"ताण-तणाव मुक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:


{{बदल}}
{{बदल}}
'''तणाव''' (किंवा''' ताण''', '''ताण-तणाव''') ही एक मानसिक अवस्था आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.
'''तणाव''' (किंवा''' ताण''', '''ताण-तणाव''') ही एक मानसिक अवस्था आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.


लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.
लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.

==कारणे==
==कारणे==
तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात. बाह्य कारणे व आंतरिक कारणे
तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात. बाह्य कारणे व आंतरिक कारणे

१४:४६, २२ मार्च २०१८ ची आवृत्ती

तणाव (किंवा ताण, ताण-तणाव) ही एक मानसिक अवस्था आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठा किंवा लहान असतो, तसेच क्षुल्लक वाटणारा प्रसंगदेखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. उदा. दूध उतू जाणे, नेहमीची बस चुकणे, कार्यालयात जायला उशीर होणे, दूरध्वनी लगेच न लागणे, गृहपाठ न होणे इ.

लहान-थोर, पुरुष-स्त्रिया सर्वांनाच कमी जास्त प्रमाणात तणाव हा असतो. माणसावरील तणाव माणसाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर अनिष्ट परिणाम तर करतो; त्याचबरोबर समाजातील बऱ्याच समस्या व विकृती यांनाही तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असतो. संथगतीने मृत्यूकडे नेणारी अशी ही व्याधी आहे.

कारणे

तणाव निर्माण होण्याची मुख्यत: दोन कारणे असतात. बाह्य कारणे व आंतरिक कारणे

  • बाह्य - एकूण तणावनिर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ ५-१० टक्के एवढाच वाटा असतो.
    • उदा. कामाच्या ठिकाणचे व घरातील वातावरण, आर्थिक स्थिती, सामाजिक समस्या, प्रकृती अस्वास्थ इ.
  • आंतरिक – एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा ९०-९५ टक्के वाटा असतो. आक जीवन प्रणालीमुळे तणाव निर्माण होतो असे म्हटले जाते; परंतु कोणतीही परिस्थिती ही स्वत: तणावपूर्ण नसते. एखाद्याच्या स्वभावानुरूप त्या परिस्थितीकडे पहाण्याच्या त्याच्या दृष्टीकोनावर सर्व अवलंबून असते. स्वभावातील काही दोषांमुळे नेहमीची परिस्थितीदेखील कशी तणाव निर्माण करू शकते, याची काही उदाहरणे खाली आहेत.
    • आत्मविश्वासाचा अभाव - आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली, की व्यक्ती

तणावग्रस्त होते.

    • हळवेपणा - रस्त्यात भेटलेला मित्र बघून हसला नाही म्हणून तणाव.
    • लाजणे - अपरिचित व्यक्तीशीी बोलताना तणाव.
    • न्यूनगंड असणे - आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींच्या सानिध्यात तणाव.

दुष्परिणाम

तणावाच्या दुष्परिणामांची दोन गटात विभागणी करता येते.

  1. शारीरिक - पित्ताचा विकार, भूक न लागणे, वजन कमी होणे, हृदयरोग, दमा, रक्तदाब, मधुमेह, यकृत / मूत्रपिंड आदींचे विकार, इ.
  2. मानसिक - लगेच दमणे, अतिरिक्त राग येणे, विकृत व्यक्तीमत्त्व, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण, भावनाविवशता, इ.

उपाययोजना

तणावावर सर्वसाधारणपणे दोन स्तरावर उपाययोजना केल्या जातात -

  1. शारीरिक स्तरावर उपाय - उदा. झोपी जाणे, कामावरून सुट्टी घेणे, सहलीला जाणे, मसाज घेणे, व्यायाम करणे इत्यादी. यात केवळ कृतीच्या स्तरावर उपाय असल्यामुळे सुधारणा अगदी तात्पुरतीच असते. बऱ्याच वेळा तणावपूर्ण परिस्थितीपासून पूर्णत: बाजूला जाणे शक्य नसते, तसेच एका ठिकाणावरून दुसरीकडे गेल्यास तिथेही ताण निर्माण होऊ शकतो.
  2. मानसिक स्तरावर उपाय - मानसोपचार, संमोहन उपचार इत्यादी. यात केवळ कृतींच्या स्तरावरच नव्हे तर ज्यापासून कृतींचा उगम होतो त्या विचारांच्या स्तरावर उपचार केले जातात. त्यामुळे काही काळ सुधारणा टिकू शकते म्हणून हे दोन्ही उपाय हे कायम स्वरूपी उपाय नाहीत.

