"द ग्रेटेस्ट इंडियन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे इ.स. २०१२ मध्ये रिलायंस मोबाईल द्वारा प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण होते. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात केले गेले ज्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे विजयी घोषित झालेले आहेत.<ref>[http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html]</ref>
'''सर्वात महान भारतीय''' ([[इंग्रजी]]: [[:en:The Greatest Indian|The Greatest Indian]]) हे इ.स. २०१२ मध्ये रिलायंस मोबाईल द्वारा प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण होते. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात केले गेले ज्यात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे विजयी घोषित झालेले आहेत.<ref>https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-ambedkar-499990.html</ref><ref>[http://www.firstpost.com/politics/watch-why-ambedkar-was-voted-as-the-greatest-indian-423570.html]</ref>


[[भारत|आधुनिक भारतातील]] सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) व्यक्ती शोधण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘''सर्वात महान भारतीय कोण''’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी [[जून]] [[इ.स. २०१२]] ते [[ऑगस्ट]] [[इ.स. २०१२]] दरम्यान हे सर्वात मोठे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. ११ ऑगस्ट रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.
[[भारत|आधुनिक भारतातील]] सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) व्यक्ती शोधण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘''सर्वात महान भारतीय कोण''’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी [[जून]] [[इ.स. २०१२]] ते [[ऑगस्ट]] [[इ.स. २०१२]] दरम्यान हे सर्वात मोठे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. ११ ऑगस्ट रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.<ref>https://www.news18.com/videos/india/the-greatest-indian-11-498738.html</ref>


== जनमत चाचणी ==
== जनमत चाचणी ==

१७:५९, २४ मार्च २०१८ ची आवृत्ती

सर्वात महान भारतीय (इंग्रजी: The Greatest Indian) हे इ.स. २०१२ मध्ये रिलायंस मोबाईल द्वारा प्रयोजित एक मोठे सर्वेक्षण होते. हे सर्वेक्षण सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही 18 दुरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीनद्वारे आयोजित केले गेले होते. भारतीय लोकांच्या जनमत चाचणीद्वारे हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात केले गेले ज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विजयी घोषित झालेले आहेत.[१][२]

आधुनिक भारतातील सर्वात महान (सर्वश्रेष्ठ) व्यक्ती शोधण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतातील कोट्यवधी जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी जून इ.स. २०१२ ते ऑगस्ट इ.स. २०१२ दरम्यान हे सर्वात मोठे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते. ११ ऑगस्ट रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा बहुसंख्य भारतीय जनतेचा हा कौल आहे.[३]

जनमत चाचणी

सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री 18 या नामांकित दूरचित्रवाहिन्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या १०० नामवंतांची यादी करून त्यातील सर्वात महान भारतीय कोण? असा सवाल सर्वेक्षणातून भारतीय जनतेसमोर ठेवला होता. तीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मते जाणून घेण्यात आली. दूरध्वनी, मोबाईल फोनइंटरनेटद्वारे सर्वसामान्य माणसांना आपलं मत नोंदविण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्वेक्षणाला विश्वासार्हता प्राप्त व्हावी यासाठी एसी नेल्सन या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचीही मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरातील नागरिकांची मते दोन टप्प्यात जाणून घेतली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रातील २८ नामांकित व्यक्तींना ज्यूरी म्हणून नेमण्यात आलं. त्यांनाही पसंतीक्रम नोंदविण्यास सांगण्यात आलं होतं. लोकांची मतं, मार्केट रिसर्च आणि ज्यूरी अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणाचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘‘द ग्रेटेस्ट इंडियन’’ ठरवून गेला आहे. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, जे.आर.डी. टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावाला पसंती मिळाली होती. सर्वसामान्य लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ ठरविले. लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभ भाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नोंदविल्याचा सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री १८ या वाहिन्यांचा दावा आहे.

पहिले १० सर्वात महान भारतीय

पहिले १० (टॉप टेन) महान भारतीयांची यादी, या सर्वांनाच भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे.

