश-विदेशातील अनेक बौद्ध परिषदांमध्ये भाग घेतला. त्यांनी बौद्ध धर्माची महती सांगणाऱ्या पण पाली भाषेत असलेल्या अनेक ग्रंथांचा हिंदीत अनुवाद केला. ‘वज्रसूची’ हा त्यांतील महत्त्वाचा ग्रंथ आहे.

संदर्भ

[२]

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/bhante-pragyanand-1595738/