"थोरले शाहू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
संपूर्ण लेख नकल-डकव आहे. साचा लावला.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
{{हा लेख|'छत्रपती शाहू संभाजी भोसले' (सातारा घराणे)|शाहू (निःसंदिग्धीकरण)}}
{{हा लेख|'छत्रपती शाहू संभाजी भोसले' (सातारा घराणे)|शाहू (निःसंदिग्धीकरण)}}
{{बदल}}
{{बदल}}

'''थोरले शाहू महाराज''' (जन्म : १८ मे १६८२; मृत्यू सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती [[शिवाजी]]चे पुत्र [[संभाजी]] यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही शौर्यगुण येऊ नयेत अशी काळजी बादशहाने घेतली होती. शिवाजीपुत्र [[राजाराम]] यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी [[ताराबाई]] हिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूला सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना सातार्‍याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. सातार्‍याला या थोरल्या शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते मरेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले.

सातार्‍याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत. थोरले शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला.

या शाहू महाराजांचे ’छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)’ या नावाचे चरित्र आसाराम सैंदाणे यांनी लिहिले आहे. प्रीतम प्रकाशनने छापवून घेतलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन [[निनाद बेडेकर]] यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले.


== थोरले शाहू महाराज आणि खंड्या ==
== थोरले शाहू महाराज आणि खंड्या ==

१८:४१, १८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती


थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; मृत्यू सातारा, १५ डिसेंबर १७४९) हे छत्रपती शिवाजीचे पुत्र संभाजी यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते. औरंगजेबाचे अतिशय लाडके असले तरी, त्यांच्यामध्ये कोणतेही शौर्यगुण येऊ नयेत अशी काळजी बादशहाने घेतली होती. शिवाजीपुत्र राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई हिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूला सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना सातार्‍याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. सातार्‍याला या थोरल्या शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते मरेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले.

सातार्‍याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत. थोरले शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला.

या शाहू महाराजांचे ’छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)’ या नावाचे चरित्र आसाराम सैंदाणे यांनी लिहिले आहे. प्रीतम प्रकाशनने छापवून घेतलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले.

थोरले शाहू महाराज आणि खंड्या

शाहू महाराजांची राहणी ही व्रतस्थ साधू सारखी होती. त्यांची जी प्रमुख दुर्मिळ चित्रे उपलब्ध आहेत ती सर्वच चित्रे पाहिली असता अगदी साध्या राहणीतील आहेत. त्यामध्ये साधू बैराग्यासारखे लांब केस आणि कमरेवर एक पंच्यासारखे वस्त्र व गळ्यात एक मोत्याची माळ दिसून येते. भारी दागदागिन्याची हौस किंवा डोक्यावर राजाला साजेसा शाही टोप किंवा फेटा यातील काहीच दिसून येत नाही. मात्र सर्वच चित्रात पशू पक्षाविषयी निर्मळ प्रेम व्यक्त करणारी शाहूंची जवळीक महाराजांच्या बद्दल बरेच काही सांगून जाते.

शाहू महाराजांचे प्राणी प्रेम

शाहू महाराजांना कुत्री पाळण्याचा खास शौक होता. शाहू महाराजांच्या खाजगी पत्रव्यवहारात सुद्धा कुत्र्यांचा व इतर प्राण्यांचा संदर्भ असलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. ह्या पाळलेल्या कुत्र्याविषयी आणि शाहू महाराजांविषयी अनेक संदर्भ साधनात खंड्या नावाच्या लाडक्या आणि प्रामाणिक कुत्र्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

शाहू महाराजांचे जे प्रसिद्ध चित्र मुंबईतील प्रिन्स् ऑफ वेल्स् वस्तूसंग्रहालयात उपलब्ध आहे. ते चित्रही प्राणी प्रेमाची साक्ष देते. त्या चित्रात महाराज शुभ्र घोड्यावर स्वार आहेत. सोबत मागे पुढे दोन सेवक आहेत मागील सेवकाने हातात अब्दागिरी धरलेली आहे. तर महाराजांच्या अंगावर विशेष वस्त्र जरी नसले तरी कमरेखालील वस्त्र मात्र राजेशाही प्रकारचे दिसते. महाराज दरबारी किंवा इतर कार्यक्रमास खास रितीरीवाजाने निघाल्याचे दिसतात परंतु महाराजांच्या स्वारी बरोबर निघालेली दोन कुत्री मात्र चित्रात दिसतात ह्यातील एक कुत्रा हा लाडका खंड्याच चित्रकाराने चितारला असावा असे वाटते. खूप प्रसिद्ध आणि नावलौकीक असणाऱ्या ह्या कुत्र्यावर शाहू महाराजांचा खास जीव होता असे अनेक घटनेतून दिसून येते.