क्रम व्यक्तिमत्त्व विख्यात / प्रसिद्धी जनमत (वोट)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य बाबासाहेब जागतिक स्तरावरील अनेक विषयांत प्रभुत्व असणारे बहुआयामी व अद्वितीय विद्वान होते. भारताचे पहिले कायदा मंत्री, मानवी हक्क आंदोलनाच्या संघर्षाचे प्रमुख नेते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे जनक, भारताच्या सामाजिक आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. त्यांना आज आधुनिक भारताचे निर्माते म्हणून जगभरातून पाहीले जाते. १९,९१,७३५
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम ज्यांना मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखलं जाते, ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. ते भारताचे नावाजलेले वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते. १३,७४,४३१
सरदार वल्लभ भाई पटेल सरदार वल्लभ भाई पटेल भारताचे स्वातंत्रता सेनानी होते. भारताचे ते पहिले गृह मंत्री आणि उप-प्रधानमंत्री बनले. बारदोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना सत्याग्रहाच्या यशामुळे तेथिल महिलांनी सरदार ची उपाधी प्रदान केली.  ५,५८,५३५
अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते हिंदी कवी, पत्रकार व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता आणि इ.स. १९६८ ते इ.स.१९७३ पर्यंत त्याचे अध्यक्ष ही राहिले. ते आयुष्याभर भारतीय राजकारणात सक्रिय राहिले. १,६७,३७८
मदर तेरेसा मदर तेरेसा, रोमन कैथोलिक चर्च द्वारे कलकत्ताची संत तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म अग्नेसे गोंकशे बोजशीयु नावाने एका अल्बेनीयाई परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा रोमन कैथोलिक नन होत्या, ज्यांनी इ.स.१९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरीकता स्विकारली होती. तेरेसा महान समाज सेविका होत्या.  ९२,६४५
जे.आर.डी. टाटा जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले आणि इस्पात, इंजीनीयरींग, होट्ल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. इ.स.१९३२ मध्ये त्यांनी टाटा एयरलाइंस सुरु केली. भारतासाठी महान इंजीनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी इ.स. १९४५ मध्ये टेल्को ची सुरूवात केली जो मूलतः इंजीनियरिंग आणि लोकोमोटिवसाठी होती. ५०,४०७
सचिन तेंडुलकर सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतक मिळवण्याचा विक्रम केला. ते कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज म्हणून ओळखले जातात.तसेच त्याच्या नावावर १४००० धावा कसोटी सामन्यात करण्याचा विश्व विक्रम आहे. एकदिवसीय सामन्यातही त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. ४७,७०६
इंदिरा गांधी इंदिरा गांधी इ.स. १९६६ ते इ.स.१९७७ पर्यंत तीन वेळा भारताच्या प्रधानमंत्री होत्या.चौथ्या वेळी इ.स.१९८० ते इ.स.१९८४ त्यांची हत्या होईपर्यंत त्या प्रधानमंत्री होत्या. त्या भारताच्या प्रथम आणि आजपर्यंत पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या. १७,६४१
लता मंगेशकर लता मंगेशकर, भारताची सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका आहे, ज्यांचा सहा दशकांचा कार्यकाळ उपलब्धींनी भरून पडलेला आहे. परंतु लता मंगेशकरांनी जवळजवळ तीस पेक्षा जास्त भाषांत फिल्मी आणि गैर-फिल्मी गाणे गायले आहे. त्यांची ओळख भारतीय सिनेमात एक पार्श्वगायक म्हणून राहिलेली आहे. ११,५२०
१० जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू भारताचे प्रथम प्रधानमत्री होते आणि स्वातंत्र्य पूर्व आणि नंतरच्या भारतीय राजनीतीमध्ये केन्द्रीय व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी १९४७ मध्ये भारताची एक स्वातन्त्र राष्ट्राच्या रूपात स्थाने पासून १९६४ पर्यंत, भारतात शासन केले. ते आधुनिक भारतीय राष्ट्र-राज्य – एक सम्प्रभु, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकतान्त्रिक प्रजासत्ताकाचे - चे शिल्पकार मानले जातात. ९,९२१

मूळ पन्नास महान भारतीयांची यादी

सर्वेक्षणासाठी निवडलेले मूळ पन्नास भारतीयांची यादी[४][५]

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. ए.पी.जे. अब्दुल कलाम
  3. जवाहरलाल नेहरू
  4. जयप्रकाश नारायण
  5. अटल बिहारी वाजपेयी
  6. वल्लभभाई पटेल
  7. कांशीराम
  8. राम मनोहर लोहिया
  9. राजगोपालाचारी
  10. सैम मानेकशॉ
  11. बाबा आमटे
  12. मदर तेरेसा
  13. इला भट्ट
  14. विनोबा भावे
  15. कमलादेवी चट्टोपाध्याय
  16. रवि शंकर
  17. एम.एस. सुब्बुलक्ष्मी
  18. मकबूल फिदा हुसैन
  19. बिस्मिल्ला खान
  20. आर.के. नारायण
  21. आर.के. लक्ष्मण
  22. बी. लालकृष्ण एस. अयंगर
  23. अमिताभ बच्चन
  24. राज कपूर
  25. कमल हासन
  26. सत्यजीत रे
  27. लता मंगेशकर
  28. ए.आर. रहमान
  29. किशोर कुमार
  30. दिलीप कुमार
  31. देव आनंद
  32. मोहम्मद रफी
  33. होमी भाभा
  34. धीरूभाई अंबानी
  35. वर्गीज कुरियन
  36. घनश्याम दास बिडला
  37. जहांगीर रतनजी दादाभाई टाटा
  38. एन. आर. नारायणमूर्ती
  39. विक्रम साराभाई
  40. एम. एस. स्वामीनाथन
  41. रामनाथ गोयनका
  42. अमर्त्य सेन
  43. ई श्रीधरन
  44. सचिन तेंडुलकर
  45. कपिल देव
  46. सुनील गावस्कर
  47. ध्यानचंद
  48. विश्वनाथन आनंद
  49. मिल्खा सिंग
  50. इंदिरा गांधी

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी