"अरुण दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५७: ओळ ५७:
|-
|-
|अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी||मंगेश पाडगावकर|| यशवंत देव
|अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी||मंगेश पाडगावकर|| यशवंत देव
|-
|अपुल्या हाती नसते काही ||मंगेश पाडगावकर|| यशवंत देव
|-
|अविरत ओठी यावे नाम ||मनोहर कवीश्वर ||
|-
|असाच यावा पहाटवारा ||शआंताराम नांदगावकर ||अनिल मॊहिले
|-
|असेन मी नसेन मी ||शांता शेळके || यशवंत देव
|-
|आज मी तुझ्यासवे ||प्रभाकर पंडित ||
|-
|-
|भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी ||मंगेश पाडगावकर|| यशवंत देव
|भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी ||मंगेश पाडगावकर|| यशवंत देव
ओळ ६९: ओळ ७९:
|-
|-
|स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला||शंकर वैद्य||हृदयनाथ मंगेशकर
|स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला||शंकर वैद्य||हृदयनाथ मंगेशकर
|-
| || ||
|-
|-
|}
|}

१३:०१, ६ मे २०१८ ची आवृत्ती

अरुण दाते
आयुष्य
जन्म ४-५-१९३४
जन्म स्थान भारत
मृत्यू ६-५-२०१८
मृत्यू स्थान मुंबई
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील रामूभय्या दाते
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत, भावगीत
पेशा गायकी

अरुण दाते (जन्म : ४ मे, इ.स. १९३४ - मृत्यू : ६ मे, इ.स. २०१८ ) हे एक मराठी भावगीत गायक होते. अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.

दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास सुरू केला. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.

अरुण दाते १९५५पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. १९६२मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या अरुण दाते यांच्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने आपले मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. वयाच्या पन्‍नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले इ.स. २०१०पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५००हून अधिक कार्यक्रम झाले. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.

ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे दिनांक ६/०५/२०१८ रोजी मुंबईतील कांजूरमार्ग येथील निवासस्थानी निधन झाले.

अरुण दाते यांनी गायलेल्या भावगीताचे शब्द भावगीताचे कवी संगीत दिग्दर्शक
अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी मंगेश पाडगावकर यशवंत देव
अपुल्या हाती नसते काही मंगेश पाडगावकर यशवंत देव
अविरत ओठी यावे नाम मनोहर कवीश्वर
असाच यावा पहाटवारा शआंताराम नांदगावकर अनिल मॊहिले
असेन मी नसेन मी शांता शेळके यशवंत देव
आज मी तुझ्यासवे प्रभाकर पंडित
भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणिक राणी मंगेश पाडगावकर यशवंत देव
भेट तुझी माझी स्मरते मंगेश पाडगावकर यशवंत देव
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मंगेश पाडगावकर यशवंत देव
शुक्र तारा मंद वारा मंगेश पाडगावकर श्रीनिवास खळे
सूर मागू तुला मी कसा सुरेश भट हृदयनाथ मंगेशकर
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला शंकर वैद्य हृदयनाथ मंगेशकर

लेखन

  • अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे. (२६-५-२०१६)
  • अरुण दाते यांनी ‘शुक्रतारा’ या नावाचे आत्मचरित्र लिहिले असून त्याचे शब्दांकन सुलभा तेरणीकर यांचे आहे, अशी बातमी होती, पण तिची सत्यता पडताळून पाहता आली नाही. बातमी अनेक ठिकाणी वाचायला मिळाली होती.
  • सुरेश ठाकुर यांचाही ‘शतदा प्रेम करावे’ याच नावाचा ललित लेखसंग्रह आहे.

पुरस्कार

  • पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार (इ.स.२०१०)
  • शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (२०१६)

बाह्य दुवे