"ताण-तणाव मुक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{बदल}}
{{बदल}}
'''ताण-तणाव''' (किंवा''' ताण''', '''तणाव''') ही एक मानसिक अवस्था आहे.
'''तणाव''' (किंवा''' ताण''', '''ताण-तणाव''') ही एक मानसिक अवस्था आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय.


अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात.
अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात.

११:५७, २२ मार्च २०१८ ची आवृत्ती

तणाव (किंवा ताण, ताण-तणाव) ही एक मानसिक अवस्था आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय.

अनेक कारणांमुळे तणाव जाणवतो आणि त्याचे परिणाम शरिरावर, वर्तनावर दिसू शकतात.

चांगल्या घटनांचाही ताण येऊ शकतो.

कृती

•        नुकता अनुभवलेला तणावाचा प्रसंग एकमेकांना सांगा.

•        त्यावेळी मनःस्थिती, शरीर स्थिती कसकशी होती?

''तणावाचे आपल्या कामावर होणारे परिणाम''

आपली तणावाची कोणती पातळी असल्यावर आपले काम उत्तम होते, ते जाणून घ्यायचे.

तणाव-मुक्ती कशी साधायची?

सर्व प्रथम, आपल्याला ताण-तणाव आहे, तो किती आहे, का आहे, केव्हा आहे या सगळ्याचे भान ठेवायचे. म्हणजे आपल्या तणावाचे स्वरूप समजून घ्यायचे.

आपल्या त्रासदायक तणावा बाबत  तो दूर करण्याची जबाबदारी स्वतः घ्यायची.

यातून स्वतःला  काही शिकायचे आहे, असे म्हणायचे.

कार्यवाहीचे सुयोग्य उपाय निवडायचे.

त्यांची अंमलबजावणी कसोशीने करायची.

तणाव मुक्तीसाठी – सतत काय?

•        स्वतःच्या मानसिक स्थितीकडे सतत लक्ष देणे – भाव, भावना, आवड, मनःस्थिती, प्राधान्य, त्यांचे परिणाम जाणणे. यासाठी चाचण्या, सुहृदांशी चर्चा, दैनंदिनी लिहिणे उपयुक्त

•        स्वतःच्या मानसिक स्थितीबाबत सतत काम करणे – उदा. प्रसन्नता वाढवणे, रागीटपणा कमी करणे, पराकोटीची निराशा टाळणे, इ. यासाठी प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे

•        दूरगामी/आयुष्याची ध्येये ठरवणे – मला नेमके काय काय केव्हा केव्हा करायचे आहे? वर्षा-वर्षानुसार नियोजन करून ते अमलात आणणे

तणाव-मुक्ती – आणखी काय काय?

•        तणावकारक गोष्टीं समजून घेणे. त्या का तणावकारक? त्याविषयी इतरांशी बोलणे

•        तणावकारक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे

•        तणावकारक गोष्टींपासून दूर रहाणे, त्या  टाळणे

•        तणावकारक गोष्टींना अन्य पर्याय शोधणे

•        विधायक दृष्टी, आशावाद जोपासणे

•        मदत करणे आणि घेणे

•        तणावकारक गोष्टींना अनुकूल होणे, म्हणजे त्यांचा ताण येऊ न देणे!

•        सहन करणे.

•        मनोरंजनाकडे लक्ष देणे: गाणे म्हणणे/ऐकणे; टी. व्ही., नाटक, सिनेमा पाहणे; गप्पा मारणे; सहलीला जाणे; छंद जोपासणे; वाचन करणे; घरकाम करणे; अन्य काही काम करणे ......

•        व्यायाम करणे; ध्यान साधना करणे; नवे जाही शिकत/शिकवत  रहाणे.....

•        आरोग्य राखणे: अति खाणे, अति जागरण, मद्यपान, धूम्रपान, जुगार .....टाळणे

कामाच्या तणावाबाबत ---

•        स्वतःला समजून घेणे- वैशिष्टे, गरजा, आवड-निवड, अपेक्षा, मूल्ये.....

•        उद्दिष्टे निश्चित करणे

•        कामाच्या सुयोग्य सवयी राखणे

•        नियोजन करणे

•        कामांचा प्राधान्यक्रम पाळणे

•        रोजची ‘to do’ सूची ठेवणे

•        वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे

•        ठरवल्यानुसार जिद्दीने काम तडीस नेणे

•        स्वतःच्या चुका, त्रृटी मान्य करणे

लक्षात घ्या

•        तणावाबाबत प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी असते

•        सुयोग्य प्रयत्नाने तीव्र तणाव नक्की दूर होतो

•        हं! मात्र या प्रयत्नांचा ताण येऊ देऊ नका!!