कृती=

चांगल्या घटनांचाही ताण येऊ शकतो.

कृती

•        नुकता अनुभवलेला तणावाचा प्रसंग एकमेकांना सांगा.

•        त्यावेळी मनःस्थिती, शरीर स्थिती कसकशी होती?

''तणावाचे आपल्या कामावर होणारे परिणाम''

आपली तणावाची कोणती पातळी असल्यावर आपले काम उत्तम होते, ते जाणून घ्यायचे.

तणाव-मुक्ती कशी साधायची?

सर्व प्रथम, आपल्याला ताण-तणाव आहे, तो किती आहे, का आहे, केव्हा आहे या सगळ्याचे भान ठेवायचे. म्हणजे आपल्या तणावाचे स्वरूप समजून घ्यायचे.

आपल्या त्रासदायक तणावा बाबत  तो दूर करण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची.

यातून स्वतःला  काही शिकायचे आहे, असे म्हणायचे.

कार्यवाहीचे सुयोग्य उपाय निवडायचे.

त्यांची अंमलबजावणी कसोशीने करायची.

तणाव मुक्तीसाठी – सतत काय?

•        स्वतःच्या मानसिक स्थितीकडे सतत लक्ष देणे – भाव, भावना, आवड, मनःस्थिती, प्राधान्य, त्यांचे परिणाम जाणणे. यासाठी चाचण्या, सुहृदांशी चर्चा, दैनंदिनी लिहिणे उपयुक्त

•        स्वतःच्या मानसिक स्थितीबाबत सतत काम करणे – उदा. प्रसन्नता वाढवणे, रागीटपणा कमी करणे, पराकोटीची निराशा टाळणे, इ. यासाठी प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे

•        दूरगामी/आयुष्याची ध्येये ठरवणे – मला नेमके काय काय केव्हा केव्हा करायचे आहे? वर्षा-वर्षानुसार नियोजन करून ते अमलात आणणे

तणाव-मुक्ती – आणखी काय काय?

•        तणावकारक गोष्टीं समजून घेणे. त्या का तणावकारक? त्याविषयी इतरांशी बोलणे

•        तणावकारक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे

•        तणावकारक गोष्टींपासून दूर रहाणे, त्या  टाळणे

•        तणावकारक गोष्टींना अन्य पर्याय शोधणे

•        विधायक दृष्टी, आशावाद जोपासणे

•        मदत करणे आणि घेणे

•        तणावकारक गोष्टींना अनुकूल होणे, म्हणजे त्यांचा ताण येऊ न देणे!

•        सहन करणे.

•        मनोरंजनाकडे लक्ष देणे: गाणे म्हणणे/ऐकणे; टी. व्ही., नाटक, सिनेमा पाहणे; गप्पा मारणे; सहलीला जाणे; छंद जोपासणे; वाचन करणे; घरकाम करणे; अन्य काही काम करणे ......

•        व्यायाम करणे; ध्यान साधना करणे; नवे जाही शिकत/शिकवत  रहाणे.....

•        आरोग्य राखणे: अति खाणे, अति जागरण, मद्यपान, धूम्रपान, जुगार .....टाळणे

कामाच्या तणावाबाबत ---

•        स्वतःला समजून घेणे- वैशिष्टे, गरजा, आवड-निवड, अपेक्षा, मूल्ये.....

•        उद्दिष्टे निश्चित करणे

•        कामाच्या सुयोग्य सवयी राखणे

•        नियोजन करणे

•        कामांचा प्राधान्यक्रम पाळणे

•        रोजची ‘to do’ सूची ठेवणे

•        वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

•        ठरवल्यानुसार जिद्दीने काम तडीस नेणे

•        स्वतःच्या चुका, त्रृटी मान्य करणे

लक्षात घ्या

•        तणावाबाबत प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी असते

•        सुयोग्य प्रयत्नाने तीव्र तणाव नक्की दूर होतो

•        हं! मात्र या प्रयत्नांचा ताण येऊ देऊ नका!!

संदर्भ