"तणमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 15 langlinks, now provided by Wikidata on d:Q1273465
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२: ओळ १२:
{{लेखनाव}} पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, [[कोंबडी|कोंबडीएवढा]] आहे. वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते.

==वास्तव्य/आढळस्थान==
==वास्तव्य==
जवळ जवळ नामशेष झालेला हा [[पक्षी]] पूर्वी [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] पेन्नार आणि [[गोदावरी नदी|गोदावरीच्या]] खोर्यातील दगडाळप्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता.१९९० नंतर हा पक्षी पुनः दिसून आला नाही.१९७५-७६ साली आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवतम भागात शोध घेत असताना पुनः दिसून आला.
[[भारत|भारताचा]] पूर्वोत्तर भाग सोडून {{लेखनाव}}चे इतरत्र वास्तव्य आहे. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. {{लेखनाव}} हे उंच गवताळ भागात आणि शेताच्या प्रदेशात सहसा एकटे राहणे पसंत करतात.

==खाद्य==
==खाद्य==

१९:२१, १८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

तणमोर
शास्त्रीय नाव Sypheotides indicus /
Eupodotis indica
कुळ हूक्कुटाद्य (Otididae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Lesser Florican
हिंदी लीख

वर्णन

तणमोर पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा आहे. वीण काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात मातकट रंगाचे त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते.

वास्तव्य

जवळ जवळ नामशेष झालेला हा पक्षी पूर्वी आंध्र प्रदेशातील पेन्नार आणि गोदावरीच्या खोर्यातील दगडाळप्रदेशातील झुडपी जंगलात आढळून आला होता.१९९० नंतर हा पक्षी पुनः दिसून आला नाही.१९७५-७६ साली आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील सिद्धवतम भागात शोध घेत असताना पुनः दिसून आला.

भारताचा पूर्वोत्तर भाग सोडून तणमोरचे इतरत्र वास्तव्य आहे. भारतात हा निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. तणमोर हे उंच गवताळ भागात आणि शेताच्या प्रदेशात सहसा एकटे राहणे पसंत करतात.

खाद्य

गवताचे अंकुर {कोंब), धान्य, कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ

जुलै ते ऑक्टोबर हा काळ तणमोर पक्ष्यांचा वीणीचा काळ असून गवताच्या रांजीत, शेतातील रोपांमध्ये मादी घरटे तयार करते आणि त्यात हिरवट-पिवळ्या रंगाची त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली ३ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन करण्याची जबाबदारी एकटी मादी पेलते.

वीण काळात नर मादीला आकर्षित करण्यासाठी आणि साम्राज्य निश्चितीसाठी एकाच जागेवर उंच उंच उड्या मारतो. नराच्या या सवयीमुळेच शिकार्‍यांचे लक्षही त्याच्याकडे सहजपणे वेधले जाते. हे पक्षी दुर्मिळ होत चालले असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

चित्रदालन

बाह्य दुवे