काव्येतिहासंग्रहकार[माहितीज्ञान पोकळी] म्हणतात ह्या खंड्याने शाहू महाराजांच्यावर एकदा वाघाने हल्ला केला असता हल्ल्यात वाघापासून महाराजांचे संरक्षण केले होते.

कुत्रा कितीही चांगला आणि पाळीव असला तरी प्राणीमात्रात नको तिथे तोंड घालण्याच्या वृत्तीमुळे दगड खावयास लागतात. हे मात्र खरे ! या खंड्याबाबत आलेली एक हकीकत अशी ....

तो कुतऱ्याचा स्वभाव गुण तो वाईट जीनसावर हुंगावयास गेला. ते समई येक हुजऱ्याने कुतऱ्यास दगड मारिला. तो त्याचे पायास लागोन तो ओरडत सरकार याजपासी आला. मग त्याणी सर्व मंडळीस विच्यारिले कीं यास कोणी मारिले. तेव्हा एक हुजऱ्याने सांगितले कीं हुजरे याणी दगड मारिला. तेव्हा महाराज छत्रपती यास राग येऊन त्या हुजऱ्यास शोध करुन आणा, असी आज्ञा होताच ढालाइतानी त्या हुजऱ्यास धरुन हुजूर आणिला. नंतर सरकार यांनी त्या हुजऱ्यास पुसिले की तू खंड्या कुतऱ्यास दगड का मारिलास ? त्याजवरुन हुजऱ्याने स्वामीस अर्ज केला केला की खंड्या कुतरा सरकारचा मी ही कुतरा सरकारचा. कुतरी कुतरी भांडली त्याचे भांडण स्वामींनी कशास मनात आणावे. असा हुजऱ्याने अर्ज केल्यावरुन मग शाहू महाराज छत्रपती यांचा राग मनातून गेला. आणि मर्जी खूष जाहाली.

तर दुसरी हकीकत अशी..

इंद्रोजी कदम सुपेकर हा हा बादशाही नोकर होता. आपल्या फौजेतील घोड्यास तो चांदीचे नाल करुन नालबंदी करीत असे. आपल्या लष्करात नोकर चाकर यांना त्याने सक्त ताकीद दिली होती. घोड्याचा नाल सापडल्यास तो जमा न केलेस हात तोडा जाईल. एकदा तो दिल्लीहून बादशहाकडून आला होता म्हणून त्याला शाहूराजांनी भेटीस बोलाविले जासूदामार्फत खास आज्ञापत्र पाठविली. या उलट इंद्रोजीने विनंती पत्रे पाठविली की पेशवे प्रधान तुमच्या दर्शनास येतात त्या वेळेस लष्करातील नोबती नगारे बंद करतात.परंतु स्वामींनी माझ्यासाठी नोबती नगारे वाजविण्याचा हुकूम केला पाहीजे.

शाहू महाराजांनी नोबती नगारे वाजवित येण्याविषयी आज्ञा केल्यावर इंद्रोजी कदम सात हजारांची फौज घेऊन सोबत वकील कारकून व कारभारी सुप्याहून निघाला. इंद्रोजी कदमाने आपल्यासह सात हजार लोकांना जरीपोशाख घालून जड जवाहिराचे दागिने सर्वांच्या अंगावर घालून नोबती नगारे वाजवित रंग महालापर्यंत आणले. वरुन नगारजीस दमबाजी केली की नौबत बंद केल्यास हात तोडीन. महाराजांच्या हे लक्षात आले की सामान्य सरदार असुनही त्याला आपली दौलत व बडेजावा दाखवायची घमेंड आहे. महाराजांनी आपला खंड्या कुत्र्यास बरोबर घेऊन त्याला जडजवाहीर घालून आपण साध्या पांढऱ्या वेषात तख्तावर जाऊन बसले. इंद्रोजी कदम व बरोबर आलेल्या मंडळीना खंड्याच्या अंगावरील दागिने पाहून महाराजांनी लज्जीत केले. व घमेंड उतरविली. हा खंड्या कुत्रा मयत झाल्यावर त्याचे थडगे महाराजांनी संगम माहुलीस बांधले याही कुत्र्याच्या थडग्यास लोक देव मानून नवसास पावतो म्हणून नवस करीत असत.

संदर्भ

१) मराठी रियासत - गो. स. सरदेसाई २) मराठी दप्तर रुमाल पहिला - वि. ल. भावे ३) थोरले शाहू महाराज - मल्हार रामराव चिटणीस ४) छत्रपती थोरले शाहू महाराज - आसाराम सैदाणे


या विभागातील मजकूर https://www.facebook.com/photo.php?fbid=1853425608250093&set=gm.1825344734349894&type=3&theater येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.(एप्रिल २०१८)



  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले